Kanda chal yojana 2022 | Onion Chaal Grant Scheme 50% Online Form | kanda chal anudan |
Kanda Chal Online Form: कांदा चाळ अनुदान योजना 50% ऑनलाईन फॉर्म Maha DBT राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत कांदा चाळ योजना सुरू Kanda Chal Online Form: Kanda Chaal Grant Scheme 50% Online Form Kanda Chaal Scheme launched under Maha DBT National Horticulture Campaign
नमस्कार शेतकरी बांधवांनो; महाराष्ट्रामध्ये सर्व पिकांबरोबर कांदा हा प्रमुख पीक मानला जातो.शेतकरी त्यांच्या जमिनीत सगळ्यात जास्त पीक ते म्हणजे कांद्याचं घेत असतो.आणि 99% शेतकरी जास्त प्रमाणात कांदा ह्या पिकवरच अवलंबून असतात. महाराष्ट्रातील कांदा हा स्वादिष्ट कांदा म्हणून ओळखला जातो.यामुळे बाहेरील देशात देखील याची निर्यात होत असते.(Kanda chal Anudan Yojana 2022 )
◆ कांदा चाळ अनुदान योजना 2022 kanda chal 2022
मित्रांनो सर्वसाधारणपणे कांदा जमिनीवर पसरून ठेवून किंवा स्थानिक रीत्या तयार केलेल्या चाळीमध्ये कांद्याची साठवण करत असताना विविध प्रकारचा शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. तर काही प्रमाणामध्ये कांदा सडून गेलेला असतो. तर काहीं मध्ये सर्वसाधारणपणे कांदा जमिनीवर पसरून ठेवून किंवा स्थानिक रीत्या तयार केलेल्या चाळीमध्ये कांद्याची साठवण करत असतात. विविध प्रकारचा शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. एवढं करून सुद्धा शेतकऱ्यांचा कांदा खूप जास्त प्रमाणात सडला जातो. 3 महिने कष्ट करून हाती काही लागत नाही.म्हणून शेतकरी निराश होऊन जातो. त्यामुळेच सरकारने ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून हा कांडा चाळ योजनेचा विस्तार केला आहे.
हेही नक्की वाचा ट्रॅक्टर व इतर कृषी यांत्रिकीकरण अनुदान योजना, 56 कोटी निधी आला ; येथे करा अर्ज | Maha DBT Tractor Subsidy 2022 https://aaplesarkars.com/maha-dbt-tractor-subsidy-2022/
◆ कांदा चाळ योजनेचे स्वरुप The nature of the onion chawl scheme (kanda chal online form)
- कांदाचाळीचे बांधकाम विहीत आराखड्याप्रमाणे असणे बंधनकारक आहे.
- 5,10,15,20,25 व 50 मे.टन क्षमतेच्या कांदा चाळींना अनुदानाचा लाभ मिळणार आहे.
- कांदा पिकाखालील क्षेत्राची 7/12 उताऱ्यावर नोंद असणे आवश्यक आहे.
- चाळीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर विहीत नमुन्यात प्रस्ताव संबंधित सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांचेकडे दाखल करावा लागेल.
- वैयक्तिक शेतकऱ्यास 100 मे.टन तर सहकारी संस्थांसाठी 500 मे.टन चाळी बांधण्याची तरतुद करण्यात आली आहे.
It is mandatory for the construction of Kandachali to be as per the prescribed layout.
Onion huts of 5,10,15,20,25 and 50 MT capacity will get the benefit of subsidy.
The area under onion crop should be recorded on 7/12 slope.
After completion of the construction of the shed, the proposal in the prescribed format has to be submitted to the concerned Assistant Registrar of Co-operative Societies.
Provision has been made for 100 MT for individual farmers and 500 MT for co-operative societies.
◆ राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत -कांदा चाळ अनुदान योजना Under National Agriculture Development Plan – Kanda Chaal Grant Scheme ( kanda chal online form )
● कांदा पिकाचे महत्व व व्याप्ती Importance and scope of onion crop
महाराष्ट्रात कांदा पिकाची लागवड मुख्यत्वे करुन नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, बुलढाणा, जळगाव व धुळे या जिल्ह्यात केली जाते. kanda chal online form
कांदा पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादनात भारत जगात दुस-या क्रमांकावर असून देशांतर्गत गरजा भागवून भारतातून कांद्याची मोठा प्रमाणावर निर्यात करुन बहुमोल असे परकीय चलन देखील प्राप्त होते. आजमितीस भारतात सुमारे 5 लाख हेक्टर क्षेत्र कांदा पिकाखाली असून त्यापासून 74 लाख मे.टन उत्पादन मिळते. देशातील कांदा उत्पादनापैकी 26 ते 28 टक्के कांदा उत्पादन (24 लाख मे.टन) हे महाराष्ट्र राज्यात होते. मागील वर्षी देशातून निर्यात झालेल्या 9.44 लाख मे.टन कांद्यापैकी 7 लाख मे.टन कांदा हा महाराष्ट्रात उत्पादीत झालेल्या कांद्यापैकी होता. कांदा निर्यातीत सातत्याने वाढ होत आहे.kanda chal online form
In Maharashtra, onion is grown mainly in Nashik, Ahmednagar, Pune, Satara, Solapur, Buldhana, Jalgaon and Dhule districts. kanda chal online form
India ranks second in the world in terms of area under onion production and production. Today, about 5 lakh hectares of land is under onion cultivation in India, yielding 74 lakh MT. Maharashtra accounts for 26 to 28 per cent of the country’s onion production (24 lakh MT). Out of 9.44 lakh MT of onion exported from the country last year, 7 lakh MT was onion produced in Maharashtra. Onion exports have been steadily increasing.
हेही नक्की वाचा वीज बिल माफी योजना 2022 महाराष्ट्र 100% अधिभार माफी योजना | electricity bill payment महावितरणने केले 15 हजार कोटी माफ https://aaplesarkars.com/electricity-bil-yojna/
◆ कांदा साठवणूक Onion storage (kanda chal online form)
कांदा हे एक नाशवंत पीक आहे. परंतु भारतीय लोकांच्या दररोजच्या आहारात कांदा हा अविभाज्य भाग आहे. जून ते ऑक्टोंबर, प्रसंगी फेब्रुवारी पर्यंत रब्बी हंगामात तयार झालेला कांदा पुरवून वापरला जातो आणि म्हणूनच कांदा साठवणुकीची नितातं गरज भासते. कारण या कालावधीत नवीन कांदा कोठेही उ त्पादीत होत नसतो. महाराष्ट्रात स्थानिक व निर्यात लक्षात घेता सन 2013 पर्यंत 8 लाख मे.टन राज्याची साठवणूक क्षमता होणे आवश्यक आहे. खरीप हंगमामात कांदा काढला की, लगेच मागणी असल्यामुळे विकला जातो.
Onion is a perishable crop. But onion is an integral part of the daily diet of Indians. From June to October, occasionally February is used to supply onions prepared during the rabi season and hence onion storage is urgently needed. Because new onions are not produced anywhere during this period. Maharashtra needs to have a storage capacity of 8 lakh MT by 2013 considering local and export. Onion extracted during kharif season, is sold immediately due to demand.
◆ कांदा चाळ अनुदान किती दिले जाते How much onion chaal grant is given ( kanda chal online form )
5 मेट्रीक टन,10 मेट्रीक टन, 15 मेट्रीक टन, 20 मेट्रीक टन, 25 टन क्षमतेच्या कांदा चाळ. उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल 35 रुपये प्रति मेट्रिक टन याप्रमाणे. किंवा या शक्तीनुसार अर्थसहाय्य म्हणजेच अनुदान दिले जाते. 25 मेट्रिक टन क्षमतेच्या कमाल मर्यादेपर्यंत अनुदान हे राहणार आहे.
◆ अनुदानासाठी अर्ज Application for grant ( kanda chal online form )
कांदाचाळीचे बांधकाम करण्यापुर्वी संबंधीतांनी विहीत नमुन्यातील कांदाचाळीचा आराखडा व अर्ज संबंधीत कृषि उत्पन्न बाजार समिती यांच्याकडून प्राप्त करुन घ्यावा. त्यानुसारच कांदाचाळीचे बांधकाम करणे बंधनकारक आहे. कांदाचाळीचे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर विहीत नमुन्यातील कांदाचाळी अनुदानाचा यांच्या प्रस्ताव संबंधीत बाजार समिती यांच्या कार्यालयात खालील बाबीसह सादर करावा. अचूक व परिपूर्ण प्रस्ताव योग्य ती शहानिशा करुन स्विकृत करण्याची संपूर्ण जबाबदारी ही सचिव कृषि उत्पन्न बाजार समिती यांची राहील.
Before constructing the kandachali, the concerned should obtain the plan and application of kandachali in the prescribed form from the concerned Agricultural Produce Market Committee. Accordingly, it is mandatory to construct Kandachali. After completion of construction of Kandachali, the proposal of Kandachali grant in the prescribed form should be submitted to the office of the concerned market committee along with the following. The Secretary Agriculture Produce Market Committee will be fully responsible for verifying and approving the correct and complete proposal.
◆ कांद्याचा अनुदान योजना लाभार्थी पात्रता Onion Grant Scheme Beneficiary Eligibility ( kanda chal online form )
अर्जदार अर्ज करताना त्याच्या स्वतःच्या मालकीची जमीन अर्थातच सातबारा आवश्यक आहे. तसेच 8अ उतारा व सातबार्यावर कांदा पिकाची नोंद असणे बंधनकारक आहे. तसेच शेतकऱ्याने कांदा पीक घेत देखील बंधनकारक आहे. सदर योजनेचा लाभ वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी, तसेच शेतकऱ्यांचे गट, स्वयंसहायता गट, शेतकरी महिला गट, शेतकऱ्यांची उत्पादक संघ, नोंदणीकृत शेतीसंबंधी संस्था, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, सहकारी संघ, यांना घेता येणार आहे. याचा अर्थ वरील दिलेल्या संस्था, वैयक्तिक शेतकरी, कांदा उत्पादक शेतकरी, या योजनेचा लाभ घेऊ शकता 50% टक्के अनुदानावर योजनेसाठी अर्ज करू शकतो.
◆ कांदाचाळ अनुदान योजना कागदपत्रे Onion Grant Scheme Documents ( kanda chal online form )
● 7/12
● 8 अ उतारा
● आधार कार्डची झेरॉक्स कॉपी
● आदर्श लग्न बँक खात्याच्या पासबुक च्या प्रथम पानाची झेरॉक्स कॉफी
● जातीचे प्रमाणपत्र अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी बंधनकारक आहे
● यापूर्वी कोणत्याही योजनेतून कांदाचाळी चा लाभ घेतले नसले बाबत हमीपत्र द्यावे लागणार आहे.
◆ प्रस्ताव सादर करण्याची पद्धत Method of submitting a proposal ( kanda chal online form )
अ) वैयक्तिक शेतकऱ्यासाठी :For individual farmers
1. विहीत नमुन्यातील अर्ज.
2. अर्जदाराच्या नावे स्वत:च्या मालकीची जमिन असावी. 5 ते 50 मे.टन क्षमतेच्या कांदा चाळासाठी किमान एक हेक्टर पर्यंत क्षेत्र तर 50 ते 100 मे.टन क्षमतेच्या कांदाचाळी साठी 1 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असावे. तशी कांदा पिकाची नोंद असणारा 7/12 उताऱ्याची प्रत, 8-अ खाते उतारा अर्जासोबत जोडावा.
3. वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या लाभार्थी देखील अनुदानास पात्र राहील, वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या लाभार्थीच्या बाबतीत कर्ज मंजूरचे आदेशपत्र सहपत्रीत करणे आवश्यक आहे.
4. कांदाचाळीचा गैरवापर लाभार्थीकडून झाल्यास अनुदान दिलेल्या तारखेपासून व्याजासह वसूली लाभार्थीकडून करण्यात येईल.
5. लाभार्थींनी कांदाचाळ बांधण्यापुर्वी याबाबत करारनामा सोबत जोडलेल्या प्रपत्रात रु.20 च्या स्टॅम्प पेपरवर नोटराईज करुन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना सादर करावा.
6. अर्जासोबत खर्चाची मुळ बिले व गोषवारा जोडावा.
7. कृषि विभागाकडून अनुदान न घेतल्याचा दाखला जोडावा.
8. अर्जदारासह कांदाचाळीचा फोटो जोडावा.
9. सदर योजनेतुन पती किंवा पत्नी यापैकी एका सदस्याला अनुदानाचा लाभ घेता येईल.
(ब) सहकारी संस्थानी अनुदानासाठी प्रस्ताव दाखल करण्याची पद्धत : Method of submitting proposal for co-operative grant
सहकारी संस्था, कृषि उत्पन्न बाजार समिती यांनी कांदाचाळीचे काम चालू करणेपुर्वी कांदाचाळीबाबतचा प्रस्ताव पणन मंडळाचे मुख्य कार्यालये, पुणे येथे खालील बाबीच्या माहितीसह प्रस्ताव तत्वत: मंजूरीसाठी सादर करावा.
1. संस्थेने कांदा साठवणूक प्रकल्पाची उभारणी सुरु करणेपूर्वी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाकडे तत्वत: मंजूरीसाठी सादर करावा.
2. संस्थेमार्फत किती मे.टन क्षमतेच्या कांदाचाळी उभारणार याबाबत संस्थेच्या संचालक मंडळ सभेत पारीत करण्यात आलेल्या ठरावाची प्रत अर्जासोबत जोडावी.
3. प्रकल्पासाठी संस्थेच्या नावे जागा असलेबाबत पुरावा (गाव नमुना क्र.7, 7-अ/12) अथवा करीता कमी 30 वर्षे लीजवर घेतलेली असल्यास त्याबाबतची कागदपत्रे.
4. प्रस्तावीत जागेचा स्थळदर्शक नकशा.
5. कांदा साठवणूक प्रकल्प उभारणीसाठी निधीचे नियोजन संस्था कशा रितीने उभारणी करणार याबाबत अर्जात स्पष्ट उल्लेख असावा.
◆ संस्था नोंदणीचे प्रमाणपत्र व अद्ययावत लेखा परीक्षणाची प्रत Certificate of Registration of Institutions and a copy of updated audit
वर नमुद केलेप्रमाणे वैयक्तिक शेतकरी व सहकारी संस्था यांनी कांदा चाळीचे बांधकाम झाल्यानंतर योग्य कागदपत्रासह सहपत्रीत केलेले प्रस्ताव कृषि उत्पन्न बाजार समिती यांच्या कार्यालयाकडे दाखल करावा. प्रस्तावांची छाननी केलेनंतर प्रत्यक्ष कांदाचाळीची पाहणी केल्यानंतर बाजार समिती मार्फत अर्ज स्विकृत करण्यात येईल. क्ष्यानंतर पणन मंडळाचा प्रतिनिधी, बाजार समितीचा प्रतिनिधी व सहाय्यक निबंधक यांचा प्रतिनिधी ही त्रिसदस्यीय समिती प्रत्यक्ष कांदाचाळीची पाहणी करतील. व शासन निर्णयात नमूद केलेनुसार मापदंड पूर्ण करणा-या कांदाचाळींना अनुदानाची शिफासर समिती करेल.
Kanda chal:
◆ कांदा चाळ योजनेचा ऑनलाईन अर्ज कोठे करायचा? Where to apply for Kanda Chaal Yojana online?
ही योजना संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे. या योजनेचा अचूक अर्ज करण्यासाठी शेतकरी बंधुनो तुम्ही तुमच्या गावातील / जवळच्या कॉम्प्युटर सेंटर मध्ये जाऊन अर्ज करू शकता.व त्या अर्जाची पोच पावती घेऊ शकता.जर ऑनलाइन क्षेत्रात हुशार असाल तर Maha- DBT येथे या लिंक वर क्लिक करून या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घ्या, व अर्ज करा. तसेच तुम्हाला काही शंका असल्यास तुमच्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्यांकडे या योजनेबद्दल चर्चा करा व लवकरात लवकर अर्ज करा. https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Home/Home. ????????
या योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी किंवा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था किंवा पणन मंडळाचे मुख्य कार्यालय किंवा पणन मंडळाचे विभागीय कार्यालय पुणे, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर यांच्याशी संपर्क साधावा-
◆ टीप
आणि तुम्हाला हा अर्ज भरण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही हा अर्ज CSC सेन्टर मध्ये जाऊन देखील भरू शकता