favarni pump anudan yojana 2022 | शेतकऱ्यांना मिळणार फवारणी यंत्रावर 50 टक्के अनुदान; पहा A to Z माहिती

Sprayer machine Subsidy maharashtra 2022 | ऐकलं का? आता पीक फवारणी यंत्रासाठी मिळणार अनुदान; ‘असा’ करा अर्ज..

फवारणी यंत्र योजना

नमस्कार बंधूंनो , Government scheme आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत की Sprayer machine Subsidy maharashtra 2022 सरकार फवारणी यंत्र वर किती अनुदान देते,आपल्याला ते अनुदान कशे मिळते, त्यासाठी आपल्याला काय करावे लागते अशी संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

फवारणी यंत्र अनुदान योजना

नमस्कार शेतकरी मित्रांनो , शेती क्षेत्र अधिक विकसित करण्यासाठी शासनाकडून (Maharashtra government) अनेक योजना राबविण्यात येतात. तसेच काही बाबींसाठी अनुदान देखील दिले जाते. जेणेकरून शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून जास्तीत जास्त उत्पादन घेवू शकेल. मात्र या योजनांची शेतकरी बंधूंना माहिती असणे आवश्यक आहे. चला तर मग आज आपण जाणून घेऊया फवारणी यंत्रासाठी अनुदान (Sprayer machine Subsidy) कसे मिळवायचे, यासाठी अर्ज कसा करावा, यासाठी किती प्रमाणात अनुदान दिलं जातं.

Sprayer machine Subsidy maharashtra 2022
Sprayer machine Subsidy maharashtra 2022

favarni yantra Maha DBT Yojna 2022

महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रराज्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र कृषि विभागांतर्गत कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान योजना 2022 पुन्हा एकदा अमलात आणली आहे. तसेच कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेती मधील उर्जेच्या वापराचे प्रमाण २ किलोवॅट/ हेक्टर पर्यंत वाढविणे हा या योजनेचा सारांश आहे. शेतकरी बंधुनो त्या कोणत्या योजना आहे ते आपण खाली सविस्तर बघूया.

कृषी विभाग :- Https://Mahadbtmahait.Gov.In/Farmer/Login/Login

कृषी विभाग महाराष्ट्र राज्य : – फवारणी यंत्र अनुदान योजना ही योजना सध्या चालू आहे लवकरात लवकर अर्ज करा व या योजनेचा लाभ घ्या .

rushi-yojana-maharashtra.jpg
पीक फवारणी यंत्रासाठी मिळणार अनुदान; ‘असा’ करा अर्ज..

पीक फवारणी यंत्राचे प्रकार आणि मिळणारे अनुदान

पीक फवारणी यंत्र म्हणजे पीक संरक्षण अवजारे होय. या फवारणी यंत्राच्या किंमतीनुसार 50 टक्के अनुदान दिलं जातं. यामध्ये 3 हजारांपासून 1 लाख 25 हजारापर्यंत अनुदान दिलं जातं. यात बॅटरी ऑपरेटर, सौर चलीत फवारणी यंत्र, ट्रॅक्टर माऊंटेड, ट्रॅक्टर ऑपरेटर अशा फवारणी यंत्रांचा समावेश होतो. या फवारणी यंत्रांच्या अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते जाणून घेऊया.

शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचे जीवनमान चांगले जावे यामुळे अनेक योजना राबवित आहे. त्यामधील ही एक नवीन योजना आहे या योजनेमध्ये सरकार शेतकऱ्यांना फवारणी यंत्र खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदान देणार आहे. मित्रांनो परंतु Farmers will get subsidy on spraying machine या योजनेकरिता आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागतो म्हणजेच आपल्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन नाव नोंदणी करावी लागणार आहे. यामुळे तुम्हाला सरकारच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागणार आहे त्या पोर्टल वर गेल्यावर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. सरकारचे अधिकृत पोर्टल आम्ही खाली लिंक मध्ये आहे त्यावर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता. Government scheme maharashtra 2022

यंत्र खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदान देणार
शेतकऱ्यांना फवारणी यंत्र खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदान देणार

कृषी यांत्रिकीकरण योजनेची पात्रता /आवश्यक कागदपत्रे  :

  1.  शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
  2. बँक पासबूक
  3. पॅन कार्ड
  4. व्यक्ति स्वतः व मोबाइल

रेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल

 जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )

 स्वयं घोषणापत्र

 पूर्वसंमती पत्र  इ.

  1.  शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा.
  2.  शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक।
  3.  फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार.

पीक फवारणी यंत्र अर्ज कोठे व कसा करायचा :

ही योजना संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे. या योजनेचा अचूक अर्ज करण्यासाठी शेतकरी बंधुनो तुम्ही तुमच्या गावातील / जवळच्या कॉम्प्युटर सेंटर मध्ये जाऊन अर्ज करू शकता.व त्या अर्जाची पोच पावती घेऊ शकता.

किंवा तुम्ही स्वत: जर ऑनलाइन क्षेत्रात हुशार असाल तर Maha- DBT येथे या लिंक वर क्लिक करून या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घ्या, व अर्ज करा. तसेच तुम्हाला काही शंका असल्यास तुमच्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्यांकडे या योजनेबद्दल चर्चा करा व लवकरात लवकर अर्ज करा. खाली वाचा >

सूचना:-

पोर्टलवरील प्राप्त अर्जांची ऑनलाईन लॉटरी, पूर्व संमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्याच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इ. सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. महाडीबीटी पोर्टलवर माहिती भरण्याची कार्यवाही सुरु झाली असून यापूर्वी अर्जदारांनी माहिती भरली असल्यास त्यांना नव्याने भरण्याची आवश्यकता नाही. मात्र लाभाच्या घटकांमध्ये शेतकरी त्यांना हवा तसा बदल करू शकतात. ज्यांनी अद्याप महा डीबीटी पोर्टलवर अर्ज केला नसेल, त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून घ्या.

असा करा अर्ज >

  • सर्वप्रथम ‘एक शेतकरी एक अर्ज’ म्हणजेच महाडीबीटी (Mahadbt) या पोर्टल वर आपला युजर आयडी पासवर्ड किंवा आपला आधार कार्ड आणि ओटीपी टाकून लॉगिन करायचे आहे.
  • यानंतर आपल्या प्रोफाईलची स्थिती दाखवली जाईल. यात वैयक्तिक तपशील तसेच इतर सर्व माहिती व्यवस्थित भरायची जेणेकरून आपला अर्ज या योजनेसाठी पात्र ठरवला जाईल.
  • यानंतर ‘अर्ज करा’ या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर सर्व योजनांची माहिती आपल्याला दिसेल.
  • यातील आपण कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचे अवजारे यासाठी अर्ज करू शकतो. यासाठी आपल्याला ‘बाबी निवडा’ वरती क्लिक करायचे आहे.
  • यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोरील एक अर्ज उघडेल. आपल्याला मुख्य घटक सर्वात प्रथम निवडायचे आहेत. मुख्य घटकमध्ये कृषी यंत्रे अवजारे खरेदीसाठी अर्थसाह्य यावर क्लिक करा.
  • यानंतर पुढची बाब आहे तपशील. या तपशीलमध्ये आपल्याला ट्रॅक्टर पावर टिलर चलीत अवजारे वर क्लिक करायचे आहे. यानंतर एचपी श्रेणी निवडा.
  • यानंतर यंत्रसामुग्री अवजारे उपकरणे निवडा. यातून पीक संरक्षण अवजारे संरक्षण अवजारे हा ऑप्शन निवडा.
  • यानंतर मशीनचे प्रकार निवडा.
  • यानंतर १) मी पूर्व संमती शिवाय कृषी अवजारांची खरेदी करणार नाही, खरेदी केल्यास मला अनुदानास पात्र राहता येणार नाही याची जाणीव आहे. २) माझ्या कुटुंबातील सदस्याच्या, माझ्या मालकीचा पावर ट्रेलर ट्रॅक्टर आहे. या दोन्ही बाबींवर क्लिक करायचे आहे.
  • यानंतर ‘जतन करा’ यावर क्लिक करायचे आहे.
  • यानंतर घटक तपशील यशस्वीरीत्या जोडले आहे. आपल्याला आणखी घटक जोडायचे आहे का? असे दिसेल जर तुम्हाला आणखी काही घटक जोडायचे असेल तर Yes करून जोडू शकता. नाहीतर No करून पुढे जाऊ शकता.
  • यानंतर पुन्हा मुख्यपृष्ठावर आल्यानंतर आपल्याला ‘अर्ज करा’ यावर क्लिक करायचे आहे.
  • यानंतर आपण आपल्या पसंतीच्या सर्व बाबी निवडल्या आहे का याची खात्री करा.
  • यानंतर ‘पहा’ वर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपण निवडलेल्या सर्व बाबी दिसतील. यावर आपल्या गरजेनुसार बाबींना प्राधान्यक्रम द्यावा.
  • ‘या योजनेंतर्गत ज्या बाबींसाठी आपली निवड होईल त्या अटी- शर्ती/ मार्गदर्शक सूचना लागू राहतील’ यावर टिक करा.
  • यानंतर अर्ज सादर करा यावर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर आपण यापूर्वीच या बाबींसाठी पेमेंट केलेलं होतं त्याच्यामुळे आपल्या पेमेंट करण्याचे ऑप्शन येणार नाही, परंतु 2021- 22 साठी अर्ज केलेला नसेल तर नव्याने अर्ज करत असाल तर मात्र आपल्याला डायरेक्टली अर्ज सादर करा वर क्लिक केल्यानंतर पेमेंट ऑप्शन दिला जाईल.
  • आपला हा अर्ज पात्र झाल्यास त्यावर काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल.
  • यानंतर संमतीपत्र दिलं जातं. या आधारे तुम्ही दिलेल्या कोटेशननुसार अवजार खरेदी करून बिल येथे जोडू शकता. यानंतर आपल्याला अनुदानाचा लाभ दिला जाईल.

अशाप्रकारे सर्व प्रक्रिया करून तुम्ही पीक फवारणी यंत्रासाठी अनुदान मिळवू शकतात.

इथे सविस्तर वाचा :> भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना | Falbag Lagwad Yojana 2022 | 100% शेतकरी अनुदान योजना  ऑनलाईन अर्ज सुरु

इथे सविस्तर वाचा :> 

इथे सविस्तर वाचा :> Diesel Pump Subsidy 2022 | डीजल पंप अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज सुरु लवकर करा अर्ज

महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकरी बांधवांसाठी  विविध योजना सुरु असतात. परंतु खूप कमी शेतकरी बांधवाना या योजनांचा लाभ मिळत असतो. अनेक शेतकरी बांधव केवळ माहिती नसल्यामुळे या शेतकरी सरकारी योजनांचा लाभ घेवू शकत नाहीत. शेतकरी अनुदान योजना किंवा महाराष्ट्र शासन कृषी योजना विषयी अधिक चांगल्या प्रकारे जागृती होणे गरजेचे आहे.

इथे वाचा :- ?? शेतकऱ्यांसाठी सरकारी अनुदान “अर्ज एक योजना अनेक”, Maha DBT पोर्टल योजना सुरु | शेतकरी योजना अर्ज सुरु आहे

सूचना- नोंदणी प्रक्रिया ह्या वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळासिस्टीम अपडेट मध्ये त्यात बदल घडतात, वर नमूद माहिती ही सध्या उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी आपणास भविष्यात जर बदल घडला तर अद्ययावत माहिती घ्यावी, अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.


Scroll to Top