नमस्कार मित्रांनो, राज्य शासनामार्फत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये जेष्ठ नागरिकांना, दिव्यांग व्यक्तींना व इतर पात्र प्रवाशांना सवलतीच्या दरामध्ये प्रवास करता यावा यासाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू करण्यात आली. मित्रांनो तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुम्ही तुमच्या शाळेत जाण्यासाठी व शाळेतून घरी येण्यासाठी ST बस चा वापर तरी देखील तुम्हाला स्मार्ट काढणे अनिवार्य आहे व त्या पासवर तुम्हाला सूट देखील आहे, या योजनेचा नक्कीच फायदा घ्यावा,.. खाली सविस्तर योजना वाचावी.
MSRTC Smart Card Scheme
MSRTC म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्यामार्फत प्रवाशांना राज्यामध्ये विविध ठिकाणाहून ये-जा करण्यासाठी बस सुविधा उपलब्ध आहे. शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या एसटी बस स्मार्ट कार्ड योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरामध्ये प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
सद्यस्थितीमध्ये होत असलेल्या डिजिटलायजेशन प्रक्रियेमध्ये एसटी महामंडळसुद्धा मागे नाही हे आपल्या लक्षात येईल; कारण आता कागदी पासऐवजी अत्याधुनिक स्मार्ट कार्डची सुविधा नागरिकांनासाठी एसटी महामंडळमार्फत सुरू करण्यात आली आहे.

योजना कोणासाठी लागू असणार
ही योजना राज्यातील सर्व पात्र ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, महात्मा गांधी समाजसेवक, आदिवासी सेवक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कारार्थी त्याचप्रमाणे आधीस्वीकृती पत्रकारांना मोफत असणार आहे; मात्र यासाठी स्मार्ट कार्ड काढणे अनिवार्य असेल.
Smart Card साठी आवश्यक कागदपत्र
- आधारकार्ड
- मतदान कार्ड
- ज्येष्ठ नागरिकत्वाचा पुरावा
- मोबाईल क्रमांक
ST Smart Card कसा काढावा ?
स्मार्ट कार्ड काढण्यासाठी तुमच्या संबंधित तालुक्याला आगारनिहाय एजंटची निवड करण्यात आली असून, त्याठिकाणी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली जात आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या ज्येष्ठ नागरिकत्वाचा पुरावा व आधारकार्ड किंवा मतदान कार्ड घेऊन जवळील ST महामंडळ आगारांमध्ये जाऊन आपल्या अंगठ्याचा ठसा स्कॅनरवर ठेवून स्मार्ट कार्ड काढण्यासाठी नोंदणी करून घ्यावी.
स्मार्ट कार्ड काढण्यासाठी 55 रुपये इतका शुल्क आकारला जाईल, याची ज्येष्ठ नागरिकांनी नोंद घ्यावी. स्मार्ट कार्ड नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील 15 दिवसात नागरिकांना नोंदणी केलेल्या ठिकाणी स्मार्ट कार्ड प्राप्त होईल.
स्मार्ट कार्डची वैशिष्ट्ये व सुविधा
- स्मार्ट कार्ड काढल्यानंतर जेष्ठ नागरिकांना कोणत्याही प्रकारचा ओळखपत्र सोबत बाळगण्याची आवश्यकता नाही.
- एसटी मधून प्रवास करत असताना ओळखपत्र म्हणून स्मार्ट कार्ड दाखवता येईल.
- या कार्डमध्ये लवकरच डिजिटल वॉलेटची सुविधा सुद्धा उपलब्ध होणार आहे.
- डिजिटल वॉलेटमध्ये पैसे भरून नागरिकांना आपल्या सहप्रवाशांचा तिकीटसुद्धा काढता येईल.
- एसटीच्या ठराविक आगारामध्ये स्मार्ट कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध आहे.
निष्कर्ष : तुम्ही स्वतः ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये तुमचे आजी, आजोबा कोणीही ज्येष्ठ नागरिक असतील, तर त्यांच्यासाठी शासनामार्फत सुरू केलेली ही योजना खूपच लाभदायी व महत्त्वकांक्षी आहे.