Proof of Life Certificate : निवृत्तधारकांना आता बँकेत मारावी लागणार नाही चक्कर, अशा प्रकारे ऑनलाइन सादर करा लाईफ सर्टिफिकेट्स..

सर्व पेन्शनधारकांसाठी महत्वाचे : 1 नोव्हेंबर 2022 पासून जीवन प्रमाण / हयातीचा दाखला (LIFE CERTIFICATE) जमा करणे सुरू होत असून 31 डिसेंबर 2022 अंतिम दिनांक आहे. हयातीचा दाखला जमा न केल्यास खातेमध्ये पेन्शन जमा होणार नाही

Free Flour Mill yojana maharashtra 2022
योजना शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचा

Proof of Life Certificate : केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांनी पेन्शन मिळवण्यासाठी दरवर्षी त्यांचे हयात दाखला  (Life certificates) किंवा वार्षिक हयात दाखला पेन्शन वितरण एजन्सीला (PDA) सादर करणे आवश्यक आहे. अस्तित्वाचा पुरावा असल्याने हे प्रमाणपत्र आवश्यक आहे. (Pensioners Life Certificate)

Bank Investment Schemes : दरवर्षी 1 नोव्हेंबरपासून जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. तथापि, केंद्र सरकारने 80 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ पेन्शनधारकांना अतिरिक्त वेळ दिला आहे. जे 1 ऑक्टोबरपासून त्यांचा हयात दाखला सादर करु शकतात. जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकारने पेन्शनधारकांना अनेक पर्याय दिले आहेत. पेन्शनधारक बँका, पोस्ट ऑफिस आणि राज्य, केंद्रशासित प्रदेश सरकारी कार्यालयांसारख्या पेन्शन वितरण संस्थांना भेट देऊन किंवा डिजिटल सबमिशनचा पर्याय निवडून प्रमाणपत्र सादर करु शकतात.

Free Flour Mill yojana maharashtra 2022
योजना शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचा
  • हयातीचा दाखल जमा करणेची प्रोसेस ऑनलाईन असून त्यासाठी खालीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रे लागतात
  • 1) बँक पासबुक
  • 2) पी.पी.ओ. पेन्शन खाते क्रमांक 
  • 3) आधार कार्ड
  • 4) मोबाईल क्रमांक (मोबाईल जवळ असणे गरजेचे)

सर्व पेन्शनधारकांनी हयात दाखला  (Life certificates) काढण्यासाठी तुमच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात संपर्क साधावा व आपला अचूक फॉर्म भरून जीवन प्रमाणपत्र दाखला काढून घ्यावा.

Jeevan Pramaan : निवृत्तीवेतनधारक PDA समोर प्रत्यक्ष हजर राहू इच्छित नसल्यास, तो नियुक्त केलेल्या कोणत्याही अधिकार्‍याने स्वाक्षरी केलेले विहित नमुन्यात हयात दाखला  (Life certificates) सादर करु शकतो. केंद्रीय पेन्शन लेखा कार्यालयाने (CPIO) जारी केलेल्या योजना पुस्तिकेनुसार, अशा पेन्शनधारकांना वैयक्तिक उपस्थितीपासून सूट देण्यात आली आहे.

Free Flour Mill yojana maharashtra 2022
योजना शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचा

पेन्शनधारक त्यांचे वार्षिक जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन सबमिट करण्यासाठी जीवन प्रमाण पोर्टल वापरु शकतात. या पद्धतीत, निवृत्तीवेतनधारकांना जीवन प्रमाण अॅप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल आणि UIDAI-आदेशित उपकरणांमधून कॅप्चर केलेले बायोमेट्रिक्स प्रदान करावे लागतील. हयात दाखला  (Life certificates) डिजिटल प्रमाणपत्रासाठी एखाद्या व्यक्तीचे बायोमेट्रिक्स रेकॉर्ड करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपकरणांची सूची UIDAI ठेवते. 

सरकार युतीद्वारे हयात दाखला  (Life certificates) तयार करण्यासाठी आणि संग्रहित करण्यासाठी घरोघरी बँकिंग सेवा देखील देत आहे. यामध्ये 100 प्रमुख शहरांना सेवा देणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील 12 बँकांचा समावेश आहे. पेन्शनधारक डोअरस्टेप बँकिंग (DSB) मोबाईल अ‍ॅप्लिकेशन, DSB च्या अधिकृत वेबसाइटद्वारे किंवा टोल-फ्री नंबर – 18001213721, 18001037188 द्वारे सेवा बुक करता येते. ; धन्यवाद!


Scroll to Top