JOB ALERT : तहसील कार्यालयात सरकारी नोकरी अन् शिक्षण फक्त 4थी पास; अर्ज करण्याची आज शेवटची तारीख, इथे लगेच करा अर्ज..,

Mul Chandrapur Kotwal Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, तहसील कार्यालय, मूल – चंद्रपूर इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कोतवाल या पदांसाठी ही भरती असणार आहे. तहसील कार्यालय, मूल – चंद्रपूर अंतर्गत कोतवाल पदाकरिता इच्छुक स्थानिक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी उमेदवारांनी विहीत नमुन्यात दोन पासपोर्ट साईज फोटोसह अर्ज आवश्यक कागदपत्र व पुराव्यासहीत दिनांक 24 मे, 2023 ते 07 जुन, 2023 रोजी कार्यालयीन वेळेत तहसिलदार, मुल यांच्या कार्यालयात आस्थापणा शाखेत सादर करावेत व त्याबाबत पोच घ्यावी. अर्जाचा नमुना तहसिल कार्यालयातील आस्थापना शाखेत कार्यालयीन वेळेत व दिवशी उपलब्ध आहे. विहीत तारखे नंतर येणाऱ्या व अपुर्ण भरलेल्या अर्जाचा तसेच जाहीरनाम्याच्या पुर्वी सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी.

पदाचे नाव – सरकारी कोतवाल

पदसंख्या – एकूण 06 जागा

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कोतवालउमेदवारांनी शैक्षणिक पात्रता इयता किमान 4 थी पास असणे आवश्यक आहे. 

नोकरी ठिकाण – चंद्रपूर

वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे

  • अर्ज शुल्क –
    • खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी- रु 500/-
    • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी- रु. 300/-

अर्ज पद्धती – ऑफलाईन (प्रत्यक्ष)

निवड प्रक्रिया – लेखी परिक्षा

अर्ज पाठविण्याचा पत्ता – तहसिलदार, मुल यांच्या कार्यालयात आस्थापणा शाखेत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 जुन, 2023 सायंकाळी 06:15 वाजेपर्यंत

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा 
📑अर्ज नमूना येथे क्लिक करा 
✅ अधिकृत वेबसाईटchanda.nic.in
JOB ALERT

How To Apply For Chandrapur Kotwal Bharti 2023
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज हा अर्जदारानेच वैयक्तिक स्वत: हजर राहुन सादर करावा. अर्ज पोस्टाव्दारे पाठविण्यात येवु नये.
अपुर्ण माहीतीचे अर्ज रद्द करण्यात येईल. त्याबाबत कोणतेही पत्र व्यवहार करण्यात येणार नाही.
अर्जामधील माहिती खोटी आढळल्यास अर्ज रद्द करण्यात येईल. किंवा नियुक्ती झाल्यानंतर ती रद्द करण्यात येईल.
अर्ज स्विकारण्याची तारीख 24 मे, 2023 ते शेवटची तारीख 07 जुन, 2023 रोजी सांयकाळी 6.15 वाजेपर्यत (सुट्टीचे दिवस वगळुन )
अर्जाची छाननी दिनांक 08 जुन, 2023 रोजी दुपारी 11.00 वाजेपासुन तहसिल कार्यालय, मुल येथे करण्यात येईल.
अर्जासोबत कुठल्याही राजकीय पक्षाची शिफारस जोडलेली नसावी. अन्यथा आपला अर्ज अपात्र ठरविण्यांत येईल.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा 
📑अर्ज नमूनायेथे क्लिक करा 
✅ अधिकृत वेबसाईटChanda.Nic.In
JOB ALERT

Selection Process For Chandrapur Kotwal Recruitment 2023
पात्र उमेदवारांची लेखी परिक्षा गुरवार दिनांक 15 जुन, 2023 रोजी सकाळी 11.00 ते 12.00 वाजेपर्यत कर्मवीर महाविद्यालय, मुल येथे घेण्यात येईल.
सर्व पात्र उमेदवारांनी आपले अर्जाची पोचपावतीसह परिक्षेस उपस्थित रहाणे बंधनकारक आहे.
सदर परिक्षेस आपणास कुठलेही पुस्तकी साहित्य, कॅल्क्युलेट, स्मार्ट वॉच,मोवाईल इत्यादी घेऊन बसता येणार नाही.
उमेदवारांची निवड लेखी परिक्षा मिळालेले एकुण गुण लक्षात घेवुन गुणानुक्रमे करण्यात येईल.
कोतवाल पदासाठी होणारी लेखी परिक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नांची राहील.
पात्र उमेदवारास मुळ प्रमाणपत्रे आणणे आवश्यक आहे.
अर्जदाराला निवड प्रक्रियेसाठी स्वखर्चाने यावे लागेल.


Scroll to Top