PF Account : नमस्कार मित्रांनो, खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी भविष्य निर्वाह निधी (epfo Account) ही एक अतिशय महत्त्वाची बचत आहे. या निधीमध्ये जमा केलेल्या रकमेमुळं नोकरदारांना अडचणीच्या काळात मोठा दिलासा मिळतो. कोविड महामारी दरम्यान, नोकरदार लोकांसाठी FIF ची रक्कम खूप उपयुक्त ठरली. पगारदारांच्या पगाराचा काही भाग पीएफ फंडात जमा केला जातो. या फंडात जमा केलेल्या रकमेवर सरकार व्याज (PF Interest) देतं. सरकारनं या आर्थिक वर्षासाठी पीएफमध्ये जमा केलेल्या रकमेवर व्याज निश्चित केलं आहे.

घरबसल्या काढता येतात पीएफचे पैसे :-
EMPLOYEES’ PROVIDENT FUND ORGANISATION, INDIA : सरकार लवकरच पीएफ खातेदारांच्या खात्यात व्याजाची रक्कम टाकू शकतं. पण तुम्ही बँक खात्याप्रमाणं पीएफ खात्यातून पैसे काढू शकत नाही. EPFO काही अटींसह पीएफ खात्यातून पैसे काढण्याची परवानगी देते. परंतु, तुम्ही घरी बसून पीएफचे पैसे सहज काढू शकता. ईपीएफओनुसार, तुम्ही केवळ 72 तासांत ऑनलाइन पैसे काढू शकता.
पीएफचे पैसे काढण्याचे नियम :-
कोविड महामारीच्या काळात पीएफ खात्यातून पैसे काढण्याचे नियम बदलण्यात आले होते. यापूर्वी, निवृत्तीनंतर किंवा घर खरेदी आणि मुलांचं शिक्षण यासारख्या गरजांसाठी पीएफ खात्यातून पैसे काढता येत होते. कोरोना महामारीमुळे लोकांना भेडसावणाऱ्या आर्थिक समस्या लक्षात घेता EPFO नं विशेष सूट दिली आहे. अशा परिस्थितीत, कोणीही आपल्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकतो, परंतु पैसे काढण्याची रक्कम देखील निश्चित करण्यात आली आहे.

किती दिवसात पीएफचे पैसे मिळतात?
कोणताही खातेदार तीन महिन्यांचा मूळ पगार आणि महागाई भत्ता किंवा PF खात्यातील एकूण जमा रकमेच्या 75 टक्के रक्कम सहज काढू शकतो. यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम काढता येते. ऑनलाइन क्लेम करणाऱ्यांना तीन दिवसांत हे पैसे बँक खात्यात जमा होतात. तर ऑफलाइन दावा करणाऱ्यांना 20 दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते.
पीएफ खात्यातून घरबसल्या ऑनलाइन पैसे कसे काढायचे?

- सर्व प्रथम EPFO च्या सदस्य पोर्टलवर जा. किंवा डायरेक्ट लॉगिन करण्यासाठी https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या लिंक वर क्लिक करा
- मेनूमधील सेवा पर्यायावर क्लिक करा.
- तुम्हाला For Employees वर क्लिक करावं लागेल.
- त्यानंतर एक नवीन पेज उघडेल. येथे Member UAN/Online service (OCS/OTCP) निवडा.
- यानंतर लॉगिन पेज उघडेल.
- येथे Universal Account Number (UAN) आणि पासवर्डच्या मदतीने uan login लॉगिन करा.
- नवीन पेजवर ऑनलाइन सेवा वर जा. ड्रॉप डाउन मेनूमधून Claim (फॉर्म-31, 19 आणि 10C) निवडा.
- आता एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला बँक खाते क्रमांकाची पडताळणी करावी लागेल.
- पडताळणीनंतर, Certification of Undertaking उघडेल, जे एक्सेप्ट करा.

- Proceed for Online Claim या पर्यायावर क्लिक करा.
- आता एक फॉर्म उघडेल. येथे I want to apply for समोरील ड्रॉपडाउनमधून PF ADVANCE (Form-31) निवडा.
- येथे तुम्हाला पैसे काढण्याचे कारण आणि आवश्यक रक्कम विचारली जाईल.
- चेकबॉक्स मार्क केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल.
- ईपीएफओनुसार, तुम्ही केवळ 72 तासांत ऑनलाइन पैसे काढू शकता. आशा प्रकारे तुम्ही तुमच्या PF खत्यातून पैसे काढू शकता; धन्यवाद!
Comments are closed.