शासनाची बाल संगोपन योजना 2023 प्रस्तावना :- ० ते १८ वयोगटातील अनाथ, निराश्रित, बेघर व अन्य प्रकारे आपत्तीत असलेले (Crisis) बालकांचे संस्थाबाह्य आणि कौटुंबिक वातावरणात संगोपन व्हावे, यादृष्टीने बाल संगोपन योजना राबविण्यात येते. सध्या या योजनेखाली सुमारे १८,००० पेक्षा जास्त मुले लाभ घेत आहेत. परंतु, योजनेच्या अंमलबजावणीवर आवश्यक संनियंत्रण नसून, त्यांच्या गुणवत्तेबद्दल प्रश्न निर्माण झाला आहे, व अपात्र मुलांना लाभ देण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Bal Sangopan Yojana 2023
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे गृह भेटी देण्यासाठी व इतर संनियंत्रण करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ व परिविक्षा अधिकारी नसतांना सुध्दा त्यांच्यामार्फत सरळ हजारो बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात येत आहे. मोठ्या संख्येने दोन्ही पालक असलेल्या मुलानाही सदर योजनेचा लाभ वर्षानुवर्षे व त्याचा review न करता देण्यात येत आहे. म्हणून या योजनेत काही आवश्यक सुधारणा करण्याचे शासनाचे विचाराधीन होते. या योजनेचा अचूक अर्ज करून तुमच्या मुलांसाठी लाभ घेण्यासाठी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक व शेवटपर्यंत वाचावी.
या योजना अंतर्गत किती रक्कम मिळते ?
एका मुलांसाठी 2,500 रुपये प्रतिमहिना ( एका वर्षाला 27,000/- रु मिळतात वय 18 वर्ष पुर्ण होई पर्यत दर महिन्याला रक्कम मिळते.

👉महाराष्ट्र शासनाची बाल संगोपन योजनेचा अचूक अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करावे
बाल संगोपन योजनेचा लाभ घेता येईल अशी बालके खालीलप्रमाणे आहेत.
ही योजना अनाथ बालकांसाठी राबविण्यात येते ज्या बालकांचे पालक काही कारणामुळे मृत्युमुखी पडले आहेत.
अनाथ, किंवा ज्याच्या पालकांचा पत्ता लागत नाही, व जी दत्तक देणे शक्य होत नाही अशी बालके
एखाद्या बालकाला कुष्ठरोग झाला असेल.
जे बालक एखाद्या गुन्ह्यांतर्गत कारावासात असेल.
एखादे परिवार आपल्या मुलाला सांभाळायला असमर्थ असतील.
अविवाहित माता या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकेल.
मतिमंद मुले
अपंग मुले
ज्या बालकांचे आई वडील एखाद्या गंभीर आजारामुळे रुग्णालयात भरती आहेत.
ज्या बालकांचे पालक मानसिक रुग्ण आहेत.
अशी बालके ज्यांचे आई वडील घटस्फोटित आहेत.
एक पालक असलेली व Family Crisis मध्ये असलेली बालके
दोन्ही पालक अपंग आहेत अशी बालके
ज्या बालकांच्या आई वडिलांना एच आय व्ही झाला आहे.
ज्या बालकांना एच आय व्ही झाला आहे.
पालकांमधील तीव्र वैवाहिक बेबनाव, अती हेटाळणी व दुर्लक्ष, न्यायालयीन किंवा पोलीस तक्रार प्रकरणात अशी अपवादात्मक परिस्थितीतील (Crisis Situation मधील) बालके
जी बालके अनाथ आहेत अशा बालकांना या योजनेचा लाभ घेता येईल.
ज्या बालकांच्या पालकांचा पत्ता लागत नाही अशी बालके या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
ज्या बालकांचे आई वडील अपंग आहेत अशी बालके सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
एखाद्या गुन्ह्या अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची बालके या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात.
मृत्यू, घटस्फोट,विभक्तीकरण, परित्याग, अविवाहीत मातृत्व, गंभीर आजार, पालक रुग्णालयात असणे इ. कारणांमुळे विघटीत झालेल्या एक पालक असलेल्या कुटुंबातील बालके
ज्या बालकांना कुष्ठरोग आजार आहे.
एच आय व्ही ग्रस्त बालक,
कॅन्सर आजाराने ग्रस्त बालक
तीव्र मतिमंद बालक
ज्या बालकांच्या पालकांपैकी एकाचा मृत्यू होतो व एक पालक कमावता नाही अशा परिस्थितीत सुद्धा त्या बालकांना या योजनेचा लाभ घेता येतो.
या योजनेअंतर्गत शाळेत न जाणारी बालके सुद्धा लाभ घेऊ शकतात.
एक पालक असलेली व family Crisis मध्ये असलेली बालके
शाळेत न जाणारे बाल कामगार. (कामगार विभागाने सुटका व प्रमाणित केलेले)

👉महाराष्ट्र शासनाची बाल संगोपन योजनेचा अचूक अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करावे
शासनाची बाल संगोपन योजना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत…?
१)योजने साठी करावयाचा अर्ज व अर्जा सोबत
२)आधार कार्ड च्या झेराँक्स पालकांचे व बालकांचे
३)शाळेचे बोनाफाईड सर्टफिकेट
४)तलाठी यांचा उत्पन्नाचा दाखला.
५) पालकांचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र .(मृत्युचा दाखला)
६) पालकाचा रहिवासी दाखला.
७) मुलांचे बॅक पासबुक झेराँक्स.
८) मृत्यूचा अहवाल.
९) रेशन कार्ड झेराँक्स .
१०) घरा समोर पालका सोबत बालकांचा फोटो. ४ बाय ६ फोटो पोस्ट कार्ड मापाचा फोटो ( प्रत्येक मुलासोबत पालकाचा शेफरेट फोटो )
१०)मुलांचे पासपोर्ट फोटो 2
११)पालकाचे पासपोर्ट फोटो

👉महाराष्ट्र शासनाची बाल संगोपन योजनेचा अचूक अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करावे