MTDC Fellowship Program 2023 : मित्रांनो, तुम्हाला जर पर्यटन क्षेत्रात काम करण्याची आवड असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विकासासाठी विविध क्षेत्रातील नवीन दृष्टिकोन व तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामध्ये फेलोशिप म्हणून काम करण्याची संधी मिळत आहे.
इच्छुक अर्जदारांना फेलोशिप संधीचा लाभ घेण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे असून अर्जदारांना सर्व आवश्यक कागदपत्रासह नमूद पत्त्यावरती अर्ज करायचा आहे.
वयोमर्यादा : फेलोशिप संधीचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांना वयोमर्यादा ठरविण्यात आलेली आहे. 31 मार्च 2023 रोजी 21 ते 26 वर्ष पूर्ण झालेल्या युवकांना यासाठी अर्ज करता येईल.
📒 शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील प्रथम श्रेणी प्राप्त पदवीधारकांना फेलोशिप प्रोग्रामसाठी अर्ज करता येईल. या फेलोशिप प्रोग्राममध्ये पदव्युत्तर किंवा पदवीधारक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. यासाठी किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
🔔 अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मफतलाल हाऊस, एस.टी पारीख मार्ग, 169 बॅकबे रिक्लेमेशन्स, चर्चगेट, मुंबई – 40020
⏰ अर्जाची शेवटची तारीख : 15 मे 2023
MTDC Fellowship Program Important Links :
01 | MTDC Fellowship Program Advertisment PDF | 15-03-2023 |
02 | MTDC Fellowship recruitment 3/5/11 months internship Advertisement | 15-03-2023 |
How to apply for MTDC Fellowship Program 2023 ?
- अर्जदारांना संपूर्ण नाव, जन्म तारीख, रहिवाशी पत्ता, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचा फोटो, सर्व शैक्षणिक कागदपत्रंची सॉफ्ट कॉपी इत्यादी माहिती व कागदपत्र या gm@maharashtratourism.gov.in नमूद ई-मेल आयडीवरती पाठवायची आहेत.
- किंवा अर्जदार खालील नमूद पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
- महाव्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मफतलाल हाऊस, १ ला मजला, एस. टी. पारीख मार्ग, १६९ बॅकबे रिक्लेमेशन्स, चर्चगेट, मुंबई ४००२० यांना करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे आहे, त्यामुळे अर्जदारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.