PMEGP karj anudan yojana 2023 | या तरुणांना रोजगारासाठी सरकारकडून मिळू शकतात 10 ते 25 लाख रुपये; अर्जाची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.

PMEGP कर्ज अनुदान योजना 2023 : पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) Business Loan-वन, खनिज, खाद्य, कृषी, अभियांत्रिकी, रसायन आणि वस्त्रोद्योगाशी संबंधित व्यवसाय सुरु करणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तुम्हाला सरकारकडून कर्ज / Loan मिळेल. सहकारी संस्था आणि धर्मादाय संस्थानाही या योजनेतंर्गत कर्ज Business Loan मिळू शकते

PMEGP karj anudan yojana
अधिकृत संकेतस्थळ :- Https://Www.Kviconline.Gov.In/ 

नमस्कार मित्रांनो, आज आपण Prime Minister’s Employment Generation Programe प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम योजना या PMEGP प्रधानमंत्री योजना 2023 बद्दल माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये योजनेचे उद्दिष्ट्य, अनुदान किती, आवश्यक कागदपत्रे, पात्राता, लाभ, अर्ज कुठे करायचा PM Loan Scheme इत्यादी सर्व गोष्टींची माहिती खाली वाचा ….,

ही योजना नक्कीच वाचा :->> या तरुणांना दुकान, व्यवसायासाठी 1 लाख रुपये कर्ज मिळणार | 1 लाख रु. बिनव्याजी कर्ज योजना 2023 | VJNT Loan Scheme 2022..,

PMEGP कर्ज अनुदान योजना 2023 या योजनेच्या अधिक सविस्तर माहितीसाठी ->> येथे क्लिक करावे

PMEGP कर्ज योजना 2023 चा उद्देश

सरकारच्या या योजनेतून देशातील जास्तीत जास्त लोकांना कर्ज द्यायचे आहे.

 • बेरोजगारी संपवा.
 • ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे.
 • देशातील सर्व नागरिकांना स्वावलंबी बनवणे.

काय आहे प्रधानमंत्री लघु उद्योग योजना 2023 ( What is Pradhan Mantri Lagu Udyog Yojana 2023)

प्रधानमंत्री लघु उद्योग योजना, 2023 ही एक सरकारी योजना आहे, ज्यामध्ये लोकांना स्वतःहून रोजगार निर्माण करण्यासाठी कर्ज दिले जाते. या योजनेच्या मदतीने एखाद्या व्यक्तीला 10 ते 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहज मिळू शकते. शासनाची ही योजना शहरी आणि ग्रामीण भागातील तरुणांसाठी बनवण्यात आली आहे.

या उद्योगांसाठी पैसे मिळतील

जर तुम्हालाही पंतप्रधान लघु उद्योग योजना, 2023 अंतर्गत उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक मदत मिळवायची असेल, तर लक्षात ठेवा की सरकार फक्त काही उद्योगांसाठी निधी देईल. जे अशा आहेत…

 • वन आधारित उद्योग
 • खनिज आधारित उद्योग
 • खादय क्षेत्र
 • शेती आधारित
 • अभियांत्रिकी
 • रासायनिक आधारित उद्योग
 • वस्त्रोद्योग (खादी वगळता)
 • सेवा उद्योग
 • अपारंपरिक ऊर्जा

PMEGP योजना 2023 चा लाभ कोण घेऊ शकतो

 • सरकारच्या PMEGP योजनेचा लाभ घेण्यासाठी, एखादी व्यक्ती भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे.
 • याशिवाय अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे.
 • एखाद्या व्यक्तीने सरकारी संस्थेतून कोणत्याही कामाचे प्रशिक्षण घेतले असेल, तर त्याला या योजनेत प्रथम प्राधान्य दिले जाईल.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

PMEGP योजना, 2023 चा लाभ मिळविण्यासाठी, तुमच्यासाठी खालील कागदपत्रे असणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.

 • अर्जदाराचे आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • जात प्रमाणपत्र
 • पत्त्याचा पुरावा
 • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
 • मोबाईल नंबर
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • अर्जदार अनुसूचित जाती जमाती पैकी असल्यास जातीचा दाखला
 • ज्या ठिकाणी व्यवसाय करणार आहात त्या ठिकाणचे नाहरकत प्रमाणपत्र व लोकसंख्या प्रमाणपत्र

PMEGP कर्ज अनुदान योजना 2023 या योजनेच्या अधिक सविस्तर माहितीसाठी व अचूक अर्ज करण्यासाठी ->> येथे क्लिक करावे

PMEGP योजना 2023 मध्ये अर्ज कसा करावा? ( How to Apply for PMEGP Scheme 2022 )

PMEGP चा लाभ मिळविण्यासाठी, तुम्ही प्रथम सरकारच्या PMEGP अधिकृत वेबसाइटवर जाणे आवश्यक आहे. जिथे तुम्हाला गैर-वैयक्तिक लिंकवर क्लिक करून अर्ज प्राप्त करावा लागेल.

केवीआयसीचे राज्य/ विभागीय संचालक केवीआयबी आणि संबंधित राज्यांचे उद्योग संचालक (डीआयसीसाठी) यांच्याकडे उद्योजक/ सेवा युनिट सुरू करण्यास इच्छुक संभाव्य लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावेत.PMEGP लोन साठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट Https://Www.Kviconline.Gov.In/ ला भेट द्या.

अर्ज भरून झाल्यानंतर अर्जासोबत सर्व कागदपत्रांची एक झेरॉक्स प्रत जोडून जिल्हा उद्योग केंद्र येथे जमा करावे त्यानंतर जिल्हा उद्योग केंद्रामार्फत आपण दिलेल्या बँकेकडे प्रस्ताव पाठवण्यात येतो पाठवल्याचे स्टेटस ऑनलाइन पाहायला मिळते त्यानंतर पुढील कार्यवाही बँकेमार्फत होत असते.

PMEGP कर्ज अनुदान योजना 2022 या योजनेच्या अधिक सविस्तर माहितीसाठी व अचूक अर्ज करण्यासाठी ->> येथे क्लिक करावे

(नोट: सदरील योजनेच्या माहितीमध्ये काही बाबतीत बदल असू शकतात. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च खात्री करून घ्यावी.)

Leave a Comment


Scroll to Top