महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र सौर सोलर वॉटर पंपिंग सिस्टीम उर्जेवर आधारित पंपसेटसाठी कर्ज योजना 2022

Bank of maharashtra solar pump yojana online application 2022
नमस्कार शेतकरी बंधूंनो , आम्ही महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या व केंद्र शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती वेळोवेळी देत असतो; तरी आज आपण शेतकऱ्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र सौर उर्जेवर आधारित पंपसेटसाठी म्हणजेच विहीरीवरील सौर कृषी पंप , बोर/ बोरवेल वरील सौर कृषी पंप या कर्ज योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तरी खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा व योजनेचा लाभ घेण्यासाठी आम्ही संगीतल्याप्रमाणे अर्ज करावा.
Bank of maharashtra solar pump yojana: बँक ऑफ महाराष्ट्र सौर कृषी पंप कर्ज योजना 2022 ही योजना 100% खरी व महाराष्ट्र बँकेची एक यशस्वी असून आपण या योजनेची उद्दिष्ट्य , अनुदान किती मिळणार, अर्ज कुठे करायचा , त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती , अटी , पात्रता, लाभार्थी निवडीचे निकष कोणते या सर्व गोष्टींची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यामुळे जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घेयचा असेल तर हा लेख संपूर्ण वाचा. Agriculture Loan
योजनेचे नाव :- महाराष्ट्र बँक कृषी सौर पंप उभारणी कर्ज योजना 2022
योजनेचा हेतु | सोलर वॉटर पंपिंग सिस्टीम उभी करणे. शेतकऱ्यांना सोलर पंप खरेदीसाठी अर्थसंहाय्य प्रदान करणे. |
पात्रता:
शेतकऱ्याकडे पाण्याचा पुरेसा स्त्रोत असावा
विहिरीसाठी, त्या क्षेत्रास सिंचनासाठी पुरेशी पुनर्वसन क्षमता असणे आवश्यक आहे.
शेतकऱ्याकडे कमीतकमी १० एकर आर्थिक जमीन असावी.

संसाधन:
- सौर पीव्ही पॅनेल कृषी सौर पंप
- प्रकल्पाशी सुसंगत पुढीलपैकी एक पंपसेट.
अ) सरफेस माऊंटेड सेंट्रीफ्युगल पंपसेट
ब) सममर्सिबल पंप सेट
सी) फ्लोटिंग पंप सेट
ड) एमएनआरई कडून मान्यता मिळाल्यानंतर इतर कोणत्याही प्रकारचा मोटर पंप सेट.
रक्कम :- सौर पीव्ही पॅनेल उपकरणांच्या किंमतीच्या ७५% मिळणार
मार्जीन | रू. १.६० लाखपर्यंत – नाहीरू. १.६० लाखपेक्षा जास्त – मार्जीन किमान २५% जर अनुदान उपलब्ध असेल तर ते मार्जीन म्हणून मानले जाऊ शकते. |
व्याज दर :
- रु. १०.०० लाखांपर्यंत : १ वर्ष एमसीएलआर + बीएसएस @ ०.५०% + २.००%
- रु. १०.०० लाखांपेक्षा अधिक : १ वर्ष एमसीएलआर + बीएसएस @ ०.५०% + ३.००
तारण :
रू. १.६० लाखांपर्यंत – उपकरणाचे गहाणतारण.
रु. १.६० लाखांहून अधिक उपकरणे आणि जमिनीचे थर्ड पार्टी जामीन/तारण.
परतफेड | किमान ५-७ वर्षे |
Agriculture Loan कागदपत्रे :
१. कर्जाचा अर्ज म्हणजे फॉर्म क्रमांक – १३८ आणि परिशिष्ट – बी २
- सर्व ७/१२,८ ए, ६ डी दाखले, अर्जदाराच्या जमिनीच्या चतु:सीमा
- पीएसीएससह आसपासच्या वित्तीय संस्थांकडून अर्जदाराचे कोणतेही
- थकीत प्रमाणपत्र नाही.
- जिथे जमीन गहाण ठेवणे आहे तिथे १.६० लाख रूपयांवरील कर्जासाठी
- बँकेच्या पॅनलवरील वकिलांकडून शोध अहवाल.
- कोटेशन/अंदाजांची प्रत
२. हमी फॉर्म एफ– १३८
- सर्व ७/१२,८ अ आणि पीएसीएस गॅरंटर्सचे थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.

महाराष्ट्र बँक कृषी सौर पंप कर्ज योजना अचूक अर्ज कसा व कोठे करावा
शेतकरी बंधूंनो , Agriculture Loan शेतकऱ्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र सौर उर्जेवर आधारित पंपसेटसाठी म्हणजेच विहीरीवरील सौर कृषी पंप , बोर/ बोरवेल वरील सौर कृषी पंप या कर्ज योजनेचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वरील अर्ज करा या बटणावर क्लिक करून किंवा तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या https:https://bomloans.com/agriloan?bom//bomloans.com/agriloan?bom या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
टीप :- Agriculture Loan शेतकरी बंधूंनो या योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी , तुमच्या मनातील शंका , योजनेबाबत काही प्रश्न असतील यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या शाखेला भेट द्यावी तेथील बँक मॅनेजर सोबत या योजनेबाबत सविस्तर चर्चा करावी व त्यांच्या मार्गदर्शनाखाली अचूक अर्ज करून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा., धन्यवाद!
Comments are closed.