E-SHRAM कार्ड म्हणजे काय ? केंद्र सरकार केवळ शेतकऱ्यांसाठीच नवनवीन योजना राबवत नाही तर त्याच बरोबर असंघटीत कामगारांसाठीही योजना राबवल्या जात आहेत. ई-श्रम कार्ड आधारशी जोडलेला केंद्रीकृत डेटाबेस आहे. त्याचा वापर केंद्र आणि राज्य मंत्रालयांद्वारे लागू केलेल्या सामाजिक सुरक्षा लाभांच्या वितरणासाठी केला जाईल. हे स्थलांतरित आणि बांधकाम कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी लाभांची पोर्टेबिलिटी देखील सुनिश्चित करेल.

सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या देशातील करोडो लोकांसाठी ई-श्रम कार्ड सुरू केले. सरकारने ई-श्रम पोर्टल देखील सुरू केले, जिथून कामगारांना त्यांचे कार्ड बनवता येतील. यानंतर या कार्डधारकांना सरकारकडून बरीच मदत दिली जाईल आणि त्यांना अनेक योजनांचा लाभ मिळेल. अशा परिस्थितीत आम्हाला माहीत आहे की, हे कार्ड बनवण्याचे काय फायदे आहेत, ज्यामुळे असंघटित क्षेत्रातील लोकांना हे कार्ड बनवावे.
E-SHRAM कार्ड चे फायदे :
- (E-SHRAM) ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या कामगारांना 2 लाख रुपयांपर्यंतचा विमा लाभ मिळेल. ही प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत आहे. अपघातात कामगाराचा मृत्यू झाल्यास किंवा पूर्णपणे अपंगत्व आल्यास २ लाख रुपये आणि अंशतः अपंगत्व आल्यास १ लाख रुपये दिले जातात.
- ई श्रम कार्ड 3000 रुपये पेन्शन योजना तपशील. देशातील असंघटित क्षेत्रातील कामगार पेन्शनसाठी अर्ज करू शकतात. 3000 मासिक पेन्शन आणि इतर सरकारी कार्यक्रमांमध्ये त्वरित प्रवेश मिळवा.

E-SHRAM | ई-श्रम कार्ड साठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी :- इथे क्लिक करा.
कोण प्रात्र असणार?
ई-श्रम पोर्टलवर शेतकरी नोंदणी करू शकणार की नाही, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. या ठिकाणी केवळ शेतमजूर आणि भूमिहीन शेतकरीच नोंदणी करु शकतात. साधन शेतकरी वा ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शेतजमिनी आहेत, त्यांना या ठिकाणी नोंदणी करता येत नाही. केवळ कामगारांना याचा लाभ मिळावा हाच उद्देश सरकारचाही आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांना या योजनेत नाव नोंदणी करण्यासाठी उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नाही. 16 ते 59 या वयोगटातील कोणताही असंघटित कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर ज्याच्याकडे आधार कार्डशी जोडलेला नंबर नसेल तर अशांना नजीकच्या CSC सीएससी सेंटर / आपले सरकार सेवा केंद्रात वर जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी करता येते.

नोंदणी करण्याचे दोन पर्याय
ऑनलाईन नोंदणीसाठी कामगार ई-श्रम मोबाईल ॲप वा https://register.eshram.gov.in/#/user/self या संकेत स्थळांचा वापर करू शकतात. तसेच सेतू सुविधा केंद्र, राज्यसेवा केंद्र, कामगार सुविधा केंद्र आणि पोस्ट ऑफिसचे डिजिटल सेवा केंद्र इत्यादी ठिकाणी नोंदणी करता करता येणार आहे. नोंदणीनंतर असंघटित क्षेत्रातील कामगारांना एक युनिर्व्हसल 12 अंकी अकाऊंट नंबर आणि एक ई-श्रम कार्ड दिले जाते. युएएन देशभरात स्विकारार्ह असते. सामाजिक सुरक्षेसाठी कामगारांना वेगवेगळ्या ठिकाणी नोंदणी करण्याची गरज भासत नाही.
Comments are closed.