maha Bank Solar Pump Yojana : नमस्कार शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र सौर सोलर वॉटर पंपिंग सिस्टीम उर्जेवर आधारित पंपसेटसाठी कर्ज योजना 2022 सुरू झालेली आहे. तरी आज आपण सौर उर्जेवर आधारित पंपसेटसाठी म्हणजेच विहीरीवरील सौर कृषी पंप , बोर/ बोरवेल वरील सौर कृषी पंप या कर्ज अनुदान योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत; योजनेचा फायदा घेण्यासाठी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक व शेवटपर्यंत वाचावी.

Bank Of Maharashtra Solar Pump Yojana Online Application 2022 : बँक ऑफ महाराष्ट्र सौर कृषी पंप कर्ज अनुदान योजना 2022 ही योजना 100% खरी व महाराष्ट्र बँकेची एक यशस्वी असून आपण या योजनेची उद्दिष्ट्य , अनुदान किती मिळणार, अर्ज कुठे करायचा , त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती , अटी , पात्रता, लाभार्थी निवडीचे निकष कोणते या सर्व गोष्टींची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
ही योजना नक्कीच वाचा :-> Poultry Farming Scheme : या शेतकऱ्यांना मिळणार नवीन पोल्ट्री फार्म व कुक्कुटपालन साठी रु. १०.०० लाखांपर्यंत कर्ज व अनुदान..
महाबँक कृषी सौर पंप उभारणी कर्ज अनुदान योजना हेतु : महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना विहीरीवरील सौर कृषी पंप , बोर/ बोरवेल वरील सौर कृषी / सोलर वॉटर पंपिंग सिस्टीम खरेदीसाठी अर्थसंहाय्य प्रदान करणे.
- Agriculture Loan पात्रता:
- शेतकऱ्याकडे पाण्याचा पुरेसा स्त्रोत असावा
- विहिरीसाठी, त्या क्षेत्रास सिंचनासाठी पुरेशी पुनर्वसन क्षमता असणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्याकडे कमीतकमी १० एकर आर्थिक जमीन असावी.
- रक्कम अनुदान :- सौर पीव्ही पॅनेल उपकरणांच्या किंमतीच्या ७५% मिळणार

- संसाधन:
- सौर पीव्ही पॅनेल कृषी सौर पंप
- प्रकल्पाशी सुसंगत पुढीलपैकी एक पंपसेट.
- अ) सरफेस माऊंटेड सेंट्रीफ्युगल पंपसेट
- ब) सममर्सिबल पंप सेट
- सी) फ्लोटिंग पंप सेट
- ड) एमएनआरई कडून मान्यता मिळाल्यानंतर इतर कोणत्याही प्रकारचा मोटर पंप सेट.
- व्याज दर :
- रु. १०.०० लाखांपर्यंत : १ वर्ष एमसीएलआर + बीएसएस @ ०.५०% + २.००%
- रु. १०.०० लाखांपेक्षा अधिक : १ वर्ष एमसीएलआर + बीएसएस @ ०.५०% + ३.००
- परतफेड : किमान ५-७ वर्षे

- saur krushi pump yojana कागदपत्रे :
- १. कर्जाचा अर्ज म्हणजे फॉर्म क्रमांक – १३८ आणि परिशिष्ट – बी २
- सर्व ७/१२,८ ए, ६ डी दाखले, अर्जदाराच्या जमिनीच्या चतु:सीमा
- पीएसीएससह आसपासच्या वित्तीय संस्थांकडून अर्जदाराचे कोणतेही
- थकीत प्रमाणपत्र नाही.
- जिथे जमीन गहाण ठेवणे आहे तिथे १.६० लाख रूपयांवरील कर्जासाठी
- बँकेच्या पॅनलवरील वकिलांकडून शोध अहवाल.
- कोटेशन/अंदाजांची प्रत
- २. हमी फॉर्म एफ– १३८
- सर्व ७/१२,८ अ आणि पीएसीएस गॅरंटर्सचे थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.

महाराष्ट्र बँक कृषी सौर पंप कर्ज योजना अचूक अर्ज कसा व कोठे करावा : शेतकरी बंधूंनो , Agriculture Loan महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना योजनेचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वरील अर्ज करा या बटणावर क्लिक करून किंवा तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या Https://Bomloans.Com/Agriloan?Bom या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन Financing Solar Energy Based Pumpset Loans हा पर्याय निवडून विचारलेली माहिती व कागदपत्रे देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. किंवाच ->>

खाली वाचा व असा करा विहीरीवरील सौर कृषी पंप , बोर/ बोरवेल वरील सौर कृषी पंपसाठी ऑफलाइन अर्ज : Agriculture Loan शेतकरी बंधूंनो बँक ऑफ महाराष्ट्र कृषी सौर पंप योजना 2022 या योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी , तुमच्या मनातील शंका , योजनेबाबत काही प्रश्न असतील यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या शाखेला भेट द्यावी तेथील बँक मॅनेजर सोबत या योजनेबाबत सविस्तर चर्चा करावी व त्यांच्या मार्गदर्शनाखाली अचूक अर्ज करून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा., धन्यवाद!
Comments are closed.