Check Immediately Where Your Aadhar Card Is Used :
देशातील प्रत्येक नागरिकासाठी आधार कार्ड हे आता महत्त्वाचे कागदपत्र झाले आहे. या स्थितीत त्याची सुरक्षा करणे अत्यावश्यक बनले आहे.सध्या आधार कार्डचा गैरवापर मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याने आपले आधार कार्ड कुठे-कुठे वापरले जात आहे, हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

त्याचबरोबर आधार कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने फसवणूक करणारेही चांगलेच सक्रिय झाले आहेत जे लोकांच्या आधारकार्डचा चुकीच्या पद्धतीने वापर करून त्यांची फसवणूक करण्याचे काम करतात. अशा परिस्थितीत तुमच्या आधार कार्डचाही गैरवापर होत नाही ना हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या आधार कार्डचा इतिहास (History of Aadhar Card) कसा तपासू शकता. पुढील स्लाइड्सवर तुम्ही याविषयी अधिक जाणून घेऊ शकता…
पहा तुमचे आधारकार्ड कुठे वापरले असेल माहिती

यूआयडीएआय या आधार कार्डचे काम पाहणाऱ्या संस्थेने तुमचे आधार कार्ड कुठे कुठे वापरले जात आहे, हे पाहण्याची सुविधा दिली आहे. यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटवर, तुम्हाला आधार प्रमाणीकरण हिस्ट्री टूल मिळेल, ज्याद्वारे तुम्ही आधार कार्डचे तपशील तपासू शकता. यात तुम्हाला तुमचे आधार कुठे वापरले गेले आहे हे कळू शकते.
तुमच्या आधारकार्ड चा गैरवापर कुठे झाला कसे तपासणार
• सर्वप्रथम यूआयडीएआयची अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा.
• माय आधार टॅबमध्ये, तुम्हाला आधार सेवा चा पर्याय दिसेल, येथे ‘Aadhaar Authentication History या पर्यायावर क्लिक करा.
• येथून एक नवीन पान उघडेल, जिथे तुमचा १२ अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल.

• त्यानंतर कॅप्चा कोड टाका. ‘जनरेट ओटीपी’ बटणावर क्लिक केल्यानंतर दुसरे पेज उघडेल,
• येथे तुम्हाला मागील व्यवहारांचे तपशील पाहण्याचा पर्याय मिळतील.
• त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला ओटीपी टाकावा लागेल.
• यानंतर, गेल्या काही दिवसांमध्ये जिथे जिथे आधार कार्ड वापरले गेले त्याची तारीख, वेळ आणि ऑथेंटीकेशन प्रकार मिळेल. तुम्ही एका वेळी फक्त ५० व्यवहारांचे तपशील जाणून घेऊ शकाल.
• हे व्यवहार पाहून तुम्ही हे सर्व व्यवहार स्वतः केले आहेत की काही संशयास्पद कृती घडली आहे हे तुम्हाला कळू शकते.

1) मास्क्ड आधार कशी करते सुरक्षा
• सुरक्षेच्या दृष्टीने यूआयडीएआयने आधार कार्डची फोटोकॉपी देण्याऐवजी ‘मास्वड केलेले आधार’ वापरण्याचा सल्ला दिला आहे.
• मास्क केलेल्या आधारमध्ये आधार क्रमांकाचे फक्त शेवटचे ४ अंक दिसतात.
• हे यूआयडीएआयच्या https://myaadhaar.uidai.gov.in या संकेतस्थळावरून डाउनलोड केले जाऊ शकते.
• हॉटेल्स किंवा फिल्म हॉलसारख्या परवाना नसलेल्या खासगी संस्थांना आधार कार्डची प्रत ठेवण्याची परवानगी नाही.

पूर्णपणे मोफत
https://uidai.gov.in/ या संकेतस्थळावर आधार प्रमाणीकरण तपासणे पूर्णपणे विनामूल्य आहे आणि त्यासाठी कोणतेही शुल्क नाही. UIDAI च्या संकेतस्थळावर या आधार कार्ड जारी करणाऱ्या UIDAI एजन्सीने आधारच्या संरक्षणासाठी विविध प्रणाली विकसित केली आहे. जेणेकरून तुमच्या आधारचा गैरवापर कोणीही करू शकणार नाही.
इथे वाचा :- Sheli Palan Yojana 2022 | अहिल्यादेवी शेळी,मेंढी पालन अनुदान योजना | नवी योजना शासन निर्णय PDF पहा.
ह्या योजना पहा ;- नवीन पोल्ट्री फार्म कर्ज 2022 | कुक्कुटपालन व्यवसायासाठी कर्ज कसे घ्यावे | Poultry Farm Loan In Marathi पहा सविस्तर माहिती
माहिती जास्तीत जास्त गरजू लोकांना शेर करा