शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र 2022 a TO z मराठी माहिती
Toilet list released 2022 वैयक्तिक शौचालय योजना महाराष्ट्र ; सरकार देशातील गोरगरीब नागरिकांसाठी विविध योजना राबवित असते त्यामध्ये काही योजना फक्त शेतकऱ्यांसाठी मर्यादित असतात तर काही योजना या सर्व नागरिकांसाठी उपयुक्त आणि फायदेशीर असतात. त्याच बरोबर स्वच्छ भारत मिशन ही एक योजना सध्या भारतामध्ये राबवली जात आहे. या योजनेचा लाभ हा भारतातील सर्व नागरिकांना मिळत आहे.

नमस्कार मित्रांनो , स्वच्छ भारत अभियानाच्या (ग्रामीण) दुसऱ्या टप्प्यात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने राज्यातील ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांसाठी वैयक्तिक शौचालये (Personal toilets) सुविधा ऑनलाइन प्रणालीद्वारे वैयक्तिक शौचालयासाठी अर्ज करण्याची सुविधा सुरू केली आहे. या प्रणालीद्वारे ग्रामीण भागातील पात्र कुटुंब वैयक्तिक शौचालय (Personal toilets) बांधण्यासाठी अर्ज करू शकतात आणि आणि नंतर प्रोत्साहन अनुदान मंजूरीसाठी अर्ज करू शकतात.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) ही केंद्र सरकार पुरस्कृत महत्त्वाकांक्षी योजना असून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त उपक्रमातून राबविण्यात येते. लाभार्थी कुटुंबाने ग्रामीण भागात वैयक्तिक शौचालये (Personal toilets) बांधल्यानंतर स्वच्छतेबाबत जनजागृती, व्याप्ती वाढवणे आणि उघड्यावर शौचास जाणे रोखण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. या योजनेंतर्गत, सर्व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे आणि दारिद्र्यरेषेखालील अनुसूचित जाती, जमाती, लहान आणि अल्पसंख्याक शेतकरी, भूमिहीन शेतमजूर, शारीरिकदृष्ट्या अपंग आणि महिला कुटुंबप्रमुख प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र आहेत.

> महत्वाचे म्हणजे , वैयक्तिक शौचालय योजना महाराष्ट्र 2022 ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट ही आहे , संभावता ही तारीख वाढू देखील शकते ,, अधिक माहितीसाठी खाली सविस्तर लेख वाचा व आजच तुमचा अचूक अर्ज सादर करावा.
हे वाचले का तुम्हीं:- ग्रामपंचायत, पंचायत समिती विभाग योजनांची यादी 2022 | Maharashtra Gram Panchayat Yojana List | 100 पेक्षा जास्त सरकारी योजना..,
स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) च्या पहिल्या टप्प्यात ६६ लाख ४२ हजार ८९० कुटुंबांना वैयक्तिक शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, स्वच्छ भारत अभियानांतर्गत (ग्रामीण) एकही व्यक्ती शौचालय (Personal toilets) सुविधेपासून वंचित राहू नये यासाठी राज्यात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी वैयक्तिक शौचालयासाठी (Personal toilets) अर्ज करण्याची सुविधा पुन्हा सुरु करण्यात आलेली आहे

वयक्तिक शौचालयांचे बांधकाम कसे असावे
कुटुंबासाठी शौचालय पूर्णपणे ४ भिंती, दरवाजे आणि छतासह बांधलेले असावे त्यासोबतच शौचालयात वापरासाठी पाणी आणि हात धुण्याची सुविधा देखील असावी. शौचालय बांधण्यासाठी 12000 रुपये अनुदान सरकारकडून या योजनेंतर्गत दिले जाणारे प्रोत्साहन अनुदान ग्रामपंचायत स्तरावर देय आहे.
हे वाचले का तुम्हीं:- Kusum Solar Pump Yojana 2022 | कुसुम सौर कृषी पंप महाराष्ट्र 95% अनुदान अशी करा स्टेप बाय स्टेप A To Z नोंदणी | शेतकऱ्यांसाठी खास योजना नक्की लाभ घ्या

स्वच्छ भारत मिशन उद्दिष्ट (PERSONAL TOILETS SCHEME 2022):
- स्वच्छता, आरोग्यदायी सवयी व हागणदारी मुक्तीव्दारे ग्रामीण क्षेत्रातील सर्वसाधारण जीवनमानात सुधारणा घडवून आणणे.
- ग्रामीण भागातील स्वच्छतेच्या व्याप्तीची गती वाढवणे आणि स्वच्छ भारतचे स्वप्न साकार करणे.
- शाश्वत स्वच्छतेच्या साधनांचा प्रसार करणाया पंचायतराज संस्था आणि सामाजिक गटांना जाणीव जागृती व आरोग्य शिक्षण याव्दारे प्रेरित करणे.
- पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित कायमस्वरुपी स्वच्छतेसाठी स्वस्त आणि योग्य तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे.
- ग्रामीण भागात सार्वत्रिक स्वच्छता राखण्यासाठी लोकांचे व्यवस्थापन असलेल्या आणि घनकचरा व सांडपाण्याच्या विल्हेवाटीला प्राधान्य देणाया पर्यावरणास अनुकूल स्वच्छतेच्या पध्दती विकसित करणे.

वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन अर्ज सुरु
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, राज्यामध्ये स्वच्छतेचा जागर कायम रहावा व स्वच्छ भारत अभियान (ग्रा.) अंतर्गत शौचालय सुविधेपासून कोणीही वंचित राहू नये, याकरिता आता दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालय नसलेल्या पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालय उपलब्ध व्हावीत यासाठी घरी बसूनच ऑनलाईन प्रणालीद्वारे वैयक्तिक शौचालयाकरिता अर्ज करण्याची सुविधा तयार करण्यात आली आहे.
how to apply for free toilet scheme
ऑनलाईन प्रणालीद्वारे वैयक्तिक शौचालयाकरिता अर्ज करण्याची प्रक्रिया :
1 ) ऑनलाईन प्रणालीद्वारे वैयक्तिक शौचालयाकरिता अर्ज करण्यासाठी आपण https://sbm.gov.in/sbm_dbt/secure/login.aspx किंवाच https://sbm.gov.in/sbmphase2/homenew.aspx या लिंक द्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

2) मित्रांनो वरीलपैकी कोणत्याही लिंक वर क्लिक केल्यानंतर ती Link तुम्हाला ऑनलाईन प्रणालीद्वारे वैयक्तिक शौचालयाकरिता अर्ज करण्याची अधिकृत संकेतस्थळावर घेऊन जाईल तेथे जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर , तुम्हाला आधी Citizen Registration येथे क्लिक करून तुमचा मो नंबर ,नाव व इतर माहिती भरून लॉगिन करावे.

3) Submit या बाटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा मॅसेज दिसेल की, Successful You have Successfully Registered.Kindly use Registered Mobile No. as login ID and last four digit as password for login. Ok
4) या नंतर Login या बाटणवर क्लिक करावे तुमचा मो नंबर व पासवर्ड मध्ये तुमच्या मो नंबर चे शेवटचे 4 अंक प्रविष्ट करा व खाली दिलेला क्यापचा टाका व Sign. In वर क्लिक करा. व त्यानंतर तुम्हाला 8 अंकी नवीन पासवर्ड तयार करावा लागेल.
5) त्यानंतर Password has been changed successfully. असे नाव येईल खाली Home वर क्लिक करा.

6) आधी 3 लाइन वर क्लिक करा व नंतर New Application ( नवीन अर्ज ) यावर क्लिक करा
7) आत्ता तुमच्या समोर IHHL Online Application Form ओपेन झाला असेल , त्या फॉर्म मध्ये विचारली गेलेली माहीती नीट वाचून भरावी व अचूक अर्ज करावा. Apply
8) या लिंकवर नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जदारास वैयक्तिक शौचालय बांधण्याकरिता व त्यानंतर वितरणासाठी प्रोत्साहन अनुदानाकरिता मान्यतेसाठी अर्ज करता येणार आहे. पात्र कुटुंबांनी या सुविधेचा लाभ घेवून राज्याला हागणदारीमुक्त करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
पुढे अचूक ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील व्हिडिओ संपूर्ण पहावा व सांगितल्याप्रमाणे अर्ज सादर करावा
सरकारी कर्ज पाहिजे मग इथे पहा :- Jan Samarth Portal |जन समर्थ पोर्टलचे मोदींच्या हस्ते उद्घाटन कर्ज योजनांचा महापूर | शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात होणार १००% फायदा
Comments are closed.