Prime Minister’s Employment Generation Programme : पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) Business Loan-वन, खनिज, खाद्य, कृषी, अभियांत्रिकी, रसायन आणि वस्त्रोद्योगाशी संबंधित व्यवसाय सुरु करणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तुम्हाला सरकारकडून कर्ज / loan मिळेल. सहकारी संस्था आणि धर्मादाय संस्थानाही या योजनेतंर्गत कर्ज PM Loan Scheme/ yojna 2022 Business Loan मिळू शकते.
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम योजना या प्रधानमंत्री योजना 2022 बद्दल माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये योजनेचे उद्दिष्ट्य, अनुदान किती, आवश्यक कागदपत्रे, पात्राता, लाभ, अर्ज कुठे करायचा PM Loan Scheme इत्यादी सर्व गोष्टींची माहिती….,
PMEGP योजना काय आहे? केंद्र सरकारने देशातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी एक नवी योजना सुरु केली आहे. पंतप्रधान रोजगार सृजन असे या योजनेचे नाव आहे. या योजनेतंर्गत बेरोजगार तरुणांना व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही एखादा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर पंतप्रधान रोजगार सृजन योजनेचा लाभ घेऊ शकता.
Business Loan – राष्ट्रीय स्तरावरील नोडल एजन्सी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) ही योजना राबवली आहे. राज्य स्तरावर ही योजना राज्य KVIC संचालनालय, राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ (KVIBs), जिल्हा उद्योग केंद्रे (DICs) आणि बँकांद्वारे राबवली जाते. या योजनेमध्ये लाभार्थी / उद्योजकांना थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदान थेट वितरीत केले जाते.government loan scheme for business

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) Business Loan-वन, खनिज, खाद्य, कृषी, अभियांत्रिकी, रसायन आणि वस्त्रोद्योगाशी संबंधित व्यवसाय सुरु करणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. या योजनेंतर्गत देशातील बेरोजगार तरुणांना स्वत: चा रोजगार सुरू करण्यासाठी १०-२५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येत आहे. आपल्या देशातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारने पीएमईजीपी योजना सुरू केली आहे. ग्रामीण व शहरी भागातील तरुणांना PMEGP लोन योजनेचा लाभ घेता येणार आहे.पीएमईजीपी योजना 2022 अंतर्गत अधिकाधिक बेरोजगार तरुणांना Business Loan कर्ज देऊन रोजगार उपलब्ध करून देणे याकडे केंद्र सरकारचे लक्ष आहे.
मात्र, तुमचा व्यवसाय हा पूर्णपणे नवा असला पाहिजे, ही पूर्वअट आहे. तुम्ही अगोदरपासूनच एखादा व्यवसाय करत असाल आणि तो तुम्हाला वाढवायचा असेल तर त्यासाठी पंतप्रधान रोजगार सृजन योजनेतून Business Loan कर्ज मिळणार नाही. तसेच पूर्वीपासून सरकारी अनुदांनाचा लाभार्थी असलेल्या व्यक्तीलाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
PMEGP योजनेत अनुदान किती? पंतप्रधान रोजगार सृजन योजनेतंर्गत ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना व्यवसाय सुरु करण्यासाठी 25 टक्के अनुदान मिळेल. तर शहरी भागातील तरुणांना 15 टक्के अनुदान मिळेल. Business Loan व्यवसायात 10 टक्के पैसे तुमचे असणे गरजेचे आहे.
- सर्वसाधारण प्रवर्गासाठी – शहरी क्षेत्रासाठी एकूण प्रकल्प खर्चाच्या १५%, ग्रामीण क्षत्रासाठी खर्चाच्या २५% , तर एकूण प्रकल्प खर्चाच्या १० % किंमती स्वतःचे योगदान असणार आहे.
- SC,ST,OBC,अल्पसंख्याक, महिला, शारीरिक अपंग, भूतपूर्व सैनिक, इ. – शहरी क्षेत्रासाठी एकूण प्रकल्पांच्या २५% खर्च, ग्रामीण क्षत्रासाठी एकूण प्रकल्प खर्चाच्या ३५%, एकूण प्रकल्प खर्चाच्या ५% स्वतःचे योगदान असणार आहे.
योजनेचे नाव | PMEGP SCHEME |
योजना कोणाची | केंद्र सरकार |
लाभ | अनुदान |
संपर्क | KVIC, DIC, KVIB |
PMEGP योजना 2022 फायदे : देशातील बेरोजगार तरुणांना या योजनेंतर्गत स्वतःचा उद्योग, रोजगार सुरू करण्यासाठी १० लाख ते २५ लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल.
या योजनेंतर्गत बेरोजगार तरुणांना त्यांची जात व ग्रामीण, शहरी क्षेत्रानुसार अनुदान दिले जाते.
शहरी भागातील पीएमईजीपीसाठी नोडल एजन्सी जिल्हा उद्योग केंद्र (डीआयसी) आहे, तर ग्रामीण भागात खादी व ग्रामोद्योग मंडळाला (केव्हीसी) संपर्क साधता येईल.
लोन अशाच बेरोजगार तरुणांना देण्यात येईल, ज्यांना स्वत: चा रोजगार सुरू करायचा आहे.
PMEGP योजना / पीएमईजीपी साठी कोण अर्ज करू शकतो? कोणतीही व्यक्ती, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची. उत्पादन क्षेत्रात किंवा सेवा क्षेत्रातील प्रकल्प. पीएमईजीपी अंतर्गत मंजुरीसाठी फक्त नवीन प्रकल्पांचा विचार केला जातो.
स्वयंसहाय्यता गट (ज्या गटांनी इतर कोणत्याही योजनेअंतर्गत लाभ घेतला नाही),
सोसायटी नोंदणी कायदा, 1860 अंतर्गत नोंदणीकृत संस्था; उत्पादन सहकारी संस्था आणि चॅरिटेबल ट्रस्ट देखील पात्र आहेत.
- अनुसूचित जाती (SC )
- माजी सैनिक
- अनुसूचित जमाती (ST )
- दिव्यांग
- महिला
- इतर मागासवर्ग (OBC )
- पूर्वोत्तर राज्यातील लोक
- अल्पसंख्याक
- सीमावर्ती भागात आणि डोंगरावर राहणारे लोक
विद्यमान युनिट्स (पीएमआरवाय, आरईजीपी किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या इतर कोणत्याही योजने अंतर्गत) आणि ज्या युनिट्सने भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या इतर कोणत्याही योजनेअंतर्गत शासकीय सबसिडी घेतली आहे ते पात्र नाहीत.
- PMEGP योजना 2022 पात्र उद्योग :
- कृषी आधारित
- वन आधारित उद्योग
- अपारंपरिक ऊर्जा
- रासायनिक आधारित उद्योग
- खाद्य क्षेत्र
- अभियांत्रिकी
- खनिज आधारित उद्योग
- वस्त्रोद्योग (खादी वगळता)
- सेवा उद्योग
PMEGP योजना 2022 ची पात्रता : वन, खनिज, खाद्य, कृषी, अभियांत्रिकी, रसायन आणि वस्त्रोद्योगाशी संबंधित व्यवसाय सुरु करणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तुम्हाला सरकारकडून कर्ज मिळेल. सहकारी संस्था आणि धर्मादाय संस्थानाही या योजनेतंर्गत कर्ज मिळू शकते.
अर्जदार हा भारताचा रहिवासी असावा.
अर्जदाराचे किमान ८वी पास असणे आवश्यक आहे.
अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा अधिक असावे.
जर अर्जदारास आधीपासूनच अन्य अनुदान योजनेचा लाभ मिळत असेल, तर अशा परिस्थितीतही तो पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम कर्ज योजना २०२१ घेण्यास पात्र राहणार नाही.
या योजनेअंतर्गत हे कर्ज नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील देण्यात येईल, हे कर्ज जुन्या व्यवसाय पुढे चालू ठेवण्यासाठी दिले जात नाही.
कोणत्याही सरकारी संस्थेकडून प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तीस या योजनेत प्रथम प्राधान्य दिले जाईल.
सहकारी संस्था आणि सेवाभावी संस्थांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- पीएमईजीपी या योजनेसाठी अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे : आधार कार्ड नंबर
- पॅन कार्ड नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
- शैक्षणिक शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका
- प्रोफाइल प्रोजेक्ट रिपोर्ट
- अर्जदार अनुसूचित जाती जमाती पैकी असल्यास जातीचा दाखला
- ज्या ठिकाणी व्यवसाय करणार आहात त्या ठिकाणचे नाहरकत प्रमाणपत्र व लोकसंख्या प्रमाणपत्र

PMEGP लोन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कुठे करावा : केवीआयसीचे राज्य/ विभागीय संचालक केवीआयबी आणि संबंधित राज्यांचे उद्योग संचालक (डीआयसीसाठी) यांच्याकडे उद्योजक/ सेवा युनिट सुरू करण्यास इच्छुक संभाव्य लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावेत.PMEGP लोन साठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट https://www.kviconline.gov.in/ ला भेट द्या.
PMEGP अंतर्गत लाभार्थी त्यांचे अर्ज https://www.kviconline.gov.in/pmegpeportal/pmegphome/index.jsp वर ऑनलाईन देखील सादर करू शकतात आणि अर्जाची प्रिंटआउट घेऊन ते संबंधित कार्यालयात विस्तृत प्रकल्प अहवाल आणि इतर आवश्यक कागदपत्रासह सादर करू शकतात.
अर्ज भरून झाल्यानंतर अर्जासोबत सर्व कागदपत्रांची एक झेरॉक्स प्रत जोडून जिल्हा उद्योग केंद्र येथे जमा करावे त्यानंतर जिल्हा उद्योग केंद्रामार्फत आपण दिलेल्या बँकेकडे प्रस्ताव पाठवण्यात येतो पाठवल्याचे स्टेटस ऑनलाइन पाहायला मिळते त्यानंतर पुढील कार्यवाही बँकेमार्फत होत असते.
(नोट: सदरील योजनेच्या माहितीमध्ये काही बाबतीत बदल असू शकतात. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च खात्री करून घ्यावी.)