post office cash withdrawal scheme : आपण कधी बँकेचे पासबुक विसरतो, कधी एटीएम कार्ड विसरतो, तर कधी पाकीट चोरीला जाते. नेमकी अशाच वेळी पैशांची गरज भासते. ही अडचण ओळखून पोस्टाने एक योजना आणली आहे. आधार क्रमांक आधारित पेमेंट सिस्टीम अंतर्गत बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न असलेल्या व्यक्तिला हातांच्या ठशांच्या आधारे पोस्टातून किंवा पोस्टमनकडून दहा हजारांची रक्कम घेता येते. या योजनेच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांत १ हजार ६०३ कोटी रुपयांचे ४८.१६ लाख आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार झाले आहेत.

- काय आहे योजना?
- अडीअडचणीला पोस्टातून, पोस्टमनकडून पैसे घेता येतात.
- आधारशी संलग्न बँकखाते असलेल्यांना सेवेचा लाभ घेता येतो.
- खात्यातून पैसे काढणे, शिल्लक रकमेची चौकशी करता येते.
पोस्टमनला तुमच्या बोटांचे ठसे द्या, पैसे घ्या…
- पैसे काढण्यासाठी ग्राहकाला हाताच्या बोटांचे ठसे द्यावे लागतात.
- यासाठी ग्राहकाकडे आधार क्रमांक असणे गरजेचे असते.
- ग्राहकाला दिवसाला जास्तीत जास्त १० हजार रुपये काढता येतात.
पोस्टमन तसेच ग्रामीण डाक सेवकांमुळे ग्राहकांचे बँकांपर्यंत जाण्याचे श्रम वाचले आहेत. खऱ्या अर्थाने आपली बँक, आपल्या दारी याचा अनुभव येत आहे. एक राष्ट्र, एक बँक ही संकल्पना प्रत्यक्षात उतरण्याच्या मार्गातील हे एक मोठे पाऊल आहे.

या योजनेअंतर्गत देशातील या तीन वर्षांतील व्यवहार
वर्ष रक्कम व्यवहार
२०१९-२० ६४.२९ कोटी २.०१ लाख
२०२०-२१ ६९३.३६ कोटी २३.५२ लाख
२०२१-२२ ६३५.५५ कोटी १७.५९ लाख
२०२२-२३ २०४.४४ कोटी ५.०५ लाख
महत्वाची सूचना : नागरिकांनो भारत सरकार अंतर्गत ही योजना व सेवा 2019-20 पासून देशभर राबवली जात आहे. ही योजना व माहिती 100% खरी असून तुम्ही तुमच्या गावातील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन या योजनेबद्दल अधिक माहिती जानुन घेऊ शकता व तुमचे कोणत्याही बँकेतील पैसे तुम्ही तुमच्या गावातच काढू शकता; धन्यवाद!