Janani Suraksha Yojana 2022 | pregnant women schame | प्रसूती योजना ऑनलाईन अर्ज | मिळेल १५ ते २० हजारांची आर्थिक मदत | prasuti yojana online application | prasuti yojana 2022
महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकरी बांधवांसाठी आणि सर्वसामान्य माणसांसाठी विविध योजना सुरु असतात. परंतु खूप कमी बांधवाना या योजनांचा लाभ मिळत असतो. अनेक शेतकरी बांधव आणि इतर गरजू लोक केवळ माहिती नसल्यामुळे या सरकारी योजनांचा लाभ घेवू शकत नाहीत. अनुदान योजना किंवा महाराष्ट्र शासन कृषी योजना विषयी अधिक चांगल्या प्रकारे जागृती होणे गरजेचे आहे. म्हणूनच तुमच्यासाठी आम्ही नवीन माहिती पुरवण्यासाठी आमच्या aaple sarkarse वेबसाईट द्वारे मदत करत आहोत .
Janani Suraksha Yojana 2022 in marathi
सविस्तर योजना वाचून योजनेचा लाभ नक्की घ्या
गर्भवती महिलांसाठी ही pregnant women schame योजना सुरू केली गेली आहे जेणे करून आई व तिचे बालक सुरक्षित असतील. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार यांनी जननी सुरक्षा योजना 2022 सुरू केली आहे. ही योजना 12 एप्रिल 2005 रोजी सुरू झाली आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि कुटुंब कल्याण विभाग यांच्यामार्फत ही योजना चालविली जाते.जननी सुरक्षा योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या गरीब कुटुंबातील गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी शहरातील महिलांना 15 ते 20 हजार रुपये पर्यंत आर्थिक मदत दिली जाते.

दरवर्षी pregnant women schame या योजनेसाठी सुमारे 1600 कोटी रुपयापर्यंत बजेट तयार केले जाते. या योजनेसाठी 19 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाची महिला अर्ज करू शकते.
pregnant women schame या योजनेअंतर्गत,गर्भवती महिलेची प्रसूती ग्रामीण रुग्णालयात प्रशिक्षित नर्स, डॉक्टर यांनी केली पाहिजे.
जेएसवाय योजनेंतर्गत महिला आणि नवजात जन्मलेल्या बालकांच संरक्षण करण्याचे आणि मृत्यु दर कमी करण्याचे धोरण ठेवले गेले आहे. दरवर्षी देशातील 1 कोटीहून अधिक महिला या योजनेसाठी अर्ज करतात आणि त्याचा लाभ घेतात.
इथे पुढे वाचा PMEGP Loan Yojna 2022 | बेरोजगार तरुणांना मिळणार कर्ज आणि अनुदान, जाणून घ्या संपूर्ण योजना
जाणून घेवूयात प्रसूती योजना ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो prasuti yojana online application. नोंदणीत बांधकामगाराच्या पत्नीला नैसर्गिक प्रसूतीसाठी १५ हजार तर सिझेरियनसाठी २० हजार रुपये अनुदान मिळते.
हे अनुदान कसे मिळते कोणत्या वेबसाईटवर अर्ज करावा लागतो तसेच कोणकोणती कागदपत्रे लागतात याविषयी संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. जेणे करून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अगोदर बांधकाम कामगार नोंदणी करणे आवश्यक आहे. हि नोंदणी कशी करावी हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
प्रसूती योजना ऑनलाईन अर्ज या शिवाय इतर ३२ शासकीय योजनांचा मिळेल लाभ
एकदा का तुम्ही बांधकाम कामगार नोंदणी केली कि केवळ प्रसूती योजनाच नव्हे तर तुम्हाला शासनाच्या विविध ३२ योजनांचा लाभ मिळू शकतो.

चला तर आता जाणून घेवूयात प्रसूती योजनासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो. ऑनलाईन अर्ज सुरु करण्यापूर्वी काही कागदपत्रे तुमच्याकडे उपलब्ध असू द्या. हि कागदपत्रे ऑनलाईन अर्ज करतांना तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे.
प्रसूती योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे
त्यामुळे खालील कागदपत्रे अगोदर तुमच्याकडे स्कॅन करून ठेवा. pdf jpeg, jpg किंवा PNG format मध्ये हि कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे. अगोदर हि कागदपत्रे आणि मगच स्कॅन करून ठेवा ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात करा.
- सक्षम वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेले नैसर्गिक किंवा शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीचे प्रमाणपत्र.
- प्रसूती घरी झाली असल्यास ग्रामसेवक, ग्रामपंचायत, नगरपालिका, महा नगर पालिका, जन्म नोंदणी प्रमाणपत्र.
- शिधापत्रिका म्हणेच राशन कार्ड.
- स्वयंघोषणापत्र.
- डिस्चार्ज कार्ड.
वरील सर्व कागदपत्रे २ एमबी साईजच्या आत स्कॅन करून ठेवा ऑनलाईन अर्ज करतांना हि कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे.
इथे पुढे वाचा Mukhyamantri Rojgar Yojana Maharashtra | महाराष्ट्र मुख्यमंत्री रोजगार योजना 2022 | CMEGP Apply Online
जननी सुरक्षा योजनेचा उद्देश | Janani Suraksha Yojana 2022
ग्रामीण आणि शहरी भागातील दारिद्र्य रेषेत आपले जीवन जगणाऱ्या महिलांना गरोदरपणातील सर्व सुविधा विनाशुल्क उपलब्ध करून देता येतील या योजनेचे उद्दीष्ट आहे. कारण या लोकांच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसते त्यामुळे हे लोक रुग्णालयात योग्य उपचार घेण्यास टाळतात आणि दरवर्षी गरोदरपणात योग्य काळजी न घेतल्यामुळे त्यांच्याआरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.आणि यामुळे ती महिला मृत्यू होतो.
परंतु या योजनेंतर्गत गर्भवती महिला आणि तिच्या जन्मलेल्या बाळाला जास्त संरक्षण देन्यात येते. जेएसवाय मध्ये महिलेची प्रसूती झाल्यानंतर सरकार तिच्या स्वतःच्या खात्यात आर्थिक मदत पुरवते यामुळे आई व मुलाला योग्य पोषण व आहार मिळू शकेल.
गर्भवती महिलेला प्रसूतीच्या वेळी जवळ असलेल्या कोणत्याही सरकारी रुग्णालयात नोंदणी करून जननी सुरक्षा योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या महिलांना प्रसूती दरम्यान केंद्र सरकारकडून मदत देण्यात येणार असून ती मदत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाठवली जाते.
पुढील लेख पण वाचा :- बांधकाम कामगार योजना 2022 | Bandhkam Kamgar Yojana | बांधकाम कामगार नोंदणी सुरु
ऑनलाईन अर्ज कसा करायचा
- गुगलमध्ये bandhkam kamgar असा कीवर्ड टाका आणि सर्च करा.
- बांधकाम कामगार योजनेची वेबसाईट लिंक येईल त्यावर क्लिक करा. जसे हि तुम्ही या लिंकवर क्लिक कराल त्यावेळी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळची वेबसाईट ओपन होईल.
- बांधकाम कामगार मंडळाच्या वेबसाईटवर construction worker apply online for claim हा पर्याय शोध आणि त्यावर क्लिक करा.
- select सेक्शनवर क्लिक करा आणि New claim या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा रजिस्ट्रेशन क्रमांक टाका ( नोंदणी केल्यानंतर रजिस्ट्रेशन क्रमांक मिळतो )
- proceed to form या बटनावर क्लिक करा.
- तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर एक otp येईल तो दिलेल्या चौकटीमध्ये टाका आणि Validate OTP या बटनावर क्लिक करा.

योजना निवडून संपूर्ण माहिती योग्य भरा
- या ठिकाणी तुम्हाला तुमचा संपूर्ण अर्ज दिसेल. पेजला थोडे खाली स्क्रोल केल्यावर योजना श्रेणी निवडा हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा आणि योजना निवडा.
- योजना श्रेणीमध्ये आरोग्य व कल्याण योजना योजना निवडा.
- select scheme म्हणजेच योजनेच्या रकान्यामध्ये financial assistance of RS 15000 for natural delivery and RS 20000 for delivery by caesarean हा पर्याय निवडा.
- अर्जदाराच्या मुलाचे नाव निवडा
- मुलाचे नाव निवडल्यानंतर इतर माहिती आपोआप येईल जसे कि आधार नंबर जन्मतारीख व इतर.
- प्रसूतीचे ठिकाण निवडा. प्रसूती रुग्णालयात झाली असेल तर रुग्णालय निवडा व घरी झाली असेल तर घर हा पर्याय निवडा.
- रुग्णालयाचे नाव टाका.

प्रसूती योजना विषयी दिलेल्या पर्यायामधून योग्य ती माहिती सिलेक्ट करा
- ज्या ठिकाणी प्रसूती झाली असेल तेथील पत्ता टाका.
- प्रसूतीचा प्रकार दिलेल्या पर्यायातून निवडा जसे कि नैसर्गिक प्रसूती Natural delivery व शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती Caesarean delivery.
- जन्म प्रमाणपत्र नोंदणी क्रमांक टाका.
- Birth certificate म्हणजेच जन्म प्रमाणपत्र जरी करणाऱ्याचा प्रकार दिलेल्या पर्यायातून निवडा जसे कि महानगर पालिका, नगर पालिका किंवा ग्रामपंचायत यापैकी एक पर्याय निवडा.
- प्रमाणपत्र जारी करणाऱ्याचे नाव टाका.
- योजनेसाठी जि कागदपत्रे लागणार आहेत ती अपलोड करा.
- सर्वात शेवटी submit या पर्यायावर क्लिक करा.
इथे पुढे वाचा Bandhkam Kamgar Gharkul Yojana 2022 | अटल बांधकाम कामगार घरकुल योजना अर्ज माहिती
अशा पद्धतीने प्रसूती योजना ऑनलाईन अर्ज दाखल करता येवू शकतो आणि यासाठी तुम्हाला १५ ते २० हजारापर्यंत आर्थिक मदत मिळू शकते.
मित्रांनो आपला लेख जास्तीत जास्त गरजू नागरिकांपर्यंत पोहचवा जेणे करून त्यांना या योजनेची माहिती होऊ शकेल आणि ते या योजनाचा लाभ घेवू शकेल.