Talathi Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, महसूल व वन विभागांतर्गत राज्यभरात तलाठी (गट- क) संवर्गातील 4 हजार 644 पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. राज्यातील सहा विभागांअंतर्गत येणाऱ्या 36 जिल्ह्यांतील तलाठी पदांच्या भरती PDF/ जाहिरात (दि.23 जून) शासनाच्या संकेतस्थळावर प्रकाशित झाली आहे.

राज्यातील सहा विभागांअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील ४ हजार ६४४ पदांच्या भरती जाहिरात 23 June रोजी शासनाच्या संकेतस्थळावर प्रकाशित झाली आहे. तलाठी भरतीचे ऑनलाईन अर्ज आज २६ जून २०२३ रोजी, थोड्याच वेळात, सकाळी ११:५५ पासून सुरु होणार आहेत. तसेच १७ जुलै २०२३ ही फाॅर्म भरायची शेवटची तारीख आहे. अधिकृत जाहिरात महाभूलेख द्वारे प्रसिद्ध झाल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या पदभरतीसाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. साधारण गटासाठी एक हजार तर आरक्षण गटासाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क असेल. तर खुल्या गटासाठी वयोमर्यादा ही ३८ असून राखीव उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४३ असणार आहे. २ तासाच्या परीक्षेत (Exam) मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बैधिक (गणित) असा २०० गुणांचा पेपर असणार आहे.या भरती प्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेत पदवी त्याच बरोबर माध्यमिक शालांत परीक्षेत हिंदी व मराठी विषय असणं बंधनकारक असणार आहे. महसूल विभागांतर्गत राज्यभरात तलाठी (गट- क) संवर्गातील ४ हजार ६४४ पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सदर ऑनलाइन परीक्षा टीसीएस या खासगी एजन्सीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.
सर्वांसाठी हि आनंदाची बातमी आहे कि, महसूल व वन विभाग मध्ये तलाठी पदाच्या 4644 जागेची भरती निघालेली आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, पदसंख्या, वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आणि भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. (महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती 2023)
➡ हे देखील वाचा :- Talathi Bharti Documents : तलाठी भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी उपलब्ध | PDF डाउनलोड करा इथे…,
✍ पद : तलाठी (गट-क)
✍ पदसंख्या : एकूण 4644 जागा
अ.क्र. | जिल्हा | पद संख्या | अ.क्र. | जिल्हा | पद संख्या |
1 | अहमदनगर | 250 | 19 | नागपूर | 177 |
2 | अकोला | 41 | 20 | नांदेड | 119 |
3 | अमरावती | 56 | 21 | नंदुरबार | 54 |
4 | औरंगाबाद | 161 | 22 | नाशिक | 268 |
5 | बीड | 187 | 23 | उस्मानाबाद | 110 |
6 | भंडारा | 67 | 24 | परभणी | 105 |
7 | बुलढाणा | 49 | 25 | पुणे | 383 |
8 | चंद्रपूर | 167 | 26 | रायगड | 241 |
9 | धुळे | 205 | 27 | रत्नागिरी | 185 |
10 | गडचिरोली | 158 | 28 | सांगली | 98 |
11 | गोंदिया | 60 | 29 | सातारा | 153 |
12 | हिंगोली | 76 | 30 | सिंधुदुर्ग | 143 |
13 | जालना | 118 | 31 | सोलापूर | 197 |
14 | जळगाव | 208 | 32 | ठाणे | 65 |
15 | कोल्हापूर | 56 | 33 | वर्धा | 78 |
16 | लातूर | 63 | 34 | वाशिम | 19 |
17 | मुंबई उपनगर | 43 | 35 | यवतमाळ | 123 |
18 | मुंबई शहर | 19 | 36 | पालघर | 142 |
✍ वेतन श्रेणी : एस-8 नुसार रु. 25,500 ते 81,100/- अधिक भत्ते
✔ शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
📑 अधिकृत PDF/जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
➡ वयोमर्यादा : किमान 18 ते कमाल 38 वर्ष (राखीव उमेदवारांसाठी शासकीय नियमानुसार सुट)
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. 1,000/- मागासवर्गीय : रु. 900/-
✈ परीक्षा केंद्र : महाराष्ट्रातील 36 जिल्हाकेंद्रावर
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. 26 जून 2023
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. 17 जुलै 2023 (11:55 PM
✅ अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
📑 PDF/जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
👉 अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अशा पद्धतीनं करा अप्लाय
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जदाराचे स्वतःचे gmail account आवश्यक आहे.
- अर्ज योग्यरीत्या भरून झाल्यावर submit हे बटन क्लिक करावे.
- अर्जाची प्रत आपल्या gmail account वर प्राप्त होईल
- सदर अर्ज प्रिंट करून मुलाखतीच्या दिवशी प्रिंट केलेल्या अर्जा सह उपस्थित असणं आवश्यक आहे.