Jan samarth Loan portal |जन समर्थ पोर्टलवर नागरिकांना मिळणार सरकारी कर्ज |शेतकऱ्यांसाठी सरकारच्या 13 सुविधा , आजच अशी करा तुमची नोंदणी…,

Jan samarth portal चे मोदींच्या हस्ते उद्घाटन कर्ज योजनांचा महापूर

Jan samarth Loan portal: केंद्र सरकार लवकरच विविध मंत्रालये आणि विभागांमार्फत चालवल्या जाणाऱ्या योजनांच्या पुरवठ्यासाठी ‘जन समर्थ’ हे समान पोर्टल सुरू करणार आहे. या समान पोर्टलमुळे सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य होईल, असा सरकारचा विश्वास आहे.आणि याचा फायदा शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात होणार आहे .

अर्थ सेवा सचिव संजय मल्होत्रा म्हणाले की, “या कार्यक्रमाच्या पाहिळल्या दिवशी ८ सरकारी विभागांच्या १३ योजनांचे क्रेडिट- लिंक्ड पोर्टल प्रदर्शित करण्यात येणार आहे. या पोर्टलमुळे विविध योजनांवर लाभार्थी लक्ष ठेवू शकतील. पुढे आम्ही त्यात जास्तीत जास्त योजनांचा समावेश करणार आहोत. त्याचबरोबर या पोर्टलला Bank बँकाशी जोडून लाभार्थीसाठी प्रक्रिया सोपी करणार आहोत.”

नुकतेच जन समर्थ पोर्टल jan samarth portal चे उद्घाटन करण्यात आले आहे. या पोर्टलद्वारे विविध १३ योजनाअंतर्गत लाभार्थींना कर्ज Loan उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Jan samarth Loan portal |जन समर्थ पोर्टलवर नागरिकांना मिळणार सरकारी कर्ज |शेतकऱ्यांसाठी सरकारच्या 13 सुविधा , अशी करा तुमची नोंदणी...,
शेतकरी 13 सुविधा :- Jan Samarth Loan POrtal

सुरुवातीला 13 सरकारी कर्ज-संबंधित योजनांचा समावेश:

नरेंद्र मोदी सरकारच्या ‘किमान सरकार कमाल प्रशासन’ या व्हिजनच्या अनुषंगाने नवीन(new) पोर्टलवर सुरुवातीला 12 ते 15 सरकारी (Loan) कर्ज-संबंधित योजनांचा समावेश केला जाईल. या पोर्टलचा हळूहळू विस्तार करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. हा विस्तार पोर्टलच्या(Loan portal) कामकाजावर आधारित असेल, कारण अनेक एजन्सी काही केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये गुंतलेल्या आहेत. उदाहरणार्थ, प्रधानमंत्री आवास योजना आणि सीएलसीएसएस वेगवेगळ्या मंत्रालयांतर्गत येतात.

या योजना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रस्तावित पोर्टलचा उद्देश असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ घेणे सोपे होणार आहे. या पोर्टलची पायलट ट्रायल सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोर्टलमधील त्रुटी दूर केल्या जात आहेत. त्यानंतर हे पोर्टल सुरू केले जाईल.स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर कर्जदार पोर्टलची चाचणी घेत आहेत. या पोर्टलचे आर्किटेक्चर खुले होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. भविष्यात राज्य सरकारे आणि इतर संस्थांनाही त्यांच्या योजना या पोर्टलवर ठेवता येतील.

जन समर्थ पोर्टल वर कोणकोणत्या योजना उपलब्ध आहेत. त्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करावे लागते या संदर्भातील सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवट पर्यंत वाचा.

हे वाचले का तुम्ही :- Pm Kisan : तुमच्या आधार NPCI ला जे बँक अकाउंट लिंक असेल त्याच बँक अकाउंट मध्ये येथून पुढे 2000 रु. चा हफ्ता जमा होईल ; चेक करा तुमच्या आधार कार्डला कोणती बँक Link आहे

jan samarth Loan portal वर सर्व कर्जांच्या योजना एकाच ठिकाणी मिळणार

सर्व सामान्य नागरिक, विद्यार्थी तसेच व्यावसायिकांना कर्ज Loan मिळण्याची प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी दिनांक ६ जून २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जनसमर्थ पोर्टलचे उद्घाटन करण्यात आहे.

जन समर्थ पोर्टलवर कर्ज घेण्याची पात्रता तपासण्यात येते. एकदा का लाभार्थी दिलेल्या योजनांसाठी पात्र झाला कि मग त्यांना कर्ज Bank Loan घेण्यासाठी ज्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरावा लागतो त्यावर रीडायरेक्ट केले जाते.

अनेक नागरिकांना कर्ज Bank Loan मिळविण्यासाठी वेगवेगळ्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. हि विवंचना थांबावी व एकाच ठिकाणाहून विविध कर्ज योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने जनसमर्थ पोर्टल jan samarth Bank Loan portal सुरु करण्यात आलेले आहे.

jan samarth portal काय आहे जाणून घ्या.

जन समर्थ पोर्टलवर विविध प्रकारच्या १३ योजना उपलब्ध आहेत. या योजनांचे खालीलप्रमाणे प्रमुख ४ श्रेणी म्हणजेच भाग पाडण्यात आलेले आहेत.

  • शैक्षणिक कर्ज.
  • कृषी पायाभूत सुविधा कर्ज.
  • व्यावसायिक कर्ज.
  • उपजीविका कर्ज.

वरीलप्रमाणे ४ श्रेण्यामध्ये एकूण १३ योजना या ठिकाणी राबविल्या जाणार आहेत. या चार श्रेण्यापैकी एका श्रेणीसाठी किती आणि कोणत्या योजना आहेत ते जाणून घेवूयात.

jan samarth portal शैक्षणिक कर्ज श्रेणी.

शैक्षणिक कर्ज श्रेणीमध्ये खालील प्रमाणे योजना उपलब्ध आहेत.

  • केंद्रीय क्षेत्र व्याज सबसिडी योजना ( csis )
  • पढो परदेश Padhao pardesh – परदेशी अभ्यासासाठी शैक्षणिक कर्जावरील व्याज सबसिडी योजना.
  • डॉ. आंबेडकर केंद्रीय क्षेत्र योजना.

वरील योजनेचा लाभ विद्यार्थी घेवू शकतात. शिक्षण घेण्यासाठी या योजनेतून विद्यार्थ्यांना कर्ज मिळू शकते.

हे वाचले का तुम्ही :- Pm Kisan योजनेचा या नागरिकांना दणका | REFUND पैसे द्यावे लागणार परत ? | Refund यादीत तुमचे नाव चेक करा.

कृषी पायाभूत सुविधा कर्ज.

विकास घडवून आणण्यासाठी कृषी पायाभूत सुविधा कर्ज श्रेणी अंतर्गत खालील योजनांचा लाभ मिळणार आहे.

या आठवड्यात एका नवीन क्रेडिट लिंक्ड पोर्टल ‘जन समर्थ’ या नावाने सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ६ जून रोजी या पोर्टलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

  • कृषी दवाखाने आणि कृषी व्यवसाय केंद्र योजना.
  • शेती/कृषी पायाभूत सुविधा निधी.

वरीलप्रमाणे दोन योजना अंतर्गत लाभार्थींना कृषी कर्ज मिळू शकणार आहे.

jan samarth portal व्यावसायिक कर्ज Loan योजना

ज्यांना व्यवसाय उद्योग उभा करायचा आहे आणि त्यांना यासाठी कर्ज हवे आहे त्या संबधित विविध योजनांसाठी लाभार्थ्याला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

यामध्ये खालील योजनांचा समावेश आहे.

  • पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम.
  • विणकर मुद्रा योजना ज्याला wms योजना देखील म्हटले जाते.
  • प्रधानमंत्री मुद्रा योजना म्हणजेच PMMY scheme.
  • पीएम स्वनिधी योजना. pm swanidhi scheme.
  • सफाई कामगारांच्या पुनर्वसनासाठी स्वयं रोजगार योजना.
  • Stand up India योजना.

या प्रकारे व्यवसाय उद्योग उभा करू इच्छित व्यक्तींसाठी वरील योजनांचा लाभ दिला जाणार आहे.

उपजीविकेचे कर्ज

दीनद्याल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन हि एकच योजना या श्रीनिमध्ये आहे. या योजनेचा लाभ घेण्यासठी पोर्टलवर लिंक दिलेली असते त्या लिंकवर क्लिक करून संबधित वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करवा लगतो.

jan samarth Loan portal वर ऑनलाईन अर्ज करण्याधी तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का शिवाय योजनेचे स्वरूप काय आहे, कोणकोणते कागदपत्रे लागतात हि आणि इतर महत्वाची माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसते. हि सर्व माहिती वाचल्यानंतर योजनेचा लाभ घेणे अधिक सोयीचे होते.

जनसमर्थ पोर्टल वर कर्ज साठी अर्ज कसा करायचा ?

सध्या पाच कर्जाच्या श्रेणी आहेत आणि प्रत्येक कर्ज श्रेणी अंतर्गत विविध योजना उपलब्ध आहेत. तुमच्या पसंतीच्या कर्ज श्रेणीसाठी, तुम्हाला आधी काही सोप्या प्रश्नांची उत्तरे देऊन पात्रता तपासावी लागेल आणि एकदा तुम्ही कोणत्याही योजने अंतर्गत पात्र झाल्यावर, तुम्ही डिजिटत मंजुरी मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढे जाणे निवडू शकता.

जनसमर्थ पोर्टल वर कर्ज साठी कोणती कागदपत्रे लागतात ?

प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळ्या कागदपत्रांची आवश्यकता असते. पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी, आधार क्रमांक, मतदार ओळखपत्र, पॅन, उत्पन्न दस्तावेज (ITRs), बँक स्टेटमेंट्स इत्यादी मूलभूत कागदपत्रे आहेत.

असे करा ऑनलाईन रजिस्ट्रेशन

  • जन समर्थ पोर्टलला भेट द्या किंवा येथे क्लिक करा
  • या ठिकाणी तुम्हाला Register असे बटन दिसेल त्यावर क्लिक करा.
  • एक चौकट ओपन होईल त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर व कॅपचा कोड टाका आणि get otp या बटनावर क्लिक करा.
  • मोबाईलवर आलेला otp दिलेल्या चौकटीमध्ये टाका आणि सबमिट otp या बटनावर क्लिक करा.
  • otp व्यवस्थित टाकल्यानंतर तुम्हाला पासवर्ड दिलेल्या पद्धतीने टाकायचा आहे.
  • पासवर्ड व्यवस्तीत टाकल्यानंतर proceed या बटनावर क्लिक करा. तुमची नोंदणी पूर्ण होईल.
Jan samarth Loan portal |जन समर्थ पोर्टलवर नागरिकांना मिळणार सरकारी कर्ज |शेतकऱ्यांसाठी सरकारच्या 13 सुविधा , अशी करा तुमची नोंदणी...,
Jan samrth portal 2022 new registration lonch

योजनेसाठी कागदपत्रे आणि योग्यता

कोणत्याही योजने अंतर्गत तुम्हाला लोन घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला jan samarth portal वर कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे ती सर्व डाउनलोड करण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

लोन घेण्यासाठी एखाद्या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का हे देखील तपासले जाते. शिवाय नेहमी विचारले जाणाऱ्या प्रश्नांची यादी या ठिकाणी दिलेली आहे. हे प्रश्न वाचल्यानंतर सर्व योजना समजून जाते

?? अधिक माहितीसाठी तसेच पोर्टल कसे काम करते व नोंदणी कशी करता येईल यासाठी खालील मार्गदर्शक Video पहावा.


Scroll to Top