ZP Bhandara Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा, जिल्हा परिषद भंडारा राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्णांचे एक्स रे काढण्याकरीता खाजगी रेडीओलॉजिस्ट यांचेकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. याबाबत सविस्तर माहीती www.bhandara.org.in https://bhandara.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
Zilla Parishad Bhandara 2023 : या भरती साठीची अधिकृत PDF/अधिसूचना (Zilla Parishad Bhandara) यांच्या bhandara.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आलेली आहे. ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे तो शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचावा आणि मगच अचूक अर्ज सादर करावा.
पदाचे नाव – रेडीओलॉजिस्ट
नोकरी ठिकाण – भंडारा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी./Read PDF)
✅ शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र, भंडारा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुन 2023
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at |
✅ अधिकृत वेबसाईट | bhandara.gov.in |
How To Apply For Zilla Parishad Bhandara 2023
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्णांचे एक्स रे काढण्याकरीता खाजगी रेडीओलॉजिस्ट यांचेकडून विहीत नमुन्यात दि.14/6/23 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुन 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अटी व शर्ती:
NTEP अंतर्गत भंडारा जिल्हयातील क्षयरुग्णांची विना मोबदला क्ष-किरण तपासणी क्षयरोग निदान होई पर्यंत करण्यात येईल. या व्यतिरिक्त इतर कालावधीत रुग्णाची NTEP अंतर्गत मोफत क्ष-किरण तपासणी करण्यात येणार नाही.
NTEP अंतर्गत मोफत क्ष-किरण तपासणी करिता देण्यात आलेल्या संदर्भीय पत्राचा नमुना व्यतिरिक्त दुसऱ्या प्रपत्रात संदर्भीय पत्र ग्राहय धरल्या जाणार नाही. संदर्भिय पत्रावर नमुद दिनांकाच्या १० दिवसानंतर सदर संदर्भिय पत्र गृहीत धरल्या जाणार नाही.
उप.जि.रु./ग्रा. रुग्णालय व प्रा. आ. केंद्रातून संदर्भीत केलेल्या रुग्णांची क्ष-किरण तपासणी केल्यानंतरच मोबदला देय राहील.
खाजगी रेडिओलॉजिस्ट यांनी १) वैद्यकिय अधिकारी / CHO यांनी संदर्भात केलेले मुळपत्र, २) एक्स रे रिपोर्टची प्रत ३) रजिस्टर / रेकॉर्ड बुक ची प्रत ४) एक्स रे चे देयके (Bill) जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र, भंडारा यांच्याकडे सादर केल्यावरच देयके अदा करण्यात येईल.
NTEP कायदयाची तंतोतंत अंमलबजावनी करणे बंधनकारक राहील. यामध्ये काही गुंतागुंत झाल्यास त्याबदद्ल सर्वस्वी खाजगी रेडिओलॉजिस्ट जबाबदार राहतील.
आवश्यक विविध फार्म/ रजिस्टर/ रेकॉर्ड /संदर्भीय मूळपत्र ठेवण्याची जबाबदारी खाजगी रेडिओलॉजिस्ट यांची राहील.
एक्स रे अहवाल विनाविलंब संबंधित लाभार्थीमार्फत वैद्यकिय अधिकारी यांना सादर करण्यात येईल
काही त्रुटी आढळल्यास किंवा अडचण निर्माण झाल्यास मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने यामध्ये अंशतः बदल करण्यात येईल.