Income Tax Bharti 2023 : आयकर विभागात पर्सनल सेक्रेटरी पदांची नविन भरती; वेतन 44,900 ते 1,42,400 रुपये मिळेल, इथे लगेच अर्ज करा…

Income Tax Department Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आयकर विभागात प्रायव्हेट सेक्रेटरी, सीनिअर पर्सनल सेक्रेटरी आणि पर्सनल सेक्रेटरी या तीन पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या संदर्भात आयकर विभागाने अधिकृत नोटिफिकेशन जारी केलं आहे. या पदांसाठीची शैक्षणिक पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर जाणून घेऊया.

आयकर विभागात प्रायव्हेट सेक्रेटरी, सीनिअर पर्सनल सेक्रेटरी आणि पर्सनल सेक्रेटरी या पदांसाठी आठ जागा भरण्यात येणार आहेत. या जागांसाठी पात्र आणि भारतीय उमेदवार अर्ज करू शकतात. या भरतीबाबत अर्थ मंत्रालयाने अधिकृत नोटिफिकेशन जारी केलं आहे. प्रायव्हेट सेक्रेटरी या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी 25 मे 2023 पर्यंत तर इतर पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी 31 मे 2023 पर्यंत अर्ज करणं आवश्यक आहे.

आयकर विभागाच्या नोटिफिकेशननुसार, प्रायव्हेट सेक्रेटरीची तीन, सीनिअर पर्सनल सेक्रेटरीची दोन तर पर्सनल सेक्रेटरीची तीन पदं या प्रक्रियेतून भरली जाणार आहेत. ही तिन्ही पदं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असतील. प्रायव्हेट सेक्रेटरी या पदावर नियुक्त करण्यात आलेल्या उमेदवाराच्या नेमणुकीचा कालावधी तीन वर्षांचा असेल आणि इतर दोन पदांवर नियुक्त करण्यात आलेल्या उमेदवारांच्या नेमणुकीचा कालावधी हा एका वर्षाचा असेल. प्रायव्हेट सेक्रेटरी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 56 वर्षापेक्षा कमी असावे आणि इतर सर्व पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय 63 वर्षांपर्यंत असावे.

पर्सनल सेक्रेटरी या पदासाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार या पदासाठी अर्ज करणारी व्यक्ती केंद्रीय सचिवालयातील स्टेनोग्राफर विभागातून प्रायव्हेट सेक्रेटरी/पर्सनल असिस्टंट पदावरून किंवा समतुल्य स्तरावरील इतर कोणत्याही पदावरून आणि सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी असावेत. उमेदवारांचा इंग्रजी स्टेनोग्राफीचा वेग @ 100 w.p.m. असावा (उमेदवाराला कॉम्प्युटरवर सात मिनिटांचे डिक्टेशन 50 मिनिटांत ट्रान्सक्राईब करता यावेत.) या पदासाठी न्यायालये/ न्यायाधिकरण/निर्णय प्राधिकरणात काम करण्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल.

आयकर विभागात पर्सनल सेक्रेटरी पद भरतीची अधिकृत PDF/जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

📑 पर्सनल सेक्रेटरी पद भरती अर्जाचा नमूना (ऑफलाइन फॉर्म) डाऊनलोड करण्यासाठी :- येथे क्लिक करावे

प्रायव्हेट सेक्रेटरी या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी संबंधित विभागात किंवा पॅरेंट केडरमध्ये स्टेनोग्राफर किंवा तत्सम पदावर नियमित काम केलेले असावे. तसेच उमेदवाराने या पदावर 5500-175-9000 (पूर्वसुधारित) या वेतनावर संबंधित विभागात किंवा पॅरेंट केडरमध्ये तीन वर्ष सेवा केलेली असावी.

सीनिअर पर्सनल सेक्रेटरी या पदासाठी इच्छुक उमेदवार सीनिअर प्रायव्हेट सेक्रेटरी/ प्रायव्हेट सेक्रेटरी/ केंद्रीय सचिवालयातील स्टेनोग्राफरचा पर्सनल असिस्टंट किंवा समतुलय स्तरावरील इतर कोणत्याही तत्सम सेवतून सेवानिवृत्त झालेला अधिकारी असावा. उमेदवारांचा इंग्रजी स्टेनोग्राफीचा वेग @ 100 w.p.m. असावा (उमेदवाराला कॉम्प्युटरवर सात मिनिटांचे डिक्टेशन 50 मिनिटात ट्रान्सक्राइब करता यावेत.) या पदासाठी न्यायालये/ न्यायाधिकरण/निर्णय प्राधिकरणात काम करण्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

आयकर विभागाच्या अधिकृत नोटिफिकेशननुसार, प्रायव्हेट सेक्रेटरी आणि पर्सनल सेक्रेटरी या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना दरमहा वेतनश्रेणी स्तर 7 नुसार ( 44,900 – 1,42,400 रुपये) वेतन दिले जाईल. तसेच सीनिअर पर्सनल सेक्रेटरी या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना दरमहा वेतनश्रेणी स्तर 8 नुसार वेतन दिले जाईल.

 PDF जाहिरात : https://cutt.ly/6GUhlYM
अधिकृत वेबसाईट : www.incometaxindia.gov.in
👉 अर्जाचा नमूना (ऑफलाइन फॉर्म)येथे क्लिक करावे

या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी रजिस्ट्रार, अपील न्यायाधिकरण, ए विंग, चौथा मजला, लोकनायक भवन, खान मार्केट, नवी दिल्ली -110023 या पत्त्यावर मेल किंवा स्पीड पोस्टाद्वारे संपूर्ण माहिती भरलेला अर्ज पाठवावा. प्रायव्हेट सेक्रेटरी पदासाठीचा अर्ज 25 मे 2023 पूर्वी तर अन्य पदांसाठीचा अर्ज 31 मे 2023 पूर्वी पोहोचला पाहिजे. अपूर्ण किंवा शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेला अर्ज नाकाराला जाईल, असं नोटिफिकेशनमध्ये म्हटलं आहे. या पदांसाठीच्या सविस्तर माहितीकरिता उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.

Leave a Comment


Scroll to Top