Driving License Apply Online : RTO च्या फेऱ्या कशाला? विना ड्रायव्हिंग टेस्ट फक्त 7 दिवसात काढा लायसन्स; फॉलो करा सोपी प्रक्रिया..

Learning Driving License Apply : जर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं असेल, परंतु तुम्ही ड्रायव्हिंग टेस्ट पास व्हाल की नाही, याचा विचार करत असाल, तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला अशा पद्धतीबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी कोणतीही टेस्ट देण्याची गरज नाही. यामुळे तुम्हाला फक्त सात दिवसात ड्रायव्हिंग लायसन्स मिळेल. तुम्ही घरबसल्या ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करू शकता.

18 वर्षे वयोगटातील मुलांना मिळेल लर्निंग लायसन्स

दर महिन्याला हजारो लोक ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करतात. पण ड्रायव्हिंग टेस्टमध्ये नापास झाल्यामुळं अनेकांना परवाना मिळत नाही. ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमातही बदल करण्यात आला आहे. मोटार वाहन कायद्याच्या नियमांनुसार, 16 ते 18 वर्षे वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला वाहन चालविण्याचा परवाना मिळू शकतो. पण त्याला फक्त लर्निंग लायसन्स मिळेल. हा परवाना मिळाल्यानंतर ती व्यक्ती केवळ विना गिअरची गाडी चालवू शकणार आहे. जर तुम्हाला गीअरसह वाहन चालवायचं असेल तर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स बनवावं लागेल.

How To Get Online Learning Driving License 2022 – हा परवाना काढण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही यासाठी काही मिनिटांत तुमच्या घरच्या आरामात ऑनलाइन अर्ज करू शकता. एकदा तुम्ही चाचणी उत्तीर्ण केल्यावर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स सहज मिळू शकते. परंतु परवाना मिळवण्यासाठी तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणं आवश्यक आहे. तुमच्या घराचा पत्ता आणि वयाचा पुरावा दिल्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स सहज मिळेल. तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असल्यास तुम्ही लर्निंग लायसन्सवर गाडी चालवू शकत नाही. गाडी चालवण्यासाठी त्यासाठी पक्कं लायसन्स काढावं लागेल.

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करण्यासाठी फ़ॉलो करा या स्टेप्स

  • Learner Licence रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटला येथे क्लिक करून ->> (Https://Sarathi.Parivahan.Gov.In/Sarathiservice/StateSelection.Do) भेट द्या.
  • त्यानंतर तुम्ही रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर जाल ड्रॉप डाऊन लिस्ट मध्ये आपले राज्य Maharashtra निवडा
  • या नंतर आपल्याला यादीत उपलब्ध पर्यायांपैकी Apply For Learner Licence हा लर्निंग लायसन्स बनवून घेण्याचा पर्याय निवडायचा आहे
  • त्यानंतर Continue या बाटणवर क्लिक करा आत्ता पुढच्या पानावर Applicant Does Not Hold Any Driving/Learner Licence Issued In India हा पर्याय निवडा व General पर्याय निवडा व Submit म्हणा.
  • त्यानंतर तुम्हाला सर्व कागदपत्रे द्यावी लागतील, त्यानंतर आरटीओ त्यांची पडताळणी करेल.
  • कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर, तुम्हाला सात दिवसांच्या आत ड्रायव्हिंग लायसन्स मिळेल.
  • लक्षात ठेवा की चाचणी न देता तुम्ही फक्त लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकता.

मित्रांनो, वरील दिलेली घरबसल्या Learner Licence काढण्याची अर्ज प्रक्रिया समजण्यास अडचण येत असल्यास आमचा खाली दिलेला Video संपूर्ण पहा , संगीतल्याप्रमाणे घरबसल्या मिळवा शिकाऊ ड्रायव्हिंग लायसन्स->>

How To Get Online Learning Driving License 2022

 लर्निंग लायसन मिळाल्यानंतर तुम्हाला 30 दिवसानंतर परत ड्रायव्हिंग लायसन साठी आपलाय करावे लागेल हे परमनंट ड्रायव्हिंग लायसन असते. दरम्यान, चालकाला शिकाऊ लायसन्सची मुदत संपल्यावरच कायमस्वरूपी लायसन्स मिळवण्यासाठी RTO आरटीओत यावे लागेल. शिकाऊ परवान्याची मुदत सहा महिने इतकी असते. अधिक माहितीसाठी :-Phone No: 0120-4925505 From 6 Am To 10 Pm All Days / E-Mail Id:Helpdesksarathi@Gov.In


Scroll to Top