Maharashtra Death Certificate online apply search and download | ऑनलाईन मृत्यू नोंद दाखला/मृत्यू प्रमाणपत्र कसे काढावे?।। फक्त २४ रुपयात प्रमाणपत्र कसे काढावे तेही घर बसल्या।। जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस |How to Apply for Death Certificate online in Maharashtra | Maharashtra Search Death Certificate online and Check Status मृत्यूची नोंद ऑनलाइन कशी करावी ? ( Death Certificate Online Registration ) … मित्रांनो खाली सविस्तर माहिती वाचा.
aaple sarkar फक्त २४ रुपयात मृत्यू नोंद दाखला/मृत्यू प्रमाणपत्र कसे काढावे
नमस्कार मित्रांनो , मृत्यू नोंद प्रमाणपत्र/मृत्यू प्रमाणपत्र Death Certificate online apply कसे काढावे, व का काढावे या विषयी आपण आज चर्चा करणार आहोत. मित्रांनो मृत्यु प्रमाणपत्र बऱ्याच ठिकाणी मागितले जाते, जसे की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला असेल आणि त्याच्या पुराव्यासाठी, मृत्यु प्रमाणपत्र वारसा हक्क प्रस्थापित करण्याकरिता,
विम्याची रक्कम मिळवण्याकरता, शासकीय योजनांचा लाभ घेण्याकरिता, मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या बँक खात्यातील रक्कम त्या व्यक्तीच्या वारसांना मिळविण्यासाठी, एखाद्या विधवा स्त्रीला शासकीय योजनांचा लाभ घ्यावयाचा असेल तर तिला तिच्या पतीचा मृत्यू दाखला मागितला जातो.
मृत्यूची नोंद ऑनलाइन कशी करावी ?
तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे मृत्यू झालेले असेल म्हणजेच व्यक्ती मयत झालेली असेल तर मृत्यु प्रमाणपत्र (Death Certificate online apply ) काढणे गरजेचे असते कारण मृत्यु प्रमाणपत्र महत्त्वाचे प्रमाणपत्र आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे मयत व्यक्तीच्या नावावर असलेली जमीन, मिळकत तसेच बँक खात्यावर असलेले पैसे वारसदारांना कायदेशीररित्या मिळवता येतात. मयत व्यक्तीच्या नावावर विमा असेल ( Insurance ) तरीसुद्धा विमा परतावा मिळविण्यासाठी मृत्यु प्रमाणपत्र खूपच महत्वाचे कार्य करते.
व्यक्तीच्या निधनानंतर विमा परतावा मिळवण्यासाठी तसेच सरकारी खाजगी कार्यालयीन कामासाठी मृत्यू प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे, तर आजच्या या लेखामध्ये आपण मृत्यु प्रमाणपत्र महाराष्ट्रामध्ये कशाप्रकारे काढावा, मृत्यु प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे, ऑनलाइन अर्ज कसा करावा यासंदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
Death Certificate online apply in marathi :
– ग्रामीण/शहरी भागातील नागरिकांनी जन्म-मृत्युची घटना घडल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, कॅन्टोमेंट बोर्ड/महानगरपालिका इ. ठिकाणी जन्म-मृत्युची माहिती घटना घडल्यापासून २१ दिवसांच्या आत दिली पाहिजे. वरील मुदतीच्या आत जन्म-मृत्युची नोंद व माहिती वेळेवर देणे कायद्याने सक्तीचे आहे. वरील मुदतीत नोंद करून लगेच दाखला मागितल्यास तो मोफत मिळतो.
ऑनलाईन फक्त २४ रुपयात मृत्यू नोंद दाखला/मृत्यू प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया:
मृत्यु नोंद दाखला ऑनलाईन काढण्यासाठी सर्वात आधी google chrome ओपन करून “आपले सरकारची” https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ हि वेबसाईट ओपन करायची आहे.
आपले सरकार टाईप /ओपन केल्यानंतर तुम्हाला उजव्या कोपऱ्याला 3 डॉट्स दिसतील, त्यावर क्लिक करून खाली यायचे आहे व डेस्कटॉप site सिलेक्ट करायची. त्यानंतर तुम्हाला जी पहिली लिंक दिसेल आपले सरकार त्यावर जायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर खाली यायचे आहे.


तुम्ही या संकेतस्ताळावर नवीन असाल तर तुम्हाला इथे नवीन अकाउंट ओपन करावा लागेल ,रजिस्ट्रेशन झाल्यावर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर युजर आयडी आणि पासवर्ड येईल तो टाकायचा आहे व तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे, तसेच खाली तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे व लॉगिन करायचे आहे.
आता तुमच्या पुढे आपले सरकारचे एक पेज ओपन होईल, त्याच्या उजव्या बाजूला इंग्लिश किंवा मराठी भाषा निवडण्यासाठी पर्याय दिलेला आहे, जर तुम्हाला मराठी भाषा निवडायचे असेल तर इंग्लिश वर सिलेक्ट करून त्याखाली मराठी भाषेचा पर्याय निवडा.
त्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला शासनाच्या विविध सेवा आहेत त्या दिसतील, तिथे तुम्हाला “ग्रामविकास व पंचायत राज विभाग” हा पर्याय निवडायचा आहे. तिथे मृत्यू नोंद दाखला या ऑपशन वर क्लिक करायचे आहे.

हा विभाग निवडल्यानंतर त्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या सेवांची यादी दिसेल यामध्ये जन्म नोंद दाखला, मृत्यु नोंद दाखला, निराधार असल्याचा दाखला, दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला असे बरेच पर्याय दिसतील. त्यातील “मृत्यु नोंद दाखला” या पर्यायावर क्लिक करायचे आहे, नंतर पुढे जा वर क्लिक करायचे आहे.

त्यानंतर “महाऑनलाईन” हे एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये “मृत्यु नोंद दाखला” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
मृत्यु नोंद दाखला-अर्जदाराची माहिती: आता अर्जदाराची माहिती हे पेज ओपन होईल त्यामध्ये मृत झालेल्या व्यक्तीचा जिल्हा, तालुका, ग्रामपंचायतीचे नाव, मृत व्यक्तिचे नाव, मृत्यूची तारीख, आधार क्रमांक, हि सर्व माहिती टाकायची आहे. व “समावेश करा” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

मृत्यू व्यक्तीचं नाव या ऑपशन खाली मृत्यू व्यक्तीचे नाव टाकायचे आहे. नंतर मृत्यूची तारीख टाकायची आहे त्यासाठी वर्ष महिना सिलेक्ट करायचा. मित्रांनो इथे तुम्हाला मृत व्यक्तीचा आधार कार्ड क्रमांक उपलब्ध असल्यास टाकायचा आहे. व त्यानंतर समावेश करा या ऑपशन वर क्लिक करायचे आहे. समावेश करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रीन वर एक मॅसेज येईल “तुमचा अर्ज यशस्वीरीत्या जतन करण्यात आला” आहे.व त्यामध्ये तुमचा अर्ज क्रमांक असेल तो जतन करून ठेवायचा आहे.
तसेच त्या मॅसेज मध्ये शुल्क भरा हा ऑपशन येईल, मृत्यु नोंद दाखला काढण्यासाठी २३.६० एवढे शुल्क आकारले जाते,ते शुल्क तुम्ही Wallet ,Net Banking, Credit /Debit Card ,IMPS ,UPI या माध्यमातून भरू शकता.
शुल्क भरल्यानंतर तुम्हाला 5 दिवसातच मृत्यु नोंद दाखला आपले सरकार या वेबसाइट वर मिळून जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तसेच Payment केल्यानंतर तुम्हाला जो कालावधी दिला जाणार आहे, पाच दिवस, दहा दिवस तर त्या तारखेला तुम्हाला इथं परत लॉग इन करायचं आहे username पासवर्ड टाकून. लॉग इन झाल्यानंतर खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता
एक ऑपशन ‘तुमच्या अर्जाचा आढावा’ तिथे खाली येऊन तुमच्या अर्जाच्या क्रमांका समोर उजव्या बाजूला आल्यावर प्रमाणपत्र डाउनलोड करा हा ऑपशन दिसेल. त्यावर तुम्हाला दिलेल्या कालावधी नंतर त्या ऑपशन वर क्लिक करून प्रमाणपत्र डाउनलोड करायचं आहे.
मृत्यूची नोंद ऑफलाईन कशी करावी ? ( Death Certificate Offline Registration )
आपण मृत्यूची नोंद ऑनलाईन कशी करावी ती प्रक्रिया बघितली आहे पण तुम्हाला जर मृत्यूची नोंद ऑफलाइन करायची असेल तर त्यासाठी 21 दिवसाच्या आत मृत्यू झाल्यानंतर जवळच्या निबंध कार्यालयामध्ये खालील माहिती देणे आवश्यक असते.
- मयत व्यक्तीची संपूर्ण नाव ( पुरावा )
- मयत व्यक्तीच्या वडिलांचे नाव
- आईचे नाव
- मयत व्यक्ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल तर, पतीचे किंवा पत्नीचे नाव
- कायमचा रहिवासी पत्ता
- मृत्यूसमयीचा राहता पत्ता
- अर्जदाराचे नाव व संपूर्ण पत्ता वरील सर्व माहितीची योग्यरीत्या पुर्तता केल्यानंतर निबंधक कार्यालयामार्फत पुढील प्रक्रिया केली जाते.
धन्यवाद !
सूचना- नोंदणी प्रक्रिया ह्या वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळासिस्टीम अपडेट मध्ये त्यात बदल घडतात, वर नमूद माहिती ही सध्या उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी आपणास भविष्यात जर बदल घडला तर अद्ययावत माहिती घ्यावी, अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
Disclaimer: We do not collect any information from the visitors of this website. Articles published here are only for information and guidance and not for any commercial purpose. We have tried our level best to keep maximum accuracy, however please confirm from relevant sources for maximum accuracy. Trade mark and copy rights are of respective owners of website.