Pension News : पैशांचे व्यवस्थित नियोजन न केल्यास उतार वयात अनेक अर्थिक संकटांना सामोरे जावे लागते. त्यात अतार वयात उत्पनाचे कोणतेही साधन नसते. त्यामुळे वेळीच आपण योग्य नियोजन केले तर, उतार वयातील आपले उर्वरित आयुष्य सुखात जाऊ शकते.

आज आम्ही तुम्हला अशाच एका सरकारी योजनेबाबत माहिती सांगणार आहोत. ज्यात तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला म्हातारपणी १० हजारांचे पेन्शन मिळेल. अटल पेन्शन योजना असे या योजनेचे नाव आहे.
या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करू शकता. अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यानंतर, तुम्हाला इतर कोणत्याही व्यक्तीवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहण्याची गरज नाही. जर तुम्ही तुमच्या पत्नीसह या योजनेत गुंतवणूक केली असेल तर, दोघेही 60 वर्षांचे झाल्यानंतर पती-पत्नी दोघांना दरमहा 5 +5 असे 10 हजारांची पेन्शन मिळेल.

अधिक माहिती येथे वाचा :-> Atal Pension Yojana पती-पत्नी दोघांना मिळणार दरमहा 10 हजारांचे पेन्शन
कोण करू शकतो गुंतवणूक
भारतातील कोणताही नागरिक अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करू शकतो. ही योजना पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीद्वारे चालवली जात आहे. भारत सरकारने 2015 मध्ये अटल पेन्शन योजनेची सुरूवात केली होती.
या योजनेत फक्त १८ ते ४० वयोगटातील व्यक्तीच गुंतवणूक करू शकतात. जर, तुमचे वय १८ वर्षे असल्यास आणि तुम्ही या योजनेत दरमहा २१० रुपये गुंतवल्यास वयाच्या ६० व्या वर्षानंतर तुम्हाला दरमहा पाच हजार रुपये पेन्शन मिळेल.

अधिक माहिती येथे वाचा :-> Atal Pension Yojana : सरकारच्या या योजनेतून वयवर्ष 18 ते 40 असणाऱ्या या नागरिकांना 5,000 रु. पेन्शन मिळणार
यामध्ये तुम्ही तुमच्या पत्नीसह गुंतवणूक केली असेल तर, वयाच्या ६० व्या वर्षानंतर दोघांनाही दरमहा ५ + ५ असे १० हजार रुपये पेन्शन मिळेल. तुम्हालाही तुमच्या पत्नीसह अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक सुरू करायची असल्यास. https://enps.nsdl.com/eNPS/NationalPensionSystem.html या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यावी लागेल.