KVP yojana : किसान विकास पत्र योजना | 124 महिन्यांत दुप्पट पैसे देऊ शकणारी ही सरकारी योजना आहे तरी काय? काळजीपूर्वक वाचा..

माझ्या महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना नमस्कार, पैसे दुप्पट करणाऱ्या स्किमबद्दल तुम्ही ऐकलं असेल, त्याचे मीम्सही तुम्ही पाहिले असतील. सहसा अशा स्किम्स फसव्या असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. पण केंद्र सरकारचीही 100% खरी पैसे डबल करण्यासाठीची एक स्किम आहे, असं तुम्हाला सांगितलं तर ? मग फक्त खाली दिलेली माहिती शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचा.

KVP – Kisan Vikas Patra yojana 100% खरी पैसे डबल

Kisan Vikas Patra in marathi होय, केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या भारतीय टपाल सेवा कार्यालयाकडून ही योजना चालवण्यात येते. इंडियन पोस्टच्या या योजनेत 124 महिने गुंतवणूक केल्यानंतरच दुप्पट पैशांचा परतावा आपल्याला मिळवता येतो.

KVP – Kisan Vikas Patra Eligibility, Interest Rates & Benefits : किसान विकास पत्र योजना (KVP) असं या योजनेचं नाव आहे. योजनेचं नाव ऐकून असं वाटू शकतं की ही योजना शेतकऱ्यांसाठी चालवण्यात येत असेल. पण तसं नाही. देशातील कोणताही नागरीक किसान विकास पत्र योजनेचा लाभ घेऊ शकतो.

शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचा

ही सरकारी योजना नक्कीच वाचा :-> मोफत पिठाची गिरणी योजना | या महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळणार; पात्रता अर्ज नमुना पहा..

Kisan vikas patra yojana : ही एक बचत योजना आहे. गुंतवणुकीत जास्त जोखीम घेण्याची इच्छा नसलेल्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून ही योजना आणण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराला 124 महिने म्हणजेच 10 वर्षे आणि 4 महिने इतक्या कालावधीसाठी गुंतवणूक करावी लागते. कालावधी पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदाराने गुंतवलेल्या पैशांच्या दुप्पट पैसे त्याला देण्यात येतात. या योजनेअंतर्गत सरकार आपल्या गुंतवणुकीवर 6.9 % इतकं वार्षिक कंपाऊंट व्याज देतं.

शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचा

ही योजना पहा :->  मोफत निर्धूर चूल / शेगडी योजना मुदतवाढ | 100% अनुदानावर अर्ज सुरु; घरबसल्या मोबाईवरून करा अर्ज..

किसान विकास पत्र स्किमअंतर्गत खातं उघडण्याचे तीन पर्याय आहेत.

1. सिंगल होल्डर टाईप अकाऊंट – हे खातं प्रौढ व्यक्ती स्वतःसाठी उघडू शकतात. आपल्या अल्पवयीन किंवा मानसिक दृष्ट्या दिव्यांग असलेल्या पाल्याचं खातं उघडण्यासाठीही आई-वडिलांना परवानगी आहे.

2. जॉईंट ए टाईप – हे एकप्रकारे संयुक्त खातं आहे. ज्यामध्ये जास्तीत जास्त तीन व्यक्ती आपलं संयुक्त खातं सुरू करू शकतात. या प्रकारात खात्यातील पैसे काढण्याचे अधिकार तिघांना असतात.

3. जॉईंट बी टाईप – या प्रकारातही जास्तीत जास्त तीन व्यक्ती संयुक्त खातं उघडू शकतात. मात्र पैसे काढण्याचे अधिकार कोणत्याही एका व्यक्तीकडेच देण्यात आलेले असतात.

शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचा

खातं कोण उघडू शकतो?

 • कोणताही प्रौढ व्यक्ती हे खातं उघडू शकतो.
 • 10 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या अल्पवयीन पाल्याच्या नावानेही खातं उघडता येतं.
 • मानसिक दृष्ट्या दिव्यांग असलेल्या व्यक्तीच्या नावे त्याचे पालक खातं उघडू शकतात.
 • जास्तीत जास्त तीन व्यक्ती संयुक्त खातं उघडू शकतात.
 • किसान विकास पत्र योजनेअंतर्गत 1 हजार रुपयांपासून ते आपल्याला हव्या तितक्या रकमेची गुंतवणूक करता येते.
 • ही रक्कम 50 हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास पॅन कार्डची माहिती जमा करावी लागते.
 • योजनेत गुंतवली जाणारी रक्कम ही 10 लाखांपेक्षा जास्त असल्यास गुंतवणूकदाराला आपल्या उत्पन्नाच्या स्त्रोताबाबतही माहिती द्यावी लागते.
अर्ज कसा करावा

Kisan vikas ptra yojana खातं उघडण्यासाठी अर्ज कसा करावा?

किसान विकास पत्र खातं उघडण्यासाठी कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये अथवा बँकेत अर्ज करता येतो. ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने हे खातं उघडलं जाऊ शकतं. पण खातं उघडण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते. ते खालीलप्रमाणे –

शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचा
 • KVP अप्लीकेशन फॉर्म
 • आधार कार्ड
 • रहिवासी दाखला
 • वयाचं प्रमाणपत्र
 • पासपोर्ट साईझ फोटो

ऑफलाइन खातं उघडण्यासाठी तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिस अथवा बँकेत जावं लागेल. तिथून किसान विकास पत्र योजनेचा अर्ज घेऊन सर्वप्रथम तो भरावा. सोबत आवश्यक असलेली कागदपत्रे जोडून तो पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जमा करावा. या प्रक्रियेनंतर आपलं खातं तयार होतं.

ऑनलाईन अर्ज कसा करावा

-> हीच प्रक्रिया ऑनलाईन करण्यासाठी तुम्हाला भारतीय पोस्ट सेवेच्या indiapost.gov.in या वेबसाईटवर जावं लागेलं.

 • डाव्या बाजूला मेन्यू दिसेल. तिथे असलेल्या पर्यायांपैकी Banking and Remittance वर क्लिक करा.
 • पुढे पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्किम हा पर्याय निवडावा. हे बटण दाबताच तुम्ही दुसऱ्या एका वेबपेजवर पोहोचाल.
 • याठिकाणी आपल्यासाठी KVP योजना निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तुम्ही ऑनलाइन क्षेत्रात जर हुशार असाल तरच ऑनलाइन अर्जाला प्रयत्न करावा अन्यथा तुमच्या गावातील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन अर्ज करावा.. धन्यवाद!

Scroll to Top