एसटी महामंडळाची अनोखी योजना ! आता संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही फिरा फक्त 1,100 रुपयांत : MSRTC Aavdel Tithe Pravas Scheme 2023

MSRTC Aavdel Tithe Pravas Scheme 2023 : महाराष्ट्र शासनअंतर्गत विलीन असलेल्या एसटी महामंडळ विभागाकडून सतत नवनवीन योजना सुरू केल्या जातात. गेले काही दिवसापूर्वी म्हणजेच महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना महिलांसाठी एक विशेष योजना सुरू करण्यात आली महिला सन्मान योजना. अशा विविध प्रकारच्या योजना महामंडळ सुरू करत असत.

MSRTC Aavdel Tithe Pravas Scheme 2023

या लेखाच्या माध्यमातून आपण अशीच एक नवीन योजनेबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. एसटी महामंडळाचा तो उपक्रम किंवा योजना म्हणजे आवडेल तिथे प्रवास योजना होय. खास प्रवास करणाऱ्यांसाठी “आवडेल तिथे प्रवास” अशा नावाची योजना महामंडळकडून सुरू करण्यात आली. ह्या योजनेची स्थापना 1988 पासून स्थापित असले, तरी सध्यास्थितीमध्ये या योजनेचा बोलबाला मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

नागरिकांना, मित्रांना एक नियोजन आखून प्रवासादरम्यान स्नेह, मैत्रीपूर्ण नाते निर्माण व्हावे त्याचप्रमाणे प्रवाशांना एकदम कमी खर्चामध्ये राज्यातील विविध ठिकाणी प्रवास करता यावा. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यामध्ये प्रवाशांसाठी महामंडळकडून “आवडेल किती प्रवास” ही योजना सुरू करण्यात आली.

आवडेल तिथे प्रवास पास प्रक्रिया व इतर माहिती

या योजनेअंतर्गत चार दिवसांच्या पाससाठी वर्षातून 02 फेऱ्या म्हणजेच दोन हंगाम करण्यात आलेले आहेत. पहिला हंगाम म्हणजे 15 ऑक्टोबर ते 14 जून आणि त्यानंतर दुसरा हंगाम म्हणजे 15 जून ते 14 ऑक्टोबर. दोन्ही हंगामचा कालावधी सारखा असला, तरी याच्या किमती मात्र भिन्न असणार आहेत, अशी माहिती महामंडळमार्फत देण्यात आली.

या योजनेमध्ये प्रवासाचा पास 04 दिवसाकरिता काढता येतो. ज्या शासकीय महामंडळाच्या गाड्या आहेत, जसे शिवनेरी, शिवशाही, हिरकणी, लालपरी (ST लाल डब्बा) या बसची निवड या योजनेअंतर्गत प्रवासासाठी केली जाते.

पासची किंमत किती ?

आता आपल्या सर्वांना चिंता पडली असेल की, या एसटीच्या योजनेसाठी आपल्याला खिशातून किती पैसे मोजावे लागतील. एका प्रवाशामागे महाराष्ट्रामध्ये चार दिवस कोठेही प्रवास करण्यासाठी लाल एसटी पासची किंमत प्रति व्यक्ती रु. 965/- नीमआरामसाठी रु. 1,150/- तर शिवशाहीसाठी रु. 1,250 शुल्क आकारण्यात येत.

यास पासच्या मदतीने प्रवासी राज्यातील धार्मिक स्थळे जसे तुळजापूर, अक्कलकोट, गणपतीपुळे, जेजुरी इत्यादी स्थळांना भेट देऊ शकतात. त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये एखादा लग्नाचा प्रसंग असेल आणि वारंवार एसटीचा प्रवास सुरू असेल, तर अशा प्रसंगी हा पास खूपच फायद्याचा ठरणार आहे.

धार्मिक स्थळासह नागरिक किंवा प्रवासी नैसर्गिक स्थळेसुद्धा या बसच्या पास योजनेतून पाहू शकणार आहेत. ज्यामध्ये महाबळेश्वर, कोकण व इतर नैसर्गिक स्थळांचा समावेश होतो. जनसामान्याच्या बजेटमध्ये बसणारी व भरपूर आनंद देणारी प्रवासाचा एकमेव मार्ग म्हणजे एसटी महामंडळाची बस.

पासची वैधता कशी असेल ?

हा पास तुम्हाला तुमच्या प्रवासाच्या दहा दिवस अगोदर काढता येईल. पाचची वैधता चार दिवसाची असेल म्हणजेच पहिल्या दिवशीच्या रात्री बारापासून ते चौथ्या दिवशीच्या रात्री बारा वाजेपर्यंत. प्रवाशांना जर आंतरराज्य प्रवास करायचा असेल किंवा महाराष्ट्रात प्रवास करायचा असेल तरी या पाचची वैधता ही सारखीच असेल. जर तुम्हाला असा पास बनवायचा असेल तर जवळील संबंधित एसटी बस स्थानकात संपर्क साधावा लागेल.

पासधारकांसाठी नियम काय असतील ?

  • ज्या प्रवाशांकडे हा पास असेल आणि तो प्रवासी प्रवास करत असेल, तर अशा पासधारकांसाठी ते पासधारक आहेत; म्हणून त्यांचा प्रवेश नाकारू नये.
  • या योजनेअंतर्गत जे पासधारक आवडती सीट किंवा आसनाची मागणी करत असतील, तर तो प्रवासी पासचा गैरवापर करत आहे असे समजण्यात येईल.
  • पास हरवल्यानंतर पर्यायी दुसरा पास दिला जाणार नाही याची प्रवाशांनी नोंद घ्यावी.
  • पासचा जर कोणी गैरवापर करत असेल, तर त्यांचा पास वेळीच जप्त करण्यात येईल.
  • प्रवासादरम्यान पासधारकांची कोणतीही मौल्यवान वस्तू हरवल्यास त्यासाठी महामंडळ जबाबदार राहणार नाही.
  • आवडेल तेथे प्रवास या पासच्य माध्यमातून पासधारक प्रवास करत असतील, आणि त्या पाचची वैधता समाप्त झाली असेल, तर अशावेळी त्यांच्याकडून तिकीट आकारला जाईल.
  • प्रवासादरम्यान वैयक्तिक वस्तू गहाळ झाल्यास अथवा नुकसान झाल्यास महामंडळ याची जबाबदारी घेणार नाही.
  • स्मार्ट कार्ड योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या आवडेल तेथे कोठेही प्रवास पासांसाठी वरील सूचना लागू राहतील.
  • संप / काम बंद आंदोलन यामुळे रा.प. वाहतूक बंद झाल्यामुळे प्रवासी सदर पासावर प्रवास करू न शकल्यास त्याने प्रवास न केलेल्या दिवसांचा परतावा / मुदतवाढ देण्यात येईल.सदरची मुदतवाढ / परतावा वाहतूक सुरु झाल्या पासून ३ महिने पर्यंतच्या कालावधीत देण्यात येईल.

Scroll to Top