E Peek Pahani Version 2.0 Maharashtra 2022 : नमस्कार शेतकरी बंधूंनो ,माझी शेती माझा सातबारा मिच नोंदविणार माझा पिक पेरा, या E Peek Pahani Version 2.0 ॲपमध्ये केलेल्या पीक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज मिळवणे शक्य होईल.नोंदणीसाठी खाली दिलेली सर्व माहिती शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचावी.

E Peek Pahani 2022 : सामान्यतः शेतकऱ्यांच्या पीक पेऱ्याची नोंद ही तलाठ्यांमार्फत केली जाते. बहुतांश वेळा प्रत्यक्ष गट क्रमांकात न जाता शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पीकपेरा नोंदवला जात असे. मात्र नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीमुळे नुकसानभरपाई देण्याची वेळ उद्भवल्यास शेतकरी व अधिकाऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ होई. शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकाची अचूक नोंद शासनाच्या अभिलेख्यांमध्ये व्हावी आणि त्याचा शेतकऱ्यांनाही संकटकाळात नुकसानभरपाईसाठी लाभ व्हावा या हेतूने ‘ई-पीक पाहणी’चा प्रकल्प राज्यात राबविण्यात येत आहे.

हे देखील नक्की वाचा :->> शेती : तुमच्या जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा? असा पहा मोबाईलवर5 मिनिटांत नकाशा..,
‘ई-पीक पाहणी Version 2.0 ॲप’ चे फायदे : सर्व शेतकरी बांधवांनी ई पिक पाहणी अॅपद्वारे आपल्या शेतामध्ये आपल्या शेतामध्ये उभ्या असलेल्या पिकांची नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. या डिजीटल प्रणालीद्वारे नोंदणी करण्यामुळे पिक विमा आणि पिक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रीया अधिक सुलभ होईल, तसेच नैसर्गीक आपत्ती मुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचुक भरपाई व मदत देणेही शासनाला शक्य होईल.

नवीन ई पिक पाहणी NEW VERSION 2.0 DOWNLOAD – येथे क्लिक करा
सूचना :- ७/१२ सातबारा वर पिकांची नोंदणीचीशेवची तारीख 14 ऑक्टोबर 2022 ही आहे याची शेतकरी बंधूनी नोंद घ्यावी , तरी काही तांत्रिक अडचणींमुळे कधी कधी हे ऍप नीट काम करत नाही अशा वेळेस काही वेळानंतर पुन्हा प्रयत्न करावा ,खाली पहा -> NEW VERSION 2.0 द्वारे ७/१२ सातबारा वर पिकांची नोंदणी, ‘ई-पीक पाहणी’ घरबसल्या करा तुमच्या मोबाईलवरून अचूक काशी करावी हे पाहून नोंद करण्यासाठी खाली Video पाहून लगेच नोंदणी करावी :->>