MAHA Bhulekh : 1880 सालापासूनचे जुने फेरफार, सातबारा, खाते उतारे ऑनलाईन कसा डाउनलोड करायचा ? A to Z माहिती..,

शेती : 1880 सालापासूनचे फेरफार, सातबारा, खाते उतारे ऑनलाईन कसे पाहायचे ? नमस्कार शेतकरी बंधूंनो , MAHA Bhulekh : आता हे खाते उतारे, सातबारा किंवा फेरफार आपण मूळ स्वरूपात असेल तसेच भुमिअभिलेख कार्यालयांमध्ये 1880 पासून उपलब्ध आहेत. तेही आपल्या सोयीकरता.

Land Record 1880 जुने सातबारे फेरफार पहा मोबाईलवर  How to get Ferfar Utara Maharashtra
Land Record 1880 जुने सातबारे फेरफार काढा ऑनलाइन घर बसल्या How to get Ferfar Utara Maharashtra | Ferfar Download Online Marathi

जमिनीशी संबंधित कोणताही खरेदी विक्रीचा व्यवहार करायचा असल्यास काय महत्वाचं असतं तर त्या जमिनीचा पूर्वीचा इतिहास माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे आता हा इतिहास म्हणजे नेमकं काय तर ती जमीन मूळची कोणाच्या नावावर होती आणि दिवसेंदिवस त्या जमिनीचा अधिकार अभिलेखात काय बदल होत गेले याची सविस्तर माहिती असणे आवश्यक असतं.

जुने अभिलेख पहा online मोबाईल वर

हे वाचले का :-  शेती : तुमच्या जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा? असा पहा मोबाईलवर 5 मिनिटांत नकाशा..,

ही माहिती कुठे असते तर ती तहसीलदार कार्यालय किंवा भूमिअभिलेख कार्यालयत सातबारा उतारा खाते उतारा फेरफार या परिपत्रकांमध्ये ही माहिती नमूद केलेली असते. आता ही माहिती महाराष्ट्र सरकारने ऑनलाइन देण्याचे सुरू केली आहे महाराष्ट्र सरकारने ई-अभिलेख या प्रकल्पांतर्गत किंवा या कार्यक्रमाद्वारे राज्यभरातील सगळ्या जिल्ह्यामधल्या तीस कोटी अभिलेख उताऱ्यांचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. फेरफार उतारे आता सरकार ऑनलाइन उपलब्ध करून देत आहे पण हे उतारे ऑनलाईन कसे पाहायचे याची माहिती आपण आता घेणार आहोत.

1880 सालापासूनचे जुने फेरफार, सातबारा, खाते उतारे ऑनलाईन डाउनलोड करण्याची प्रोसेस :

  • खालील महसूल विभागाची वेबसाईट लिंक ओपन करा. e-Records
  • https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in येथे क्लिक करा.
  • १) या वेबसाईट वर पहिल्यांदा नवीन वापरकर्ता नोंदणी करण्यासाठी “New User Registration” पर्यायावर क्लिक करा.

२) एक नवीन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. या फॉर्ममध्ये तुम्हाला सुरुवातीला वैयक्तिक माहिती भरायची आहे.यामुळे तुमचे नावमधले नाव, आडनाव, राष्ट्रीयत्व, मोबाईल नंबर, व्यवसाय, ईमेल आयडी, जन्मतारीख इत्यादी गोष्टी ची नोंद करायचे आहे.

३) वैयक्तिक माहिती भरून झाली की तुम्हाला तुमच्या पत्त्या विषयीची माहिती द्यायची आहे. यामध्ये घर क्रमांक, मजला क्रमांक, इमारतीचे नाव पिनकोड, स्थान, शहर, जिल्हा, राज्य इत्यादींची माहिती द्यायची असते.

४) हे भरून झाल्यानंतर तुम्हाला एक लॉगिन आयडी बनवायचा आहे. यानंतर तुमच्या समोर वापर करता नोंदणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे असा मेसेज येईल.

५) त्यानंतर लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचा आहे. आता आपण जुना फेरफार उतारा कसा पाहायचा ते पाहू.

1880 सालापासूनचे जुने फेरफार e-Records  How to get Ferfar Utara Maharashtra  How to get Ferfar Utara Maharashtra
e-Records – लॉगिन

६) जुना फेरफार उतारा पाहण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे नाव निवडायचे आहे, पण इथे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची सध्या महाराष्ट्र सरकारने ही सुविधा फक्त निवडक जिल्ह्यासाठीच उपलब्ध करून दिली आहे. पण लवकरच ही सुविधा राज्यभरातील सगळ्या जिल्ह्यांना उपलब्ध करून देण्याचा सरकारचा विचार आहेत.

७) पुढे तालुका, गावाचे नाव आणि अभिलेख प्रकार निवडायचा आहे. यात तुम्हाला कोणता अभिलेख उतारा हवा आहे तो तुम्हाला निवडायचा आहे. आता समजा मी इथे फेरफार उतारा काढण्यासाठी फेरफार उतारा निवडला. जर तुम्हाला सातबारा हवा असेल तर सातबारा आठ अ उतारा हवा असेल तर ८अ हा पर्याय निवडायचा. असे एकूण  ६४ अभिलेखांचे प्रकार येथे उपलब्ध आहेत.

८) त्यानंतर गट क्रमांक टाकून शोध (Search) या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

Basic Search फॉर्म  How to get Ferfar Utara Maharashtra
Basic Search

९) त्यानंतर शोध निकाल या पेजवर तुम्ही टाकलेल्या गट क्रमांकाशी संबंधित फेरफाराची माहिती दिसते.

१०) फेरफाराचं वर्षं आणि क्रमांक तिथं दिलेला असतो. तुम्ही त्यावर क्लिक करून संबंधित वर्षाचा फेरफार पाहू शकता.जर मला 1982 सालचा फेरफार पाहायचा असेल, तर त्या समोरील कार्ड मध्ये ठेवा हा पर्याय यावर क्लिक केला आहे. आता समजा आपण पेज क्रमांक एक वरील माहिती पाहत आहोत त्याच्या समोरील वर्षांचे फेरफार उतारे तुम्हाला पाहायचे असल्यास तर तुम्ही पेज 2, तीन वर क्लिक करुन ही माहिती पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला पुनरावलोकन कार्ड या वरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमचे कार्ड तुमच्यासमोर ओपन होईल.

त्याखाली असलेल्या पुढे जा या पर्यायावर क्लिक केलं की डाउनलोड सध्याची फाईल अशी ओपन होईल आणि सद्यस्थिती उपलब्ध आहे. त्या समोरील फाईल पहा. यावर क्लिक केलं की, तुमच्या समोर येतं 1982 फेरफार पत्र ओपन होईल. या पत्रकारावरील खाली बान असलेल्या चिन्हावर जर तुम्ही क्लिक केलं तर ते डाऊनलोड होईल आता तुम्ही स्क्रीन वर 1982 सालचा फेरफार उतारा पाहू शकता.

हे तर नक्कीच वाचा :- घराचा सिटी सर्व्हे ( C.T.S ) उतारा Online मिळणार फ्री मध्ये | आपल्या घरच्या जागेचा मालमत्ता पत्रक / उतारा 5 मिनिटांत पहा मोबाईलवर..,

टीप :– मित्रांनो , तसेच जर तुम्हाला Land Record 1880 जुने सातबारे फेरफार पहा मोबाईलवर ही प्रक्रिया समजली नसेल किवाच मोबाईलवर ही प्रक्रिया करताना अडचण येत असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या कम्प्युटर सेंटर मध्ये जाऊन उतारे डाउनलोड करून पाहू शकता .

Comments are closed.


Scroll to Top