SSB Bharti 2023 : खेड्यापाड्यातील मुलांना सैन्यामध्ये नोकरी करण्याची खूपच इच्छा असते. अशाच इच्छुक व सैन्यातील भरतीकरिता तयारी करत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सशस्त्र सीमा बलात विविध रिक्त पदांसाठीची अधिकृत जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना या भरतीकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2023 असून उमेदवारांनी विहित मुदतीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
🔔 पदाचे नाव : कृपया विविध पदांसाठी मूळ जाहिरात पहावी अथवा शैक्षणिक पात्रतेचा रखाना पाहावा.
🔔 एकूण पदसंख्या : 1646
📚 शैक्षणिक पात्रता : खालीलप्रमाणे 👇
पदनाम | शैक्षणिक पात्रता |
---|---|
हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशन) 15 | 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI+ 01 वर्ष अनुभव किंवा 02 वर्षाचा ITI डिप्लोमा |
हेड कॉन्स्टेबल (मेकानिक) 296 | 10वी उत्तीर्ण (ii) ऑटोमोबाईल/मोटर मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI डिप्लोमा (ii) अवजड वाहन चालक परवाना |
हेड कॉन्स्टेबल (स्टुअर्ड) 02 | i) 10वी उत्तीर्ण (ii) कॅटरिंग किचन मॅनेजमेंट डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव |
हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) 23 | (i) 12वी (बायोलॉजी) उत्तीर्ण (ii) पशुवैद्यकीय आणि पशुधन विकास किंवा पशुवैद्यकीय स्टॉक -असिस्टंट कोर्स किंवा पशुसंवर्धन अभ्यासक्रम |
हेड कॉन्स्टेबल (कम्युनिकेशन) 578 | 12वी (PCM) उत्तीर्ण किंवा इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा |
कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) 96 | (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना |
कॉन्स्टेबल (व्हेटनरी) 14 | 10 वी उत्तीर्ण |
कॉन्स्टेबल (कारपेंटर, ब्लॅकस्मिथ & पेंटर) 07 | 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI +01 वर्ष अनुभव |
कॉन्स्टेबल (वॉशरमन, बार्बर, सफाईवाला, टेलर, गार्डनर, कॉब्लर, कुक & वॉटर कॅरिअर) 416 | 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI +01 वर्ष अनुभव |
ASI (फार्मासिस्ट) 07 | (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) B.Pharm/D.Pharm |
ASI (रेडिओग्राफर) 21 | (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) रेडिओ डायगोनिस डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव |
ASI (ऑपेरशन थिएटर टेक्निशियन) 01 | (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) ऑपेरशन थिएटर टेक्निशियन डिप्लोमा किंवा ऑपेरशन थिएटर असिस्टंट कम सेंट्रल स्टेराइल सप्लाई असिस्टंट ट्रेनिंग कोर्स (iii) 02 वर्षे अनुभव |
ASI (डेंटल टेक्निशियन) 01 | (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) डेंटल हाईजेनिस्ट कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव |
सब इंस्पेक्टर (पायोनिर) 20 | सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी |
सब इंस्पेक्टर (ड्राफ्ट्समन) 03 | 10वी उत्तीर्ण (ii) ITI (iii) AUTOCAD कोर्स किंवा 01 वर्ष अनुभव |
सब इंस्पेक्टर (कम्युनिकेशन) 59 | इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी किंवा B.Sc (PCM) |
सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स-महिला) 29 | (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (iii) GNM (iii) 02 वर्षे अनुभव |
ASI (स्टेनोग्राफर) 40 | (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी) |
असिस्टंट कमांडंट (व्हेटनरी) 18 | पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन पदवी |
💁 वयोमर्यादा : 18 जून 2023 रोजी 18 ते 35 वर्ष (एससी/एसटी : 05 वर्ष सूट, ओबीसी : 03 वर्ष सूट)
💰 परीक्षा फीस : खुला प्रवर्ग/ओबीसी : रु. 100/- (एससी/एसटी/महिला/एक्स. आर्मी : फीस नाही)
🔔 निवड प्रक्रिया : निवड प्रक्रिया चार टप्प्यांमध्ये राबविण्यात येईल. 1) लेखी परीक्षा 2) शारीरिक चाचणी 3) कागदपत्र पडताळणी 4) वैद्यकीय चाचणी
✈️ नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात कुठेही
🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन
⏰ शेवटची तारीख : 18 जून 2023
How to apply for SSB Recruitment 2023
- सदरची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने असल्याने उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा इतर माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- पदसंख्या व विविध पद असल्यामुळे उमेदवारांनी गोंधळून न जाता जाहिरात काळजीपूर्वक वाचून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करावा.
- ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी संपूर्ण मूलभूत माहिती शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक टाकावी, जेणेकरून अर्ज दाखल केल्यानंतर कोणत्याही प्रकारची त्रुटी येणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2023 ही आहे, उमेदवारांनी ही बाब लक्षात ठेवावी.
- या भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना कोणत्याही पदासाठी काही शंका असेल, तर सविस्तर जाहिरात वरील रखान्यामध्ये देण्यात आलेली आहे, ती वाचून त्यानंतरच अर्ज करावा.