PM Svanidhi yojana 2022 : पंतप्रधान स्वनिधी योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 1 जून 2020 रोजीपासून केली आहे. या योजनेअंतर्गत सर्व गरजू उद्योजकांना कर्ज उपलब्ध देण्यात येते. या योजनेचा लाभ पथ विक्रेते, भाज्या विक्रेते , फळे विक्रेते, रस्त्याच्या कडेचे दुकानदार विक्रेते यांना होणार आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ अनुदानाच्या स्वरूपात कर्ज उपलब्ध करून देणे आणि सुलभ हप्त्यांमध्ये त्याची परतफेड करून घेणे.
Pradhan Mantri SVANidhi Scheme : केंद्र सरकारने देशातील सुमारे 50 लाख फेरीवाल्यांना, व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी 10,000/रुपया पर्यंत विना तारण खेळते भांडवल एका वर्षासाठी उपलब्ध करून देण्यासाठी पीएम स्वनिधी योजना सुरु केली आहे. उत्तम परतफेड करण्याच्या वृत्तीला प्रोत्साहन म्हणून 7%प्रती वार्षिक दराने व्याज अनुदान आणि डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन म्हणून प्रती वर्ष 1,000 रुपयापर्यंत कॅशबॅक देण्यात येणार आहे.
हे देखील वाचा : Atal Pension Scheme 2022 : वयवर्ष 18 ते 40 असणाऱ्या सर्व नागरिकांसाठी महाबँकेची, केवळ 210 रुपयामध्ये 5 हजार रुपयाची पेन्शन मिळणार
फेरीवाल्याने या रकमेची वेळेवर परतफेड केल्यास आणि व्यवहारात डिजिटल पेमेंटचा उपयोग केल्यास त्याला व्याज चुकते करावे लागणार नाही. उलट त्याला अनुदान मिळणार आहे. 2 जुलै 2020 पासून “PM SVANidhi या माहिती तंत्रज्ञान मंचाद्वारे कर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. एसआयडीबीआय, सिडबी ही या योजनेच्या अंमलबजावणीसाठीची एजन्सीस आहेत.

पंतप्रधान स्वनिधी योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 1 जून 2020 रोजीपासून केली आहे. या योजनेअंतर्गत सर्व गरजू उद्योजकांना कर्ज उपलब्ध देण्यात येते. या योजनेचा लाभ पथ विक्रेते, भाज्या विक्रेते , फळे विक्रेते, रस्त्याच्या कडेचे दुकानदार विक्रेते यांना होणार आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ अनुदानाच्या स्वरूपात कर्ज उपलब्ध करून देणे आणि सुलभ हप्त्यांमध्ये त्याची परतफेड करून घेणे. स्वानिधी योजनेंतर्गत आतापर्यंत 27 77 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. या योजनेंतर्गत 14,34 अर्ज मंजूर झाले आहेत. स्वनिधी योजनेंतर्गत आतापर्यंत 7,88 लाख कर्ज वितरित केले गेले आहे.
स्वनिधी योजनेंतर्गत 3 लाख व्हेंडर्संना लोन : स्वनिधीयोजनेच्या अंतर्गत फुटपाथ वर दुकान लावणाऱ्या स्ट्रीट व्हेंडर्संना आर्थिक सहायता केली जात आहे. त्यासाठी आत्मनिर्भर भारत पॅकेजमध्ये 50 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन लाख स्ट्रीट वेंडर यांना 10 हजार रुपयांचे लोन वितरीत केले. या योजनेसाठी स्ट्रीट वेंडर जवळ महापालिकेने जारी केलेले ओळखपत्र असणे आवश्यक आहे. मात्र जर स्ट्रीट वेंडर्स नोंदणीकृत नाहीत तर ते सुद्धा स्वनिधी योजनेंतर्गत ऑनलाइन तथा ऑफलाइन अर्ज करू शकतात.या योजनेंतर्गत मिळालेले कर्ज लाभार्थ्यांना एक वर्षाच्या आत सुलभ हफ्त्यात किंवा कमी व्याजदरात परतफेड करावे लागते.
या योजनेच्या अंतर्गत 7 % व्याज अनुदानही मिळते. याचा अर्थ आहे की, याहून अधिक व्याज सरकार भरेल. पीएम स्वनिधी योजनेच्या माध्यमातून छोट्या व्यापाऱ्यांना आर्थिक मदत होईल व ते आपले काम सुरु ठेवतील.

स्वनिधी योजनेच्या अंतर्गत प्राप्त होणारी सबसिडी : SVANidhi Yojana च्या माध्यमातून देशातील फेरीवाल्यांना 10 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. ही योजना कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आली आहे. असे नागरिक जे रस्त्यांवर छोट्या-मोठ्या सामानाची विक्री करून आपला उद्योग सुरू करण्यास इच्छुक असतील अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जाईल. या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना 7 टक्के दराने व्याज सबसिडी दिली जाईल. सबसिडीची रक्कम कर्जदार लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दर तीन महिन्यांनी जमी केली जाईल.
योजनेचा अचुक अर्ज कसा व कोठे करावा? या योजनेचा अर्ज करण्यासाठी किंवाच या योजनेबाबत अधिक सविस्तर माहिती जाऊन घेऊन योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्हांला तुमच्या जवळच्या सरकारी / राष्ट्रीयकृत बँकेत जावे लागेल व त्यांच्या मार्गदर्शनाखाली अचुक अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा; धन्यवाद!
Comments are closed.