पुणे महानगरपालिका भरती | तुम्हीही ग्रॅज्युएट आहात? टायपिंगही येतं? मग पुणे महापालिकेत जॉबची संधी सोडूच नका; वेतन 21,525 मिळेल, करा अप्लाय..,

Pune Mahanagarpalika Bharti 2023 details : नमस्कार मित्रांनो, पुणे महानगरपालिका इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, पुणे येथे शिक्षकेत्तर क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर (Clerk Cum Data Entry Operator) एकवट मानधनावर भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. उमेदवाराने सोबत जोडलेला अर्ज नमूद केलेल्या आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित छायांकित एक प्रत (Print Copy / Hard Copy), स्वयं प्रमाणपत्र, छोट्या कुटुंबाचे प्रमाणत्रासह परिपूर्ण अर्ज भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे येथे कार्यालयीन वेळेत समक्ष सादर करावयाचा आहे. 

खाली अर्जाचा नमूना व PDF पहा

पदाचे नाव – क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर

पद संख्या – एकूण 06 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवी परीक्षा उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे.

तसंच वयाची 18 वर्षे पूर्ण केली असणं आवश्यक आहेत.

उमेदवारांची 40 W.P.M च्या गतीसाठी टायपिंगची सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाली असणं आवश्यक आहे.

तसंच मराठीत 30 W.P.M टायपिंगची सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाली असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक असणार आहे.

नोकरी ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)

वयोमर्यादा –
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे
मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे राहील

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at
✅ अधिकृत वेबसाईटwww.pmc.gov.in
📑 अर्जाचा नमूनायेथे क्लिक करा
पुणे महानगरपालिका भरती

आवश्यक कागदपत्रे :
फोटो आयडी : आधारकार्ड / पासपोर्ट / वाहन परवाना / पॅनकार्ड इ. JBT
जन्मतारखेचा पुरावा : जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला / रहिवाशी दाखला इ.
शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र.
पदवी उत्तीर्ण मार्कशिट
टायपिंग प्रमाणपत्र
एम.एस.सी.आय.टी. (MSCIT)
अनुभव प्रमाणपत्र.
जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र. (आवश्यक असल्यास)

अर्ज पद्धत्ती – सक्षम / स्वतः

अर्ज पाठविण्याचा पत्ता – भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at
✅ अधिकृत वेबसाईटwww.pmc.gov.in
📑 अर्जाचा नमूनायेथे क्लिक करा
पुणे महानगरपालिका भरती

How To Apply For Pune Municipal Corporation Recruitment 2023
या पदासाठी उमेदवारांना अर्ज सक्षम पद्धतीने करायचा आहे.
टपालाने आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत
उमेदवाराने सोबत जोडलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्येच अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
उमेदवारांना वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सर्व सुचना, गुणवत्ता यादी वेबसाईटवर www.punecorporation.org प्रसिध्द करणेत येतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुन 2023 आहे.
दिनांक २७/०६/२०२३ नंतर आवेदनपत्र सादर करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Scroll to Top