MPSC Recruitment 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरतीची नवीन अधिसूचना जारी करण्यात आलेली असून पदानुसार इच्छुक व पात्र उमेदवारांकडून सदर भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2023 देण्यात आलेली आहे, त्यामुळे विहित मुदतीत उमेदवारांनी अर्ज सादर करावा.
MPSC Recruitment 2023
🔔 पदाचे नाव : प्राचार्य, शासकीय हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंग टेक्नॉलॉजी महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतने, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा, विविध विषयांतील अधिव्याख्याता, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, विविध विषयांतील विभाग प्रमुख, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, विविध विषयांतील प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, संचालक,आरोग्य सेवा महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा
🔔 एकूण पदसंख्या : 170
📚 शैक्षणिक पात्रता : विविध पदांसाठीची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे 👇
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
प्राचार्य, शासकीय हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंग टेक्नॉलॉजी महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा | पीएच.डी. आणि संबंधित विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर प्रथम श्रेणी, अध्यापन/संशोधन/उद्योगात किमान 16 वर्षांचा अनुभव, त्यापैकी किमान 3 वर्षे पीएच.डी. अनुभव आणि 5 वर्षांचा अनुभव HOD च्या पातळीपेक्षा कमी नाही. |
प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतने, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा | पीएच.डी. आणि संबंधित विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर प्रथम श्रेणी, अध्यापन/संशोधन/उद्योगात किमान 16 वर्षांचा अनुभव, त्यापैकी किमान 3 वर्षे पीएच.डी. अनुभव आणि 5 वर्षांचा अनुभव HOD च्या पातळीपेक्षा कमी नाही. |
विविध विषयांतील अधिव्याख्याता, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा | ललित कला (उपयोजित कला, चित्रकला आणि शिल्पकला) च्या योग्य शाखेतील पदवी किंवा प्रथम श्रेणी किंवा समतुल्य. |
विविध विषयांतील विभाग प्रमुख, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा | पीएच.डी. संबंधित क्षेत्रात आणि संबंधित विषयात बॅचलर किंवा मास्टर स्तरावर प्रथम श्रेणी; अध्यापन/संशोधन/उद्योगात किमान 12 वर्षांचा अनुभव, त्यापैकी किमान 2 वर्षे पीएच.डी. लेक्चररच्या स्तरावर किमान अनुभव (निवड श्रेणी-I) |
विविध विषयांतील सहायक प्राध्यापक | संबंधित शाखेतील बॅचलर आणि पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीसह किंवा दोनपैकी कोणत्याही एका पदवीमध्ये समतुल्य. |
महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक | पीएच.डी. संबंधित क्षेत्रातील पदवी आणि संबंधित शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर प्रथम श्रेणी किंवा समतुल्य. आणि SCI जर्नल्स / UGC / AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील किमान एकूण 6 संशोधन प्रकाशने. |
महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, विविध विषयांतील प्राध्यापक | पीएच.डी. संबंधित क्षेत्रातील पदवी आणि संबंधित शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर प्रथम श्रेणी किंवा समतुल्य. |
संचालक,आरोग्य सेवा महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा | M.B.B.S. पदवी |
💁 वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 03 ऑक्टोबर 2023 रोजी 18 ते 45 वर्षे असावे. (मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट)
✈️ नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात
🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन
📅 अर्ज सुरू होण्याची तारीख : 13 सप्टेंबर 2023
⏰ अर्जाची शेवटची तारीख : 3 ऑक्टोबर 2023
संपूर्ण PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
How to apply for MPSC Recruitment 2023
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत राबविण्यात येणारी ही भरती ऑनलाईन होणार आहे.
- उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरावयाचा असून इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज केल्यास तो अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
- सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करून आपला युजरनेम व पासवर्ड मिळवावा.
- त्यानंतर एमपीएससीच्या अधिकृत पोर्टल वर जाऊन युजरनेम व पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्यावे आणि संबंधित पदासाठी अर्ज करावा.
- अर्ज करण्यापूर्वी प्रोफाइलमध्ये संपूर्ण माहिती व्यवस्थित व काळजीपूर्वक भरण्याची खात्री करून घ्यावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2013 (11:59 PM) देण्यात आलेली आहे, अर्ज प्रक्रिया 13 सप्टेंबर 2023 पासून सुरू होईल.
- सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल, तर त्यांनी वरील रखान्यात देण्यात आलेली सविस्तर जाहिरात वाचावी.