लाडकी बहीण योजना : तुमचा अर्ज मंजूर झाला की रद्द ? तुमच्या अर्जाचे स्टेट्स इथे ऑनलाईन चेक करा!

Ladki Bahin Yojana Beneficiary Status 2024 : सर्वांना नमस्कार, लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार (Ladki Bahin Yojana Beneficiary Status) याबाबत अनेक महिलांच्या मनात संभ्रम आहे. यासंदर्भात मा. अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम रक्षाबंधनाला लाभार्थी महिलांना मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारकडून ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ची (Ladki Bahin Yojana) घोषणा करण्यात आली.

WhatsApp Group ☞ Join Now
Telegram Group ☞ Join Now

या योजनेंतर्गत महिलांना दरमहा १५०० हजार रुपये मिळणार आहेत म्हणजेच वर्षाचे १८,००० मिळणार आहेत. आता अनेक महिलांची अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु अर्जाची स्थिती (Ladki Bahin Yojana Beneficiary Status) काय आहे हे कसे चेक करायचे किंवा आपला अर्ज मंजूर झाला आहे का ? हे कसे पाहायचे ते आपण आज या लेखा मध्ये पाहणार आहोत.

लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचे स्टेट्स ऑनलाईन चेक करा – Ladki Bahin Yojana Beneficiary Status:

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचे (Ladki Bahin Yojana Beneficiary Status) स्टेटस ऑनलाईन चेक करण्यासाठी सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करून किंवा गुगल प्ले-स्टोअरवरून ‘नारीशक्ती दूत – Narishakti Doot’ असे सर्च करून हे ॲप डाऊनलोड करा किंवा Narishakti Doot ॲप अगोदरच मोबाईल मध्ये असेल तर ते अपडेट करा. https://play.google.com/store/apps/Narishakti-Doot

नारीशक्ती दूत ॲप मध्ये लॉगीन करा

‘नारीशक्ती दूत – Narishakti Doot ॲप इन्स्टॉल झाल्यावर ओपन करा; त्यानंतर ज्या महिलेचा अर्जाचे स्टेटस चेक करायचे आहे, त्या महिलेचा मोबाईल क्रमांक टाकून लॉगीन करा.

पुढे ज्या मोबाईल क्रमांकाने तुम्ही लॉगीन केलं, त्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला OTP येईल. तो OTP दिलेल्या बॉक्समध्ये टाकून ‘Verify OTP’ या पर्यायावर क्लिक करा.

लॉगिन केल्यानंतर खालील यापूर्वी केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घेऊ शकता, त्यासाठी केलेल्या अर्जावर क्लिक करा.

अर्ज ओपन झाल्यावर वरती आपल्याला ४ पर्याय दिसतील त्यामध्ये sms verification done, (i) सर्कल मध्ये आय आयकॉनचा सिम्बॉल दिसेल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना In Pending to submitted, व edit Form हे पर्याय दिसतील.

Ladki Bahin Yojana Beneficiary Status
Ladki Bahin Yojana Beneficiary Status

जर वरील पर्याय आपल्या मोबाईल मध्ये दिसत नसतील तर Narishakti Doot ॲप अपडेट करा किंवा डिलीट (Uninstalled) करून पुन्हा इंस्टाल करा.

वरील चित्रामध्ये Pending to submitted असे दाखवत आहे म्हणजेच  “सर्वेक्षण अर्ज भरलेले आहे परंतु अद्याप पुनरावलोकनासाठी सबमिट केलेले नाही. अंतिम सबमिशनसाठी हे अद्याप प्रलंबित स्थितीत आहे.”

तुम्हाला खालील पैकी अर्जाचे (Ladki Bahin Yojana Beneficiary Status) स्टेट्स दाखवत असेल तर त्याचा अर्थ समजून घेऊ.

  • Pending to submitted – म्हणजेच सर्वेक्षण अर्ज भरलेले आहे परंतु अद्याप पुनरावलोकनासाठी सबमिट केलेले नाही. अंतिम सबमिशनसाठी हे अद्याप प्रलंबित स्थितीत आहे.
  • Approved – म्हणजेच सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले आहे. सबमिटरकडून आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही.
  • In Review – म्हणजेच सर्वेक्षण सध्या पुनरावलोकनकर्त्यांद्वारे मूल्यांकन केले जात आहे. सबमिटर फीडबॅक किंवा मंजुरीची वाट पाहत आहे.
  • Rejected – म्हणजेच सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही. हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही.
  • Disapproved – Can Edit and Resubmit – म्हणजेच सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही, परंतु सबमिटरला बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय आहे.

अशा प्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana Beneficiary Status) अर्जाचे स्टेट्स ऑनलाईन चेक करू शकता, जर तुम्हाला अर्ज चुकला आहे अशी शंका असेल किंवा काही माहिती अपडेट करायची असेल तर अर्ज तुम्ही edit Form या पर्यायवर क्लिक करून अपडेट करा.

सूचना: चुकलेला अर्ज एकदाच दुरुस्त करू शकता, त्यामुळे काळजीपूर्वक माहिती अपडेट करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online CM Majhi Ladki Bahin Yojana): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- इथे क्लिक करा.

WhatsApp Group ☞ Join Now

Leave a Comment