PM ABHA Health Card : प्रत्येक नागरिकाला मिळणार ‘प्रधानमंत्री आभा हेल्थ कार्ड’; लगेच करा रजिस्ट्रेशन? मुख्यमंत्र्यांनीही केलं आवाहन..

Aabha Health Card : सर्व नागरिकांना नमस्कार, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या संकल्पनेतून डिजिटल इंडियाची सुरुवात झाली आहे. आयुष्मान भारत डिजीटल मिशन (ABHA) चा एक भाग म्हणून भारत सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड (Abha Health Card) 2022 हा उपक्रम सुरु केला आहे. नागरिकांसाठी हे हेल्थ कार्ड आवश्यक असून सर्वांनी या आभा कार्डसाठी नोंदणी करावी असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलं आहे.  खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक व शेवटपर्यंत वाचावी.

PM ABHA Health Card
खाली सविस्तर योजना वाचा व आजच प्रधानमंत्री आभा हेल्थ कार्ड काढा

Ayushman Bharat Digital Mission : आभा हेल्थ कार्डच्या मदतीने देशभरातील सर्व रूग्णालयांमध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. डिजीटल हेल्थ मिशन अंतर्गत सरकार प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड म्हणजेच आभा बनवत आहे. या हेल्थ कार्डचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना हेल्थ कार्डवर नोंदणी करावी लागेल. या कार्डवर नोंदणी कशी करावी? आणि त्यासाठी कोणती कागदपत्रं लागतील याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे.   

ही योजना नक्की वाचा :-> PMJAY : प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 2022 | रु. ५ लाख प्रतीवर्ष मिळणार फायदा; आजच आपले नाव यादीत बघून घ्या व अर्ज करा..

ABHA – Ayushman Bharat Health Account : आभा हेल्थ कार्डच्या मदतीने देशभरातील सर्व रूग्णालयांमध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

अशी करा डिजिटल हेल्थ कार्ड नोंदणी 2022

  • सर्वप्रथम healthid.ndhm.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • ड्रॉप-डाउन मेनूमधून (आयुष्मान भारत आरोग्य खाते) डिजिटल हेल्थ कार्ड क्रिएट अकाऊंट निवडा. 
  • 2022 मध्ये डिजिटल हेल्थ कार्डसाठी नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सवर क्लिक करा.
  • नाव, पत्ता, फोन नंबर, प्राप्त झालेला OTP आणि इतर आवश्यक माहिती भरा.
  • 14 अंकी डिजिटल हेल्थ कार्डसाठी ऑनलाईन अर्ज भरा. अशा प्रकारे तुम्ही डिजिटल हेल्थ कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
Aabha Health Card
Aabha Health Card

डिजिटल हेल्थ आयडी कार्ड ABHA नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रं :

  • डिजिटल हेल्थ कार्ड ABHA नोंदणी 2022 पूर्ण करण्यासाठी या कागदपत्रांची आवश्यकता असू शकते.
  • आधार कार्ड, मोबाईल नंबर, जन्म प्रमाणपत्र आणि पत्ता आवश्यक आहे.
  • डिजिटल हेल्थ कार्डसाठी नोंदणी करण्यासाठी पॅन कार्ड देखील वापरले जाऊ शकते.
  • 2022 मध्ये डिजिटल हेल्थ कार्डच्या नोंदणीसाठी वैध ड्रायव्हिंग परवाना देखील वापरला जाऊ शकतो.

मित्रांनो, या हेल्थ कार्डमध्ये तुम्हाला आधार कार्डाप्रमाणे तुम्हाला 14 अंकी नंबर मिळेल. या कार्डसोबत रूग्णाची आरोग्याशी संबंधित संपूर्ण माहिती नोंदवली जाईल. या कार्डच्या मदतीने डॉ. तुमच्या संपूर्ण आरोग्याच्या नोंदी पाहू शकतात. म्हणजेच या कार्डद्वारे कोणत्याही रूग्णाचा वैद्यकीय इतिहास अगदी सहज शोधता येणार आहे; धन्यवाद!

Comments are closed.


Scroll to Top