CBSE 2023 बारावीच्या निकालापाठोपाठ आता सीबीएसईचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना CBSE च्या वेबसाईटवर ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. सर्व विद्यार्थी हा निकाल पाहू शकतात. यासाठी तुम्हाला cbseresults.nic.in या वेबसाईटवर जायचं आहे. तिथे तीन लिंक देण्यात आल्या आहेत.
तुम्ही ही लिंक ओपन केल्यावर तुम्हाला एक नवीन विंडो ओपन होईल. त्यात तुमचा रोल नंबर, शाळेचा नंबर, बर्थ डेट आणि अॅडमिट कार्ड आयडी अपलोड केल्यावर सबमिट म्हणायचं आहे. तुम्हाला तिथे तुमचा निकाल पाहाता येणार आहे.
CBSE दहावीचा निकाल जाहीर :
गेल्या काही वर्षांपासून सीबीएसई 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी डिजिटल खाते उघडत आहे. ज्यामध्ये निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांची मार्कशीट उपलब्ध करून दिली जाते. खाते सुरक्षित ठेवण्यासाठी 6 अंकी पिन वापरला जातो. बोर्डाने या पिनचा तपशील शाळांना पाठवला आहे आणि शाळांना तो डाउनलोड करून प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षितपणे उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर बारावीचा निकाल पाहता येणार आहे. यासाठी cbse.gov.in, cbseresults.nic.in संकेतस्थळावर जाऊन निकाल चेक करता येईल. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्याना त्यांचा बैठक क्रमांक द्यावा लागेल.
CBSE 2023 12th Results Declared : बारावीचा निकाल जाहीर, इथे चेक करा रिजल्ट
सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 12 वी उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 87.33 टक्के इतकं आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे पास होण्याचं प्रमाण 6 टक्के जास्त आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरबारावीचा निकाल पाहता येणार आहे. यासाठी cbse.gov.in, cbseresults.nic.in संकेतस्थळावर जाऊन निकाल चेक करता येईल. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्याना त्यांचा बैठक क्रमांक द्यावा लागेल.
- सीबीएसईच्या cbseresults.nic.in संकेतस्थळावर जा
- होम पेजवर ‘CBSE 12th Result Direct Link’ लिंकवर क्लिक करा
- लॉग इन पेज ओपन झाल्यानंतर तुमचा बैठक क्रमांक आणि जन्मतारीख टाका.
- सीबीएसई या निकालाची प्रिंटही काढता येणार आहे.
- मार्कशीट डिजीलॉकरमध्ये
- गेल्या काही वर्षांपासून सीबीएसई 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी डिजिटल खाते उघडत आहे. ज्यामध्ये निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांची मार्कशीट उपलब्ध करून दिली जाते. खाते सुरक्षित ठेवण्यासाठी 6 अंकी पिन वापरला जातो. बोर्डाने या पिनचा तपशील शाळांना पाठवला आहे आणि शाळांना तो डाउनलोड करून प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षितपणे उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे.