UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून बारावी ते पदवीधारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; ऑनलाईन अर्ज सुरू, ही आहे शेवटची तारीख?

UPSC Recruitment 2023 : यूपीएससी (केंद्रीय लोकसेवा आयोग) ही भारतातील एक स्वतंत्र संस्था असून या संस्थेमार्फत कर्मचारी भरती केली जाते. यूपीएससीद्वारे प्रत्येक वर्षी परीक्षा घेतल्या जातात जवळपास 24 पदांची भरती यूपीएससीच्या माध्यमातून केली जाते.

अश्या या नामांकित संस्थेद्वारे विविध पदांची भरती निघालेली असून याची अधिकृत जाहिरातसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांकडून पदनिहाय ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जून 2023 आहे.

🔔 पदाचे नाव : सीनियर फार्म मॅनेजर, केबिन सेफ्टी इन्स्पेक्टर, हेड लायब्रेरियन, सायंटिस्ट, स्पेशालिस्ट ग्रेड III (Ophthalmology), स्पेशलिस्ट ग्रेड (Psychiatry), असिस्टंट केमिस्ट, असिस्टंट लेबर कमिशनर, मेडिकल ऑफिसर, GDMO (होमिओपॅथी)

🔔 पदसंख्या : 234

📚 शैक्षणिक पात्रता : पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे 👇

पदनामशैक्षणिक पात्रता
सीनियर फार्म मॅनेजर1) M.Sc. (फलोत्पादन/शेती) + 03 वर्षे अनुभव.
केबिन सेफ्टी इन्स्पेक्टर12 वी उत्तीर्ण + 10 वर्ष अनुभव
हेड लायब्रेरियनपदवीधर + ग्रंथालय विज्ञानमध्ये 5 वर्ष अनुभव
सायंटिस्टM.sc झूलॉजी + 3 वर्ष अनुभव
स्पेशालिस्ट ग्रेड III (Ophthalmology)एमबीबीएस, पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा + 3 वर्षाचा अनुभव
स्पेशलिस्ट ग्रेड (Psychiatry)एमबीबीएस, पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा + 3 वर्षाचा अनुभव
असिस्टंट केमिस्टM.Sc (रसायनशास्त्र/सेंद्रिय रसायनशास्त्र/भौतिक रसायनशास्त्र/ अजैविक रसायनशास्त्र/ विश्लेषणात्मक रसायनशास्त्र/ कृषी रसायनशास्त्र आणि मृदा विज्ञान + 02 वर्षे अनुभव
असिस्टंट लेबर कमिशनरसामाजिक कार्य किंवा कामगार कल्याण किंवा औद्योगिक संबंध किंवा कार्मिक व्यवस्थापन या विषयातील पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा किंवा LLB + 02 वर्षे अनुभव
मेडिकल ऑफिसरएमबीबीएस + रोटेटिंग इंटर्नशिप पूर्ण
GDMO (होमिओपॅथी)होमिओपॅथी पदवी

💁 वयोमर्यादा : 01 जून 2023 रोजी 32 ते 40 वर्षापर्यंत. ( एससी/एसटी : 05 वर्ष सूट, ओबीसी : 03 वर्ष सूट)

💰 अर्जाची फीस : जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस : रु. 25/- (ओबीसी/एससी/एसटी/महिला : फी नाही)

✈️ नोकरीच ठिकाण : संपूर्ण भारतात

🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

शेवटची तारीख : 01 जून 2023 ( 11:59 संध्या)

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
भरती जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा

How to apply for UPSC Recruitment 2023

  • विद्यार्थी मित्रांनो, ही भरती ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे विद्यार्थ्यांना यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
  • ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी, त्यानंतरच अर्ज करावा जेणेकरून अर्ज दाखल केल्यानंतर त्यामध्ये कोणतीही सुधारणा करता येणार नाही.
  • अंतिम अर्ज दाखल करताना उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता, मूलभूत माहिती, पदनाम इत्यादी माहिती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जून 2023 आहे ही बाब उमेदवारांनी लक्षात ठेवावी.

Leave a Comment


Scroll to Top