शेतकऱ्यांसाठी सरकारी अनुदान “अर्ज एक योजना अनेक”, Maha DBT पोर्टल योजना सुरु | शेतकरी योजना अर्ज सुरु ,असा करा सांगितल्या प्रमाणे अर्ज

“अर्ज एक योजना अनेक ”योजना अर्ज प्रक्रिया सुरू

Mhadbt yojana 2022
Mhadbt yojana 2022

शेतकऱ्यांसाठी “अर्ज एक योजना अनेक”, महाडीबीटी पोर्टल योजना सुरु – MahaDBT Portal Scheme 2022
शेतकरी बंधूंनो , सध्या ही योजना संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे ; खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा 100% फायदा होणार.

शेतकऱ्यांसाठी 100 पेक्षा जास्त सरकारी अनुदान 2022

कृषि विभागाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळण्यासाठी शेतकरी बांधवांनी महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज सुरू झाले आहेत. शेतकऱ्यांच्या सोयीकरिता महा-डीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना” या सदराखाली सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाद्वारे” देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून त्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज या पोर्टलवर करायचा आहे.

अर्ज एक योजना अनेक योजना 2022
अर्ज एक योजना अनेक योजना 2022

हे नक्की वाचा :- सर्व शेतकरी बांधवांना सूचना करण्यात येते की, कृषि यांत्रिकीकरण व प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत ट्रॅक्टर, ट्रॉली, पॉवर टिलर, पॉवर विडर, रोटाव्हेटर, कल्टीव्हेटर, पेरणी यंत्र, सर्व पिकांचे लागवड यंत्र, चाफकटर, नांगर, फवारणी यंत्र, रिपर, जमीन सपाटीकरण यंत्र, खोडवा कटर, पाचट कट्टी यंत्र, मल्चर, मळणी यंत्र, डाळ मिल, सोलार ड्रायर, इतर विविध शेती औजारे, ठिबक सिंचन संच, तुषार सिंचन संच, कांदाचाळ, शेडनेट, पॉलीहाऊस, रायपनिंग चेंबर, कोल्ड स्टोरेज, शेततळे अस्तरीकरण इ. बाबींचा अनुदानावर लाभ घेण्यासाठी आपले नजीकचे महा ई सेवा केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर, येथे किंवा ऑनलाईन “महाडीबीटी” या संकेतस्थळावर दि. २५ मे २०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरावेत. महाडीबीटी पोर्टल वरील योजना प्रभावीपणे राबविणेसाठी राज्यशासनाने परिपत्रक जारी केले आहे.

This image has an empty alt attribute; its file name is krushi-yojana-maharashtra.jpg
शेतकऱ्यांसाठी सरकारी अनुदान “अर्ज एक योजना अनेक”, Maha DBT पोर्टल योजना सुरु | शेतकरी योजना अर्ज सुरु आहे

शेतकऱ्यांसाठी “अर्ज एक योजना अनेक”- महाडीबीटी पोर्टल वर विविध योजना:

  • कांदा चाळ <- इथे क्लिक करून सविस्तर योजना वाचा.
  • पॅक हाऊस
  • जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन
  • फळबागांना आकार देणे
  • फळबाग लागवड <- इथे क्लिक करून सविस्तर योजना वाचा.
  • मधुमक्षिकापालन
  • हरितगृह
  • शेडनेट हाऊस
  • प्लास्टिक मल्चिंग
Arj ek yojana anek 2022
Arj ek yojana anek 2022

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने अंतर्गत:

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना | Falbag Lagwad Yojana 2022 | 100% शेतकरी अनुदान योजना  ऑनलाईन अर्ज सुरु

  • आंबा लागवड
  • डाळिंब लागवड
  • मोसंबी लागवड
  • पेरू लागवड
  • सिताफळ लागवड
  • इतर फळबाग लागवड योजना
  • शेततळ्यातील पन्नी
  • सामायिक शेततळे

कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत

  • ट्रॅक्टर
  • ट्रॅक्टर व पावर ट्रेलर चलित अवजारे
  • प्रक्रिया संच
  • पावर टिलर
  • बैलचलित अवजारे
  • मनुष्य अवजारे
  • स्वयंचलित अवजारे
  • कल्टीवेटर
  • कापणी यंत्र
  • नांगर
  • पेरणी यंत्र
  • मल्चिंग यंत्र
  • मळणी यंत्र
  • रोटावेटर
  • वखर
  • ७/१२ उतारा
  • ८ अ उतारा
  • बॅक पासबुक
  • आधारकार्ड
शेतकरी योजना 2022
शेतकरी योजना 2022

महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकरी बांधवांसाठी  विविध योजना सुरु असतात. परंतु खूप कमी शेतकरी बांधवाना या योजनांचा लाभ मिळत असतो. अनेक शेतकरी बांधव केवळ माहिती नसल्यामुळे या शेतकरी सरकारी योजनांचा लाभ घेवू शकत नाहीत. शेतकरी अनुदान योजना किंवा महाराष्ट्र शासन कृषी योजना विषयी अधिक चांगल्या प्रकारे जागृती होणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांसाठी “अर्ज एक योजना अनेक”, महाडीबीटी पोर्टल योजना:

योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर “शेतकरी योजना” हा पर्याय निवडावा.

शेतकरी मोबाईल, संगणक/लॅपटॅाप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील आपले सरकार केंद्र इ. माध्यमातून या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.

arj ek yojana anek 2022
arj ek yojana anek 2022

पोर्टलवरील प्राप्त अर्जांची ऑनलाईन लॉटरी, पूर्व संमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्याच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इ. सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. महाडीबीटी पोर्टलवर माहिती भरण्याची कार्यवाही सुरु झाली असून यापूर्वी अर्जदारांनी माहिती भरली असल्यास त्यांना नव्याने भरण्याची आवश्यकता नाही. मात्र लाभाच्या घटकांमध्ये शेतकरी त्यांना हवा तसा बदल करू शकतात. ज्यांनी अद्याप महा डीबीटी पोर्टलवर अर्ज केला नसेल, त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून घ्या.

महाडीबीटी पोर्टल: https://mahadbtmahait.gov.in

ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना: ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

हेल्पलाईन क्रमांक: 022-49150800

Biyane Anudan Yojana Maharashtra 2022 | बियाणे अनुदान योजना 2022 | बियाण्यास 50% अनुदान ऑनलाइन अर्ज सुरू..

इथे सविस्तर वाचा :> Diesel Pump Subsidy 2022 | डीजल पंप अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज सुरु लवकर करा अर्ज

 ह्या योजना संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे. या योजनेचा अचूक अर्ज करण्यासाठी शेतकरी बंधुनो तुम्ही तुमच्या गावातील / जवळच्या कॉम्प्युटर सेंटर मध्ये जाऊन अर्ज करू शकता.व त्या अर्जाची पोच पावती घेऊ शकता.

किंवा तुम्ही स्वत: जर ऑनलाइन क्षेत्रात हुशार असाल तर Maha- DBT येथे या लिंक वर क्लिक करून या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घ्या, व अर्ज करा. तसेच तुम्हाला काही शंका असल्यास तुमच्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्यांकडे या योजनेबद्दल चर्चा करा व लवकरात लवकर अर्ज करा.

HDFC Bank Plot Loan 2022 | एचडीएफसी बैंक देणार प्लॉट खरेदीसाठी कर्ज; पहा काय करावे लागणार स्टेप बाय स्टेप…

माहिती आपल्या कामाची असेल तर सर्वांना नक्की शेर करावी

Comments are closed.


Scroll to Top