बाप रे..! शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय? 10वी, 12वी बोर्ड परीक्षा  ‘आता’ वर्षातून दोनदा होणार, विद्यार्थी व पालकांनो पहा सविस्तर माहिती..,

Maharashtra HSC Exams : आता बारावी बोर्ड परीक्षा (HSC Exams) वर्षातून दोन वेळेस घेण्या संदर्भात विचार सुरू आहे. असा निर्णय झाल्यास सेमिस्टर पद्धतीनं वर्षातून बारावी बोर्ड परीक्षा दोन वेळेस घेतली जाईल, अशी माहिती मिळत आहे. याशिवाय बारावी बोर्डाची परीक्षा देताना विद्यार्थ्यांना आर्ट्स, कॉमर्स, सायन्स अभ्यासक्रमाच्या मर्यादा न ठेवता विविध विषय निवडून बारावी बोर्ड परीक्षा देता येईल. नवे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क तयार करणाऱ्या तज्ज्ञ समितीनं बारावी बोर्ड परीक्षांसंदर्भात शिफारसी मांडल्या आहेत. जर समितीनं केलेल्या शिफारशीनुसार, निर्णय झाल्यास, या बारावी बोर्ड परीक्षा नेमक्या कशा होतील? असा प्रश्न विद्यार्थी, पालकांसोबतच शिक्षकांच्या मनातही निर्माण झाला आहे. 

Maharashtra HSC Exams
खाली अधिक सविस्तर माहिती वाचा

10 वी आणि 12 वीच्या परीक्षा आता वर्षातून दोनदा होणार, माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय? फेब्रुवारी मार्चमध्ये होणारी बारावी बोर्ड परीक्षा आता एका शैक्षणिक वर्षात दोन वेळा घेण्याचा विचार नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क नव्यानं तयार करणाऱ्या देशातील तज्ज्ञ मंडळींनी मांडला आहे. या नव्या फ्रेमवर्कनुसार, सेमिस्टर पद्धतीनं बारावी बोर्ड परीक्षा वर्षातून एकदाच नाहीतर दोन वेळेस घेण्यात येतील. शिवाय या नव्या फ्रेमवर्क नुसार, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या अभ्यासक्रमात शिकवल्या जाणाऱ्या विषयांची परीक्षा विद्यार्थ्यांना देण्याची मर्यादा नसेल. 

‘या’ नव्या नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्कमध्ये तज्ज्ञ नेमक्या कोणत्या मुद्द्याचा विचार करातयत : येथे क्लिक करून पहा

‘एनसीएफ’ने अभ्यासक्रमांच्या निवडीबाबतही शिफारशी केल्या आहेत. विद्यार्थ्याला अकरावी आणि बारावी या दोन वर्षांत बोर्ड परीक्षा देताना वेगवेगळ्या १६ अभ्यासक्रमांची निवड करता येईल. चार टप्प्यांमध्ये विद्यार्थ्यांना हे अभ्यासक्रम निवडावे लागतील. त्यामध्ये समाजशास्त्र शाखेसाठी इतिहास विषयाची निवड केल्यास विद्यार्थ्याला इतिहास विषयाचे चार अभ्यासक्रम पूर्ण करावे लागतील. त्यानंतर विद्यार्थ्याने विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र विषय निवडल्यास भौतिकशास्त्रातील चार अभ्यासक्रम पूर्ण करावे लागतील. विद्यार्थ्याने गणित शाखा निवडल्यास त्यातील चार अभ्यासक्रम पूर्ण करावे लागतील. तसेच चौथा विषय या तीन विद्याशाखांपैकी किंवा पूर्णपणे भिन्न निवडता


Scroll to Top