Online Voter Registration : मतदार यादी मध्ये ऑनलाईन नाव नोंदणी करून मतदान कार्ड काढा; पहा A to Z माहिती व संगीतल्याप्रमाणे नोंदणी करा.

नमस्कार मित्रांनो, भारतीय राज्यघटनेनं प्रत्येक नागरिकाला वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा अधिकार दिला आहे. हा अधिकार बजाविण्यासाठी प्रत्येक नागरिकाला भारतीय निवडणूक आयोगातर्फे निवडणूक ओळखपत्र दिलं जातं. ‘राष्ट्रीय मतदार दिन’ दरवर्षी 25 जानेवारी ला साजरा केला जातो. त्याचबरोबर मतदान कार्ड हे आपल्या प्रत्येकासाठीच अत्यंत महत्वाचे आहे. त्यानिमित्तानं जाणून घ्या कशी करता येईल ‘ऑनलाइन मतदार नोंदणी’.

मतदार नोंदणी आता ऑनलाइन करा

तसेच जर तुम्हाला , परिवारातील सदस्यांना किंवा तुमच्या मित्रांना ऑनलाइन पद्धतीने तुमच्या गावच्या मतदार यादीत नाव नोंदणी करताना अडचण येत असेल किंवा अवघड वाटत असेल तर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने देखील कधी नोंदणी करावी हे देखील आम्ही खाली सांगितले आहे , म्हणून हा लेख सविस्तर वाचून नोंदणी करावी.

मतदार यादीत नाव नोंदणी करिता पात्रता.

१) आपणं भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

२) सुधारित वर्षाच्या १ जानेवारी ला १८ वर्ष पूर्ण असायला हवीत.

३) नोंदणी करण्यासाठी मतदार संघ/भाग/मतदान क्षेत्राचे रहिवाशी असायला पाहिजे.

मतदार यादीत नाव नोंदणी कशी करावी?

 1. आपण नोंदणी करण्यासाठी संकेस्थळवरून फॉर्म भरू शकता.यासाठी तुम्हाला https://voterportal.eci.gov.in/ या संकेस्थळावरती यावं लागेल
 • नंतर तुम्हाला Create an Account या पर्यायावरती क्लिक करा.त्यांनतर तुम्हाला मोबाईल नंबर किंवा ई-मेल आय डी टाकून Send OTP वरती क्लिक करा.
मतदार नोंदणी अर्ज online See how to register a new name online in the voter list. See how to register a new name online in the voter list.

मतदार नोंदणी अर्ज online
 • तुमच्या मोबाईल नंबर वरती OTP येईल हा OTP Verify करायचा आहे. OTP Verify झाल्यानंतर एक पासवर्ड तयार करावा लागेल.
 • captcha भरून Create Account वरती क्लिक करा.
मतदार नोंदणी अर्ज online See how to register a new name online in the voter list.

मतदान नाव नोंदणी
 • तुमचे account तयार होईल.
 • नंतर वापरकर्ता नाव/Username हा तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावे लागेल.
 • लॉग इन झाल्या नंतर प्रथम तुमचं नाव नंतर आडनाव टाकायचं आहे.
 • त्यानंतर आपले राज्य निवडावे लागेल.
 • नंतर Gender निवडायचे आहे.
मतदार यादीत ऑनलाइन नाव नोंदणी 2022 See how to register a new name online in the voter list.
मतदार यादीत ऑनलाइन नाव नोंदणी 2022
 • अशा प्रकारे तुमच्या समोर स्क्रीन दिसेल.इथे तुम्हाला New Voter Registration या पर्यायावरती क्लिक करा.
 • यानंतर Let’s Start या वरती क्लिक करा.आपणं नवीन नाव नोंदणी करण्यासाठी Yes या पर्याया वरती क्लिक करा.
 • नंतर आपण Residing In India हा पर्याय निवडा.
 • नंतर आपली वैयक्तिक माहिती व्यवस्थित भरावी.
 • सर्व माहिती भरल्यानंतर आपण आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी.
How To Apply Online Registration Of Voter See how to register a new name online in the voter list.
 • नंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक मिळेल.या द्वारे आपण अर्जाची सद्यस्थिती पाहू शकता.

वर दिलेल्या पद्धतीनुसार तुम्ही शासनाच्या अधिकृत संकेतथळवार जाऊन नवीन मतदार यादीत नाव नोंदणी करू शकता व त्यांतर तुम्हाला पोस्टाने तुमच्या आधार कार्ड वरील पत्त्यावर ते 1 महिन्याच्या आत येईल किंवा तुम्ही त्याची प्रिंट देखील करू शकता.

असे काढा ऑफलाइन पद्धतीने मतदान कार्ड

मतदार यादी मध्ये ऑफलाइन पद्धतीने नाव नोंदणी करून मतदान कार्ड काढण्यासाठी तुम्ही तुमच्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांना जाऊन भेट त्यांच्या कडे तुमचे 2 फोटो व आधार कार्ड ची झेरॉक्स द्या ते तुमची नोंदणी करून देतील किंवाच तुमच्या ग्रामपंचात कार्यालयात संपर्क करावा.

अधिक माहितीसाठी :- Contact Us :- For details of eligibility criteria or any other additional information related to electoral forms, kindly visit https://eci.gov.in

For any other technical feedback or issues on the portal kindly send your feedback to ECI Technical SupportToll free Number :- 1800111950


Scroll to Top