VJNT Loan Scheme 2023 : या तरुणांना दुकान, व्यवसायासाठी 1 लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळणार; पात्रता वाचून लगेच अर्ज करा..,

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना 2023 : नमस्कारमित्रांनो, आज आपण वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ कर्ज योजना  VJNT Loan scheme 2023Vasantrao Naik Mahamandal Karj Yojana 2023 या योजनेअंतर्गत नागरिकांना ३७ प्रकारच्या नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी १ लाख रुपयांपर्यत बिनव्याजी कर्ज कसे मिळवावे हे जाणून घेणार आहोत.

वसंतराव नाईक कर्ज योजना 2022 | vasantrao naik karj yojana aaplesarkars
वसंतराव नाईक कर्ज योजना | vasantrao naik karj yojana

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या थेट कर्ज योजनेअंतर्गत कर्जाची मर्यादा आता रू. 25,000/- वरून रू. 1,00,000/- करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे.

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनेचा उद्देश आणि फायदे खालील प्रमाणे.

  • भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील घटकांची आर्थिक उन्नती करणे,आर्थिकदृष्ट्या सक्षम  करून तात्काळ वित्त पुरवठा करणे हा योजनेचा उद्देश आहे.
  • मासळी विक्री, भाजीपाला विक्री, फळ विक्री, किराणा दुकान, आठवडी बाजारामध्ये छोटसे दुकान, टेलिफोन बुथ किंवा अन्य तांत्रिक लघु उद्योग अशा लघु व्यवसायासाठी ही योजना सुरू करणे,
  • विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील निराधार, विधवा महिला इ.लाभार्थीना तात्काळ / प्राथम्याने लाभ देणे.
  • वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना तसेच अन्य कर्ज योजनेकरिता अर्ज सुरु झाले आहेत.
  • VJNT business Loan yojana 2023 या योजनेतील उद्योग खालील प्रमाणे.
  • 1. मत्स्य व्यवसाय 
  • 2. कृषी क्लिनिक 
  • 3. पॉवर टिलर
  • 4. हार्डवेअर व पेंट शॉप
  • 5. सायबर कॅफे
  • 6. संगणक प्रशिक्षण 
  • 7. झेरॉक्स 
  • 8. स्टेशनरी 
  • 9. सलुन 
  • 10. ब्युटी पार्लर 
  • 11. मसाला उद्योग 
  • 12. पापड उद्योग
  • 13. मसाला मिर्ची कांडप उद्योग 
  • 14. वडापाव विक्री केंद्र 
  • 15. भाजी विक्री केंद्र 
  • 16. ऑटोरिक्षा
  • 17. चहा विक्री केंद्र 
  • 18. सॉफ्ट टॉईज विक्री केंद्र 
  • 19. डी. टी. पी. वर्क 
  • 20. स्विट मार्ट 
  • 21. ड्राय क्लिनिंग सेंटर 
  • 22. हॉटेल 
  • 23. टायपिंग इन्स्टीटयुट
  • 24. ऑटो रिपेअरींग वर्कशॉप
  • 25. मोबाईल रिपेअरिंग
  • 26. गॅरेज
  • 27. फ्रिज दुरूस्ती
  • 28. ए.सी .दुरुस्ती 
  • 29. चिकन / मटन शॉप
  • 30. इलेक्ट्रिकल शॉप
  • 31. आईस्क्रिम पार्लर व इतर 
  • 32. मासळी विक्री
  • 33. भाजीपाला विक्री 
  • 34. फळ विक्री 
  • 35. किराणा दुकान
  • 36. आठवडी बाजारामध्ये छोटसे दुकान 
  • 37. टेलिफोन बुथ किंवा अन्य तांत्रिक लघु उद्योग व इत्यादी
  • विशेष म्हणजे विमुक्त जाती, भटक्या जमाती, व विशेष मागास प्रवर्गातील निराधार, विधवा महिला इत्यादी लाभार्थ्यांना तात्काळ प्राथम्याने लाभ देण्यात येणार आहे.
  • VJNT loan scheme 2023 कर्जाचे स्वरूप : 
  • प्रकल्पात मंडळाचा सहभाग :- 100%
  • प्रकल्पात एकूण रक्कम :- रू.1,00,000 पर्यंत.
  • व्याजदर :- नियमित कर्ज फेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज आकारण्यात येणार नाही.
  • कर्जाची परतफेड नियमित वेळेवर न करणाऱ्या लाभार्थ्यांच्या बाबतीत दंडनीय व्याजदर खालील प्रमाणे.
  • 1. नियमित 48 समान मासिक हप्त्यामध्ये मुद्दल परतफेड :- रू. 2085 /- परतफेड करावी लागेल .
  • 2. नियमित कर्जाची परतफेड न करणा – या लाभार्थींना जेवढे कर्जाचे हप्ते थकीत होतील , त्या रक्कमेवर द.सा.द.शे. 4% व्याज आकारण्यात येईल . 
  • योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेचे स्वरूप.
  • पहिला हप्ता (75%) म्हणजेच रु.75,000/-
  • दुसरा हप्ता (25%) रू. 25,000/- 
  • दुसरा हप्ता प्रत्यक्ष उद्योग सुरू झाल्यानंतर साधारणतः 3 महिन्यानंतर दिला जाईल. (जिल्हा व्यवस्थापकांच्या तपासणी अभिप्रायानुसार) आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्जाची परत फेरतफेड ही कर्ज वितरित केल्याच्या 90 दिवसानंतर सुरू होईल.
  • VJNT Online Application Documents
  • आधार कार्ड
  • पैन कार्ड
  • बैंक पासबुक
  • जातीचे प्रमाणपत्र
  • राशन कार्ड
  • प्रोजेक्ट रिपोर्ट
  • एक पासपोर्ट साइज फोटो

VJNT Loan yojana Maharashtra 2023 वसंतराव नाईक कर्ज योजनेचा GR / शासन निर्णय 2022 / PDF

vasantrao naik mahamandal online application : असा करा ऑनलाईन अर्ज

  • आपण या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता 
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी http://www.vjnt.in या वेबसाईट वर जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता.
  • र्व प्रथम तुमाला येथे दिलेल्या वेबसाईट वर जावे लागेल.
  • योजनेच्या अधिक सविस्तर माहितीसाठी :->> येथे क्लिक करावे
VJNT Loan scheme 2022 : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळात Vasantrao Naik Mahamandal Karj Yojana
VJNT Loan scheme: वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ
  • वेबसाईट वर आल्यानंतर नोंदणी या ऑपशन वर क्लिक करा. क्लिक केल्या नंतर नोंदणी फॉर्म उघडेल. 
  • अर्ज कश्या प्रकारे भरायचा या बद्दल आपण युट्युब वर देखील सर्च करू शकता किंवा जवळच्या आपले सरकार / सीएससी केंद्रात जाऊन देखील अर्ज भरू शकता.
  • आधिक माहिती नियम व अटी पाहण्यासाठी तुम्ही या योजनेचा शासन निर्णय देखील वाचून घ्यावा. धन्यवाद!

Leave a Comment


Scroll to Top