pm kisan new registration 2022 : नमस्कार शेतकरी बंधु आणि भगिनींनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) ही भारत सरकारच्या महत्त्वाच्या योजनांपैकी एक आहे. या योजनेंतर्गत, 2 हेक्टर (4.9 एकर) पेक्षा कमी जमीन असलेल्या लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करते (PM Kisan). या योजनेंतर्गत सर्व शेतकऱ्यांना किमान उत्पन्न आधार म्हणून प्रतिवर्षी रु. 6,000/- रुपये मिळतात.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला प्रति वर्ष रु. 6,000 तीन हप्त्यांमध्ये दिले जातात आणि मदतीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. म्हणजेच दर 4 महिन्यांनी 2 हजारांची मदत शेतकऱ्याला दिली जाते.
आज आपण या योजनेसाठी नवीन नाव नोंदणी कशी करायची याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही जर शेतकरी आहात आणि तुमच्या नावावर जर जमीन आहे आणि तुम्ही अजून पर्यंत जर याचा लाभ घेतला नसेल तर या योजनेचा तुम्ही अवश्य लाभ घ्या कारण या योजनेच्या माध्यमातून वार्षिक 6 हजार रुपये मिळणार आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे ?

- आधार कार्ड ( मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक )
- रेशन कार्ड नंबर 12 अंकी ( तुमच्या गावातील रेशन धान्य दुकानात मिळेल )
- 7/12 उतारा
- 8/अ उतारा
- बँक पासबुक ची आवश्यकता नाही कारण तुमचे पेमेंट आधार पेमेंट मोड वरती येणार. तुमचे आधार कार्ड ज्या बँकेत NPCI ला लिंक आहे त्याच बँकेत तुमचे पैसे येणार आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी घरबसल्या नवीन नोंदणी करण्यासाठी खाली क्लिक करा

किंवाच असा भरावा ऑफलाइन फॉर्म :- शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर घरबसल्या फॉर्म भरण्यास अवघड वाटत असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या CSC म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन या योजनेचा अचूक अर्ज करू शकता व फॉर्म भरल्याची पोच पावती घेऊ शकता अधिक माहितीसाठी पात्र शेतकरी या योजनेसाठी महसूल अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे आवश्यक तपशील सादर करून अर्ज करू शकतात; धन्यवाद!