Pm kusum solar yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण Solar Pump Scheme प्रधानमंत्री सौर कृषी पंप योजना 2022 ची सविस्तर माहित पाहणार आहोत . त्यामध्ये आपण योजनेची उद्दिष्ट्य , अनुदान किती मिळणार, अर्ज कुठे करायचा , त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती , अटी , पात्रता, लाभार्थी निवडीचे निकष कोणते त्यामुळे जर तुम्हालाही या kusum yojana योजनेचा लाभ घेयचा असेल तर हा लेख काळजीपूर्वक व संपूर्ण वाचा. वरील फोटो मध्ये दिलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये सध्या योजना सुरू आहे त्वरित अर्ज करा अन्यथा कोठा संपेल..,

कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2022 : प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 3 एच.पी., 5 एच.पी. व 7.5 एच.पी. क्षमतेच्या सौर कृषीपंपांसाठी अर्ज करता येतील. ही योजना केवळ जेथे वीज जोडणी पोहोचलेली नाही त्यांच्यासाठीच आहे. खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90% टक्के व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95% टक्के अनुदानावर सौर कृषीपंप उपलब्ध होतील. योजनेचा लाभ घेण्यासाठी महाऊर्जाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
- Solar Pump Yojana Online Application पात्रता :
- 90% व 95% अनुदानावर सुरू शेततळे, विहीर, बोरवेल, बारमाही वाहणारी नदीनाले याच्या शेजारील, तसेच शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणारे शेतकरी.
- पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी.
- अटल सौर कृषी पंप योजना टप्पा- 1 व 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत अर्ज केलेले तथापि मंजुर न झालेले अर्जदार.
- 2.5 एकर शेतजमीन धारकास 3 HP DC, 5 एकर शेतजमीन धारक शेतकऱ्यास 5 HP DC व त्यापेक्षा जास्त शेतजमीन धारकास 7.5 HP DC वा अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप देण्यात येईल.

- कुसुम योजनेचे आवश्यक कागदपत्रे
- 7/12 उतारा (विहिर|कुपनलिका शेतात असल्यास 7/12 उताऱ्यावर नोंद आवश्यक ) एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना हरकत प्रमाणपत्र रू. 200/- च्या मुद्रांक कागदावर सादर करावे.
- आधारकार्ड प्रत.
- रद्द केलेली धनादेश प्रत / बँक पासबुक प्रत.
- पोर्ट आकाराचा छायाचित्र.
- शेत जमीन / विहिर / पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र.

मी महाराष्ट्रात कुसुम योजनेसाठी अर्ज कसा करू शकतो? :
प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेच्या ऑनलाईन नोंदणीसाठी खालील संकेतस्थळावर भेट दयावी. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) पोर्टलला भेट दिल्या नंतर उजव्या महाकृषि ऊर्जा अभियान या बॉक्स मध्ये “महाकृषि ऊर्जा अभियान कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी” लिंक वर क्लिक करा किंवा खालील थेट लिंक वर क्लिक करा. Https://Kusum.Mahaurja.Com/Solar/Beneficiary/Register/Kusum-Yojana-Component-B येथे क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.
कुसुम सोलर पंप योजना ऑनलाईन फॉर्म कसा भरावा? कोणते कागदपत्रे लागतात? रजिस्ट्रेशन पासून प्रिंट पर्यंत a to z प्रोसेस video च्या माध्यमातून पाहून ऑनलाइन अर्ज करण्यासाठी :-> येथे क्लिक करावे , धन्यवाद!