Jilha Parishad Nashik Bharti 2023 : जिल्हा परिषद, नाशिक आस्थापनेवरील गट क संवर्गात मोडणाऱ्या विविध पदांसाठी भरती सुरू झालेली असून याची अधिकृत जाहिरातसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. प्रस्तुत जाहिरातीच्या माध्यमातून विविध अशा 1038 रिक्त पदांची भरती होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया 05 ऑगस्ट 2023 पासून सुरू झालेली असून अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 असेल.
Jilha Parishad Nashik Bharti 2023
🔔 पदाचे नाव : आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे)
🔔 एकूण पदसंख्या : 1038
📚 शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे 👇
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
Pharmacist (औषध निर्माता) | औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण करणारे आणि औषध शाळा अधिनियम 1948 खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार |
Health workers (Male) (आरोग्य सेवक) | विज्ञान विषय घेवुन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार. |
Health workers (Female) (आरोग्य सेविका) | ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेम नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील |
Health Supervisor (आरोग्य पर्यवेक्षक) | ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केलेली असेल आणि ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याचा पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. |
Gram Sevak (ग्रामसेवक) | किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता परीक्षेत किमान 60 % गुणांसह उत्तीर्ण किंवा शासन मान्य संस्थेची अभियंत्रिकी पदविका (तीन वर्षाचा अभ्यासक्रम) किंवा प्रशासन मान्य संस्थेची समाजकल्याणची पदवी (बी एस डब्ल्यु) किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य अर्हता आणि कृषि पदविका दोन वर्षाचा अभ्यासक्रम |
Junior Engineer (G.P.P.) (कनिष्ठ अभियंता) | स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार |
Junior Engineer (Mechanical) (कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)) | यांत्रिकी अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार |
Junior Engineer (Electrical) (कनिष्ठ अभियंता (विद्युत)) | विद्युतअभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार |
Junior Engineer (Civil) (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)) | स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार |
Junior Engineer (Civil) (L.P.) (कनिष्ठ अभियंता (L.P.)) | स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार |
Junior Draftsman (कनिष्ठ आरेखक) | माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र |
Junior Accounts Officer (कनिष्ठ लेखाधिकारी) | ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली असेल व कोणतेही सरकारी कार्यालय व्यापारी भागीदार संस्था अथवा स्थानिक प्राधिकरण यातील किमान 5 वर्षाचा अखंड सेवेचा ज्यांना अनुभव असेल अशा उमेदवारामधुन नामनिर्देशनाव्दारे नेमणुक करण्यात येईल. या बाबतीत लेखाशास्त्र आणि लेखा परीक्षा हे विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणान्यांना अथवा प्रथम वा व्दितीय वर्गातील पदवी धारण करणा-यांना अधिक पसंती दिली जाईल किंवा गणित अथवा सांख्यिकी अथवा लेखा शास्त्र व लेखा परिक्षा है। प्रमुख विषय घेऊन पदव्युत्तर पदवी धारण करीत असतील अशा | उमेदवारांमधुन नामनिर्देशनाव्दारे नेमणुक करण्यात येईल. याबाबतीत कोणत्याही सरकारी कार्यालयातील अथवा व्यापारी संस्थेतील अथवा स्थानिक प्राधीकरणातील लेखा कार्याचा अनुभव असणाऱ्यास अधिक पसंती दिली जाईल. |
Junior Assistant (Clerk) (कनिष्ठ सहाय्यक (लिपीक)) | माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील आणि महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांनी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा | घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने किंवा आयुक्त, शासकीय परीक्षा विभाग, शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी अनुक्रमे मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे दर मिनीटास 30 शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील किंवा टंकलेखनामध्ये 50 टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील असे उमेदवार |
Junior Assistant Accounts (कनिष्ठ सहाय्यक लेखा) | माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार तसेच महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे दर मिनीटास 30 शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील किंवा टंकलेखनामध्ये 50 टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील असे उमेदवार |
Jodari (जोडारी) | जे उमेदवार चौथी उत्तीर्ण झाले असतील ज्यांना किमान दोन वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव असेल, शासकीय तंत्र शाळेतून विहित केलेला जोडाऱ्याचा पाठ्यक्रम किंवा तुल्य पाठ्यक्रम उत्तीर्ण झाले असतील. |
Electrician (तारतंत्री) | महाराष्ट्र शासनाच्या अनुज्ञापन मंडळाने दिलेले तारतंत्रीचे दुसऱ्या वर्गाचे प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता धारण करीत असतील असे उमेदवार |
Supervisor (पर्यवेक्षिका) | ज्या महिला उमेदवारांनी एखादया संविधिक विद्यापीठाची, खास करुन समाजशास्त्र किंवा गृहविज्ञान किंवा शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण किंवा समाजशास्त्र या विषयातील स्नातक ही पदवी धारण केलेली आहे. |
Livestock Supervisor (पशुधन पर्यवेक्षक) | संविधिक विद्यापीठाची, पशुवैद्यक शास्त्रातील पदवी । धारण करीत असलेल्या व्यक्ती, किंवा पशुधन पर्यवेक्षक, पशुपाल, पशुधन सहाय्यक, सहायक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन विकास अधिकारी (ब श्रेणी) या बाबतची पशुसंवर्धन संचालनालयाने दिलेली पुढील पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करणा-या व्यक्ती. पशुधन पर्यवेक्षक त्यावेळच्या मुंबई राज्याने चालविलेल्या अभ्यासक्रमासह, पशुवैद्यक पशुपाल प्रशिक्षण अभ्यासक्रम |
Laboratory Technician Mechanics (प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांत्रिकी) | ज्याने मुख्य विषय म्हणुन भौतीकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र अथवा प्राणीशास्त्र किंवा सुक्ष्म जीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केली असेल अशा उमेदवारातून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. |
Rigman (रिगमन) | शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण अथवा तिच्याशी समतुल्य जाहिर शैक्षणिक अर्हता आणि जड माल वाहन अथवा जड प्रवासी वाहनाचा, जड वाहन कामाचा वैध परवानाधारक असेल तर त्यास जड माल वाहनाचा अथवा जड प्रवासी वाहनाचा एक वर्षापेक्षा कमी अनुभव नसावा. |
Stenographer (Higher Grade) (लघुलेखक (उच्च श्रेणी)) | महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार तसेच आयुक्त शासकीय परिक्षा विभाग, शिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेले किंवा या नियमांचे प्रयोजनार्थ शासनाकडुन विनिर्देशपूर्वक मान्यता देण्यात आलेल्या अन्य कोणत्याही संस्थेने दिलेले किंवा मराठी लघुलेखनातील दर मिनिटास 120 श.प्र.मि. पेक्षा कमी नसेल इतक्या गतीचे आणि इंग्रजी टंकलेखनातील दर मिनिटास 40 श.प्र.मि किंवा मराठी टंकलेखनातील दर मिनिटास 30 श.प्र.मि. कमी नसेल इतक्या गतीचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक |
Stenographer (Lower Grade) (लघुलेखक (निम्न श्रेणी) | महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार तसेच आयुक्त शासकीय परिक्षा विभाग, शिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेले किंवा या नियमांचे प्रयोजनार्थ शासनाकडुन विनिर्देशपूर्वक मान्यता देण्यात आलेल्या अन्य कोणत्याही संस्थेने दिलेले किंवा मराठी लघुलेखनातील दर मिनिटास 120 श.प्र.मि. पेक्षा कमी नसेल इतक्या गतीचे आणि इंग्रजी टंकलेखनातील दर मिनिटास 40 श.प्र.मि किंवा मराठी टंकलेखनातील दर मिनिटास 30 श.प्र.मि. कमी नसेल इतक्या गतीचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक |
Senior Assistant (Clerk) (वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)) | पदवीधर |
Senior Assistant Accounts (वरिष्ठ सहाय्यक लेखा) | पदवीधर व 03 वर्षाचा अनुभव |
Extension Officer (Agriculture) (विस्तार अधिकारी (कृषि)) | ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कृषि विषयातील पदवी किंवा इतर कोणतीही अर्हता धारण केली असेल अशा उमेदवारांची नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. परंतू कृषि विषयातील उच्च शैक्षणिक अर्हता आणि कृषि विषयक कामाचा अनुभव किंवा कृषि पद्धतीचे व्यवसायाचे ज्ञान व ग्रामीण जीवनाचा अनुभव असेल अशा उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल. |
Extension Officer (Panchayat) (विस्तार अधिकारी (पंचायत)) | जे उमेदवार विधिद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी धारण करीत असतील असे उमेदवार परंतू ग्रामीण समाजकल्याण व स्थानिक विकास कार्यक्रमांचा तीन वर्षाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य |
Extension Officer (Education) (विस्तार अधिकारी (शिक्षण)) | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.एड. अथवा समकक्ष पदवी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांना मान्यताप्राप्त प्राथमिक / माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय, |
Extension Officer (Statistics) (विस्तार अधिकारी (सांख्यिकी) | संविधिमान्य विद्यापिठाची विज्ञान, कृषि, वाणिज्य किंवा वाङ्मय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित अथवा सांख्यिकी विषयासह प्रथम अगर द्वितीय वर्गातील पदवी धारण करीत असतील किंवा ज्यांना नमुना सर्वेक्षण करण्याचा अनुभव असेल, | अनुभव दोन्ही असतील असे उमेदवार परंतु, अशा विषयांपैकी एका विषयाची स्नातकोत्तर पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल |
Civil Engineering Assistant (स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक) | माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्ष कंवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील, आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा एक वर्षाचा पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण आलेले उमेदवार संविधीमान्य तत्सम खालील पाठ्यक्रम 1) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या एक वर्षाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा 2) आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन (वास्तुशास्त्रीय आरेखक), किंवा 3) कन्स्ट्रक्शन सुपरवायझर वेक्षक), 4) सैनिकी सेवेतील बांधकाम पर्यवेक्षकाचे अनुभव प्रमाणपत्र किंवा स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदविका, पदवी, पदव्युत्तर धारण करत असलेला उमेदवार |
💁 वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी नियमानुसार वयोमर्यादित सूट देण्यात येईल)
💸 परीक्षा फीस : खुलाप्रवर्ग रु. 1,000/- राखीव प्रवर्ग रु. 900/-
💰 पगार/वेतनश्रेणी : रु. 19,900 ते 1,12-400 पर्यंत
✈️ नोकरीचे ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन
🗓️ आवश्यक वेळापत्रक : खालीलप्रमाणे 👇

📅 अर्ज सुरू होण्याची तारीख : 5 ऑगस्ट 2013
📅 अर्जासाठी शेवटची तारीख : 25 ऑगस्ट 2023
संपूर्ण PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
- या भरतीकरिता उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा आहे.
- उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
- इतर कोणत्याही वेबसाईटवर अथवा माध्यमातून अर्ज करण्यात आल्यास अशा उमेदवाराचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
- ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी संबधित विभागाकडून देण्यात आलेली सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, त्यानंतरच अर्ज करावा.
- अर्ज करत असताना सर्व मूलभूत शैक्षणिक कागदपत्र योग्यता प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
- संपूर्ण अर्ज भरला झाल्यानंतर सर्व माहिती आवश्यक पडताळणी करावी त्यानंतरच अंतिम अर्ज दाखल करावा.
- अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 देण्यात आलेली आहे, याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.
- सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल, तर त्यांनी वरील रखाण्यात देण्यात आलेली सविस्तर जाहिरात वाचावी.