POMIS Yojana : प्रत्येक महिन्याला कमवा बक्कळ पैसा, सर्वसामान्यांसाठी Post Office ची खास योजना, वाचा किती होणार फायदा?

POMIS Scheme : महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना आमचा नमस्कार, Post Office Monthly Income Scheme पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणं हा नेहमीच एक सुरक्षित पर्याय आहे. इथं आपले पैसे देखील सुरक्षित आहेत आणि आपल्याला चांगलं उत्पन्न मिळतं. मासिक उत्पन्न योजना (POMIS) ही अशीच एक छोटी बचत योजना आहे. ज्यामध्ये तुम्हाला दरमहा पैसे मिळवण्याची संधी मिळते. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही दरमहा एक निश्चित रक्कम कमवू शकता. या योजनेंतर्गत तुम्ही एकल किंवा संयुक्त खातं उघडू शकता आणि एकमुखी रक्कम जमा करू शकता.

गुंतवणूकीवर कमवा दरमहा निश्चित उत्पन्न : या खात्यात जमा झालेल्या, रकमेनुसार दरमहा तुमच्या खात्यात कमाईची रक्कम येतच राहते. या योजनेचा परिपक्वता कालावधी 5 वर्षांचा आहे. पण तो पुढे 5-5 वर्षांसाठी वाढवला जाऊ शकतो.

कोणताही भारतीय नागरिक पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक करु शकतो. Post Office योजनेत गुंतवणुकीवर कोणताही धोका नाही. इथं तुमच्या गुंतवणुकीवर सरकारी सुरक्षेची 100 टक्के हमी आहे.

या योजनेतून चांगलं उत्पन्न मिळतं. ज्या ग्राहकांना दरमहा निश्चित उत्पन्न मिळवायचं आहे त्यांच्यासाठी पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक करणं सगळ्यात फायदेशीर आहे. नोकरी सोडल्यानंतर किंवा सेवानिवृत्तीनंतर एकरकमी रक्कम मिळते त्यांच्यासाठी ही योजना अतिशय चांगली आहे. एकरकमी गुंतवणुकीद्वारे दरमहा निश्चित उत्पन्न मिळू शकते.

Free Flour Mill yojana maharashtra 2022
योजना शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचा

तुम्हाला किती व कसा मिळेल फायदा समजून घ्या ?

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेसाठी चालू तिमाहीत सरकारने वार्षिक व्याज दर 6.6 टक्के निश्चित केला आहे. म्हणजे जर तुम्ही योजनेत 9 लाख रुपये जमा केले तर या रकमेवरील 6.6 टक्के वार्षिक व्याजदराप्रमाणे एकूण व्याज 59,400 रुपये असणार आहे.

जर ही रक्कम वर्षाच्या 12 महिन्यांत विभागली गेली तर दरमहा व्याज सुमारे 4950 रुपये असेल. एकाच खात्यातून तुम्ही 4,50,000 लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर दरमहा व्याज म्हणून 2475 रुपये कमवाल. 

या योजनेत कसं उघडाल खातं ?

Post Office Monthly Income Scheme या योजनेंतर्गत खातं उघडण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं असणं आवश्यक आहे. खातं उघडण्यासाठी तुम्हाला आयडी पुरावा द्यावा लागेल. यासाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, डीएल किंवा पासपोर्ट द्यावं लागेल. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो सुद्धा खातं उघडण्यासाठी महत्त्वाचे आहेत. अ‍ॅड्रेस प्रूफसाठी एखादं ओळखपत्र, लाईट बिल, नगरपालिका बिल, निवासी प्रमाणपत्र किंवा शासकीय विभागाने दिलेला अन्य पुरावा असावा वरील सर्व कागदपत्रे घेऊन तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयात जाऊन या योजनेचा लाभ घेता येईल; धन्यवाद!

Comments are closed.


Scroll to Top