तहसील कार्यालय भरती : भूम तालुक्यात कोतवाल पदांची भरती सुरु; पात्रता फक्त 4थी पास अन् महिन्याचा तब्बल 15,000 रुपये पगार, इथे करा अप्लाय..,

Bhum Osmanabad Kotwal Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, महसुल व वनविभाग तहसील कार्यालय, भूम तालुका, उस्मानाबाद अंतर्गत कोतवाल पदांच्या काही रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2023 आहे.

पदाचे नाव – कोतवाल

पदसंख्या – एकूण 02 जागा

शैक्षणिक पात्रता – ४ थी पास & उमेदवारास मराठी भाषा लिहिता व वाचता येणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण – भूम तालुका, उस्मानाबाद

वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे

अर्ज शुल्क –Rs. 20

परीक्षा शुल्क –
खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु 500/-
मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 400/-

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – तहसील कार्यालय, भूम
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जुलै 2023

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at
✅ अधिकृत वेबसाईटosmanabad.gov.in

निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा

महसुल व वनविभाग शासन निर्णय दिनांक 17.05.2023 नुसार 100 गुणांची लेखी परीक्षा असेल.
लेखी परीक्षा दिनांक 20.07.2023 रोजी सकाळी 11 ते 12.30 दरम्यान प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात आलेल्या ठिकाणी घेण्यात येईल.
गुणवत्ता क्रम हा लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर म्हणजेच एकूण 100 गुणांपैकी मिळालेल्या गुणांच्या आधारावर राहील

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at
✅ अधिकृत वेबसाईटosmanabad.gov.in
तहसील कार्यालय भरती

How To Apply For Bhum Kotwal Bharti 2023
सदर पदासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना तहसील कार्यालय, भूम येथे रुपये 20/- शुल्क भरुन उपलब्ध होईल. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर http://osmanabad.gov.in वर उपलब्ध करण्यात आलेला आहे.
अर्जासोबत स्वतःचे नाव व पत्ता नमूद केलेला व रुपये 5 चे पोस्टाचे तिकीट लावलेला लिफाफा जोडावा.
उमेदवाराने त्यांचे अलीकडील काळातील छायाचित्र आवेदन पत्रावर विहित जागी स्वसाक्षाकिंत करून घट्ट चिटकावे.
उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज सहपत्रासह तहसील कार्यालय, भूम येथे समक्ष अथवा पोस्टाने दिनांक 03.07.2023 पर्यंत कार्यालयीन वेळत पोहचतील अशा बेताने दाखल करावेत.
विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही व त्यासाठी हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. तसेच या संबंधाने उमेदरांसमवेत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
विहीत नमुन्यातील नसलेल्या अर्ज, विहित शुल्क भरना न केलेल्या उमेदवाराच्या अर्ज, विहित शैक्षणिक अहर्ता धारण न करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज, अपूर्ण व चुकीचे भरलेले अर्ज, फोटो नसलेला व स्वसाक्षाकिंत न केलेला अर्ज आणि विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Scroll to Top