प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण); लाभार्थ्यांची घरकुल यादी व हप्त्याचा तपशील ऑनलाईन चेक करण्याची A to Z संपूर्ण माहिती..,

सर्वांना नमस्कार, आपण जर प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत घरकुलासाठी अर्ज केला असेल तर आता सरकारनं साल 2022-23 मधील लाभार्थ्यांची नावं जाहीर करायला सुरुवात केली आहे. आपल्या घरकुलासाठी केलेल्या ज्या अर्जांचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे, त्या त्या लाभार्थ्यांची नावे जाहीर केली जात आहेत. जसं जसं लाभार्थ्यांची नावं मंजूर होतील, तसंतशी त्यांची नावं या यादीत समाविष्ट केली जाणार आहेत.

या लेखा मध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थ्यांची पंचायत निहाय PWL यादी, हप्त्याचा तपशील, FTO ट्रॅकिंग, नागरिक तपशील आणि एककेंद्राभिमुखता तपशील, इत्यादी माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत.

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण); लाभार्थ्यांची घरकुल यादी, हप्त्याचा तपशील व FTO ट्रॅकिंग ई. ऑनलाईन चेक करा:

सर्वप्रथम आपल्याला मोबाईल मध्ये प्लेस्टोर मधून  किंवा खालील लिंक वर क्लिक करून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) आणि राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभाग, केंद्र सरकारचे UMANG ऍप इन्स्टॉल करायचे आहे.

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण); लाभार्थ्यांची घरकुल यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करून केंद्र सरकारचे UMANG ऍप डाऊनलोड करा

UMANG ऍप इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करून आपली भाषा निवडायची आहे आणि I Agree to terms येथे क्लिक करुन Next वरती क्लिक करायचे आहे.

पुढे आपल्यासमोर Register आणि Log-in हे दोन पर्याय पाहायला मिळतील. प्रथम तुम्हाला Register या पर्यायावर क्लिक करून आपले अकाउंट रजिस्टर करा. जर आपले अकाउंट आधीपासूनच रजिस्टर असेल तर मोबाईल नंबर व MPIN टाकून लॉगिन करा.

Register-Log-in
Register-Log-in

UMANG ऍप मध्ये लॉगिन झाल्यावर खाली बार मध्ये All Services या वरती क्लिक करायचे आहे.

All Services
All Services

आता आपल्याला सर्व सेवा पाहायला मिळतील. पुढे सर्च बार मध्ये PMAY सर्च करून PMAY या पर्यायावर क्लिक करा.

PMAY-G
PMAY-G

PMAY या पर्यायावर क्लिक केल्यानंतर प्रथम आपली मराठी भाषा निवडा. पुढे आपल्याला प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मध्ये विविध पर्याय पाहायला मिळतील.

  • FTO ट्रॅकिंग.
  • पंचायत निहाय PWL यादी.
  • हप्त्याचा तपशील.
  • नागरिक तपशील.
  • एककेंद्राभिमुखता तपशील.
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन पाहण्यासाठी पंचायत निहाय PWL यादी या पर्यायावर क्लिक करा.

त्यामध्ये सुरुवातीला राज्य, त्यानंतर जिल्हा, मग तालुका आणि सगळ्यात शेवटी गाव ग्रामपंचायत निवडून शोधा या वर क्लिक करा.

पंचयत निहाय PWL यादी
पंचयत निहाय PWL यादी

वरील तपशील टाकल्यानंतर घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी आपण पाहू शकतो.

घरकुल यादी
घरकुल यादी

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) घरकुल योजनेतील लाभार्थ्यांचा हप्त्याचा तपशील:

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) घरकुल योजनेतील लाभार्थ्यांचा हप्त्याचा तपशील पाहण्यासाठी प्रथम पंचायत निहाय PWL यादी पहा आणि त्यामधील नोंदणी नंबर घेऊन हप्त्याचा तपशील या पर्यायामध्ये नोंदणी नंबर टाकून हप्त्याचा तपशील पहा.

हप्त्याचा तपशील
हप्त्याचा तपशील

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) घरकुल योजनेतील लाभार्थी FTO ट्रॅकिंग:

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) घरकुल योजनेतील लाभार्थी FTO ट्रॅकिंग करणे म्हणजेच निधी हस्तांतरण ऑर्डर (Fund Transfer Order) चेक करणे होय, ते पाहण्यासाठी हप्त्याचा तपशील मधील FTO नंबर घेऊन या FTO ट्रॅकिंग पर्यायामध्ये निधी हस्तांतरण ऑर्डर (Fund Transfer Order) चेक करा.

FTO ट्रॅकिंग
FTO ट्रॅकिंग

अशा प्रकारे नागरिक तपशील आणि एककेंद्राभिमुखता तपशील प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) घरकुल योजनेतील लाभार्थी यादी मधील नोंदणी नंबर टाकून आपण या ऍप मध्ये पाहू शकतो.


Scroll to Top