Mhada Lottery : प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत म्हाडा कोकण मंडळाच्या 4640 घरांची लॉटरी ‘या’ दिवशी निघणार! इथे अर्ज करा.,

Mhada Lottery Konkan 2023 :  म्हाडाच्या कोकण मंडळांने 4,640 घरांसाठी लॉटरी काढली आहे. गेल्या दीड वर्षांपासून कोकण मंडळाच्या घर सोडतीची वाट पाहिली जात होती, अखेरकार ही लॉटरी आता सुरु झाली असून यासाठी अर्ज करण्याची मुदत देखील संपत आली आहे. आज म्हणजेच 19 एप्रिल 2023 पर्यंत या लॉटरीसाठी अर्ज सादर करता येणार आहे तसेच डिपॉझिट रक्कम म्हणजेच अनामत रक्कम भरण्यास 21 एप्रिल 2023 पर्यंत मुदत राहणार आहे.

त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज सादर करायचा आहे असे आवाहन म्हाडाच्या कोकण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 4640 घरांसाठीच्या आणि 14 भूखंडासाठीच्या लॉटरीसाठी आतापर्यंत 47000 हून अधिक लोकांनी अर्ज केले आहेत तर 32000हून अधिक लोकांनी आपला अर्ज अनामत रकमेसह भरला आहे.

  MHADA LOTTERY KONKAN 2023 चे संपूर्ण माहितीपत्रक वाचण्यासाठी – इथे क्लिक करा.

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

या प्रणालीत नोंदणी करताना महिला अर्जदारांना विवाहानंतरचे नाव, आडनाव बदलल्यामुळे किंवा इतर कारणामुळे येणाऱ्या अडचणी विचारात घेता अर्ज नोंदणी प्रणालीच्या पानावर आता नवीन पर्याय अर्जदाराला देण्यात आला आहे. या पर्यायानुसार अर्जदार दुसऱ्या नावाने ओळखला जात असल्यास त्याचा होकार किंवा नकार घेतला जाणार आहे. अर्जदाराने होकार लिहिल्यास अर्जदाराने त्याचे दुसरे नाव नमूद करावयाचे आहे. या सुविधेमुळे विवाहानंतरचे नाव, आडनाव बदललेल्या अर्जदारांना नोंदणी करता येणार आहे.      

‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य‘ या योजनेतील यशस्वी विजेत्यांनी मंडळातर्फे प्रथम सूचना पत्र (Provisional Offer Letter) जारी करण्याच्या अगोदर सदनिका नाकारली, तर सदनिका परत करणार्‍या विजेत्यांची अनामत रक्कम परत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, प्रथम सूचना पत्र प्राप्त झाल्यानंतर विजेत्या अर्जदाराने सदनिका नाकारल्यास सदनिकेच्या एकूण विक्री किंमतीच्या एक टक्के रक्कम कपात करुन अर्जदाराला अनामत रक्कम परत केली जाणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत २,०४८ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती श्री. मोरे यांनी दिली.  

  MHADA LOTTERY KONKAN 2023 चे संपूर्ण माहितीपत्रक वाचण्यासाठी – इथे क्लिक करा.

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

               

मंडळातर्फे सदनिका व भूखंड विक्रीसाठी ऑनलाईन संगणकीय सोडत १० मे, २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे काढण्यात येणार आहे. आतापर्यंत २२,३८० अर्जदारांनी सोडतीसाठी अर्ज केले असून त्यापैकी १२,३६० अर्जदारांनी अर्जासह आवश्यक अनामत रक्कम देखील भरली आहे. सोडतीसाठी पात्र अर्जांची अंतिम यादी ०४ मे, २०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. दिनांक १० मे, २०२३ रोजी सकाळी १० वाजता पात्र अर्जाची संगणकीय सोडत जाहीर केली जाणार असून अर्जदारांना सोडतीचा निकाल तत्काळ मोबाईलवर एसएमएस द्वारे , ई-मेल द्वारे तसेच ऍपवर प्राप्त होणार आहे.    

सोडतीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी ९८४ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण १४५६ सदनिका उपलब्ध असणार आहेत. म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत १४ भूखंड व १५२ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत २,०४८ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सोडतीसंदर्भात अर्ज भरतांना अर्जदारांना येणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी ०२२ – ६९४६८१०० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Scroll to Top