» Annasaheb patil loan apply 2022 | अण्णासाहेब पाटील बिनव्याजी कर्ज योजना सुरू | ३० कोटी निधी मंजूर असा करा अर्ज A to Z माहिती

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना:

 स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल. आणि आर्थिक पाठबळ मिळत नसेल .तर आता ही योजना आणि आमची ही पोस्ट मित्रांनो, तुम्हाला एक प्रकारे आर्थिक पाठबळ मिळवून देण्यासाठी आहे.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ साठी 30 कोटी रुपये निधी वितरण करण्याबाबतचा शासन निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला आहे.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी 30 कोटी निधी आला असून Annasaheb patil loan apply online अर्ज करण्याची पद्धत या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

दिनांक 8 जुलै २०२२ रोजी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेसाठी 30 कोटी एवढा निधी वितरीत करण्यासंदर्भातील शासन निर्णय दिनांक नुकताच निर्गमित करण्यात आलेला आहे.

मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना रोजगार निर्मितीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना अंतर्गत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येतो.

Annasaheb patil loan apply

Aanasaheb patil karj yojana 2022

शासन निर्णयानुसार अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेसाठी 30 कोटी एवढा निधी वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे.

या योजनेसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास सन २०२२-२३ साठी १०० कोटी एवढा निधी मिळणार आहे. त्यापैकी 30 कोटी निधी वितरीत करण्याबाबतचा शासन निर्णय 8 जुलै २०२२ रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.

शासन निर्णय संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

शासन निर्णय पहा.

Annasaheb patil loan apply 2022

मित्रांनो तुम्हाला योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर या लेखाच्या शेवटी डायरेक्ट लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही अर्ज करू शकतात परंतु त्या आधी हा लेख पूर्ण वाचा

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेले लाभार्थी

Mukhyamantri Rojgar Yojana Maharashtra | मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र 2022 | या लोकांना 50 लाखांपर्यंत सरकारी Loan कर्ज मिळणार..,

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुरुषांसाठी वयोमर्यादा जास्तीत जास्त 50 तर महिलांसाठी 55 वर्ष इतकी आहे.

लाभार्थ्याचे आर्थिक उत्पन्न हे वार्षिक आठ लाख असणे गरजेचे आहे.

कर्जाची रक्कम दहा लक्ष एवढी असेल आणि व्याजदर द.सा.द.शे.12 टक्के एवढा असेल .यामधील तीन लाख रुपयांपर्यंतचा व्याज रकमेचा परतावा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ द्वारे करण्यात येईल. अर्ज केल्यानंतर सात दिवसाच्या आत तुमचा अर्ज स्वीकारला जाईल. आणि त्यावरील प्रतिक्रिया लाभार्थ्याला कळवली जाईल .

योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी व्यवसाय सुरू केल्यानंतर त्याच्या व्यवसायाचे दोन फोटो वेबसाईट वर अपलोड करणे गरजेचे आहे. त्याची मुदत सहा महिने एवढी आहे.

या योजनेची आणखीन एक अट अशी की ,अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत कर्ज घेऊन जर तुम्ही व्यवसाय सुरू करत असाल तर, तुम्हाला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या सौजन्य असा बोर्ड लावावा लागेल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी इतर कोणत्याही महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

ही योजना फक्त मराठ्यांसाठी नसून इतर कोणत्याही जातीच्या उमेदवार या योजनेसाठी अर्ज करू शकतील .फक्त त्याच्या जातीसाठी कोणतेही महामंडळ कार्यरत नसावे.

या तरुणांना दुकान, व्यवसायासाठी 1 लाख रुपये कर्ज मिळणार | 1 लाख रु. बिनव्याजी कर्ज योजना 2022 | VJNT Loan Scheme 2022..,

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना कागदपत्रे

  • आधार कार्ड ( पुढील आणि मागील दोन्ही बाजूचे )
  • रहिवासी पुरावा.
  • उत्पन्नाचा पुरावा.
  • जातीचा दाखला.
  • प्रकल्प अहवाल.

कसा करावा या योजनेसाठी अर्ज?

खरोखरच तुम्हाला तुम्हाला स्वतःचा उद्योग सुरू करायचा असेल आणि स्वतः स्वतःचे मालक बनायचे असेल तर ही संधी गमावू नका या योजनेसाठी आताच अर्ज दाखल करा अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर तुम्ही क्लिक करून महास्वयम या वेबसाईटच्या पोर्टलवर पोहोचाल तेथून तुम्ही अर्ज करू शकता .

येथे क्लिक करून अर्ज सादर करा

Annasaheb patil loan

अधिक माहितीसाठी किंवा तुमच्या काही तक्रारीसाठी तुम्ही खालील दिलेल्या ग्राहक क्रमांकावर संपर्क करू शकता.

टोल फ्री क्रमांक – 1800 120 8040

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना संदर्भातील विविध जी आर बघा त्यासाठी येथे टच करा.

येथे क्लिक करून G.R पहा

मित्रांनो ही योजना महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी उपयुक्त बिनव्याजी आण्णासाहेब कर्ज योजना आहे सगळ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.आणि जास्तीत जास्त योजनेची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आपल्या नातेवाईकांना शेर करा

Leave a Comment


Scroll to Top