PM Kisan योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १२ वा हफ्ता पाहिजे असल्यास ‘या’ अटी-नियमांची करावी लागणार पूर्तता; नाहीतर येणार नाही पुढचा हप्ता..,

केंद्र सरकार व राज्य सरकार अनेक नवनवीन योजना अंमलात आणत असत , परंतु असे अनेक नागरिक आहेत की ज्यांना या योजनांविषयी माहितीच होत नाही व ते या योजनांपासून वंचित राहता आणि म्हणूनच आज आपण PM Kisan या योजनेचा 12 हप्ता सुरळीत रित्या तुमच्या खात्यात येण्यासाठी खालील माहिती सविस्तर व काळजीपूर्वक वाचावी..>>??

काळजीपूर्वक वाचा

PM Kisan | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) ही भारत सरकारच्या महत्त्वाच्या योजनांपैकी एक आहे. या योजनेंतर्गत, २ हेक्टर (४.९ एकर) पेक्षा कमी जमीन असलेल्या लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करते (PM Kisan). या योजनेंतर्गत सर्व शेतकऱ्यांना किमान उत्पन्न आधार म्हणून प्रतिवर्षी रु. ६,०००/- रुपये मिळतात (PM Kisan). १ डिसेंबर २०१८ पासून राबविण्यात आलेली ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान आहे.

हे वाचले का तुम्ही :- Pm Kisan : तुमच्या आधार NPCI ला जे बँक अकाउंट लिंक असेल त्याच बँक अकाउंट मध्ये येथून पुढे 2000 रु. चा हफ्ता जमा होईल ; चेक करा तुमच्या आधार कार्डला कोणती बँक Link आहे

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला प्रति वर्ष रु. ६,०००  तीन हप्त्यांमध्ये दिले जातात आणि मदतीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. म्हणजेच दर ४ महिन्यांनी २ हजारांची मदत शेतकऱ्याला दिली जाते. खाली सविस्तर वाचा >>

काळजीपूर्वक वाचा

पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana 11th Installment) 11 वा हप्ता 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर (Farmer account) पाठवण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून शेतकरी (Farmer) या हप्त्याची वाट पाहत होते. आता शेतकऱ्यांच्या खात्यावर 11वा हप्ता जमा झाला असून, सरकारने (Government) 12व्या हप्त्यामध्ये काही नियम व अटी (12th Installment Terms and Conditions) लागू केल्या आहेत. ज्या पूर्ण केल्याशिवाय शेतकऱ्यांना 12वा हप्ता मिळणार नाही. चला तर मग जाणून घेऊया सरकारने कोणत्या गोष्टी 12 व्या हप्त्यासाठी अनिवार्य केल्या आहेत.

PM Kisan योजनेच्या नियम आणि अटी

यांना मिळणार नाही पुढील 12 वा हप्ता :-

खालील उच्च आर्थिक श्रेणीतील व्यक्ती या योजनेच्या 12 व्या हप्त्याच्या लाभासाठी पात्र असणार नाहीत.

  • सर्व संस्थात्मक जमीनधारक
  • संवैधानिक पद धारण करणारे / केलेले आजी व माजी व्यक्ती.
  • आजी / माजी मंत्री / राज्यमंत्री, आजी / माजी खासदार / राज्यसभा सदस्य, आजी / माजी विधानसभा / विधान परीषद सदस्य, आजी / माजी महानगरपालीकेचे महापौर, आजी / माजी जिल्हा परीषदेचे अध्यक्ष.
  • केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी / कर्मचारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारीतील कार्यालयांमधील आणि स्वायत्त संस्थांचे सर्व अधिकारी/कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नियमीत अधिकारी/कर्मचारी. चतुर्थश्रेणी / गट ड वर्ग कर्मचारी वगळून
  • सर्व निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रू. १०,०००/- किंवा त्यापेक्षा जास्त आहे चतुर्थश्रेणी / गट ड वर्ग कर्मचारी वगळून
  • मागील वर्षात आयकर भरलेल्या सर्व व्यक्ती.
  • नोंदणीकृत व्यवसायिक डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल (C.A), वास्तुशास्त्रज्ञ, इ. क्षेत्रातील व्यक्ती.
PM Kisan योजनेच्या नियम आणि अटी

E-Kyc अनिवार्य

शेतकरी बंधूंनो, पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेण्यासाठी सरकारने E-Kyc अनिवार्य केले आहे. कारण अनेक शेतकरी पात्र नसतानाही या योजनेचा लाभ घेत होते. म्हणूनच सरकारने केवळ पात्र शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी E-Kyc करणे अनिवार्य केले आहे. आधी E-Kyc करण्याची अंतिम शेवट 31 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे. जे शेतकरी दि. 31 ऑगस्ट 2022 या पूर्वी E-Kyc प्रक्रिया पूर्ण करत करणार नाहीत. त्यामुळे असू शकते कि त्यांना पुढील १२ वा हफ्त्या पासून मुकावे लागेल असे अनुमान आहे.

खाली आणखी वाचा

PM Kisan चे एका वर्षात तीन हप्ते कधी कधी मिळतात ? 

PM Kisan: पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सरकारकडून वार्षिक ६,००० रुपये मिळतात. दर चार महिन्यांनी शेतकर्‍यांच्या खात्यावर दोन हजार रुपये पाठवले जातात. योजनेचा चालू वर्षात पहिला हफ्ता हा एप्रिल ते जुलै दरम्यान मिळतो तर दुसरा हफ्ता हा ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान येतो, तर तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान केंद्र सरकार शेतकऱ्याच्या बँकेत (आता नवीन नियमानुसार आधार लिंक असलेल्या बँक खात्यात) हस्तांतरित केला जाणार आहे.

Pm Kisan E-KYC  शेतकरी Procces In Marathi अशी करा थोडक्यात :-

शेतकरी मित्रांनो Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana E- Kyc  करताना अनेकदा आपल्याला अडथळा येऊ शकतो कारण सध्या संपूर्ण  देशभरात ही प्रक्रिया जोमात चालू आहे व या वेबसाइटवर मोठ्या प्रमाणावर लोड असल्याकारणाने कधी-कधी The Service Is Unavailable असे नाव आपल्या समोर येऊ शकते परंतु घाबरून जाऊ नाका काही वेळानंतर पुनः प्रयत्न कारा. आधी आपण थोडक्यात जाणून घेऊ की  Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana E- Kyc  काशी करायची.

OTP Based Ekyc
OTP Based Ekyc येथे करा :->> https://exlink.pmkisan.gov.in/aadharekyc.aspx
  • यासाठी तुम्ही प्रथम Https://Pmkisan.Gov.In/ पोर्टलवर जा.
  • उजव्या बाजूला FARMER CORNER तुम्हाला टॅब दिसतील. सर्वात वर तुम्हाला EKYC लिहिलेलं दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • आता तुमचा आधार क्रमांक आणि इमेज कोड टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा.
  • नंतर आपला आधार कार्ड नंबर व मोबाईल नंबर टाकून OTP पाठवा आणि OTP आल्यावरOTP टाकून सबमिट करा.
  • तुमची E-KYC पूर्ण झाली असेल

आपला आधार नंबर लिंक नसेल तर आपण आपला गावातील CSC सेंटर आपले सरकार सेवा (केंद्र) ला भेट द्यायची आहे. तेथे देखील तुम्ही ही प्रक्रिया करू शकता. कारण ३१ ऑगस्ट पर्यंत ई-केवयासी  करणे गरजेचे आहे.  

Leave a Comment


Scroll to Top