Ration Card New Update : सरकार रद्द करणार 10 लाख रेशन कार्ड, ‘या’ लोकांना मिळणार नाही मोफत धान्य; इथे पहा कुणाचे रेशन बंद होणार..

Ration Card maharashtra New Update 2022 : देशभरातील कोट्यवधी लोक मोफत सरकारी रेशनचा लाभ घेत आहेत. पण आता सरकार चुकीच्या मार्गानं रेशन मिळवणाऱ्या लोकांचं रेशन बंद करणार आहे. सरकारनं अलीकडेच देशभरातून 10 लाख बनावट शिधापत्रिका ओळखल्या आहेत. या शिधापत्रिका लवकरच रद्द करून त्यांच्या रेशनवर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे. ज्यांची शिधापत्रिका बनावट असल्याचं आढळून आले, त्यांच्याकडून सरकार रेशनची वसूलीही करणार आहे

Free Flour Mill yojana maharashtra 2022
बातमी शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचा

वास्तविक, देशभरातील 80 कोटींहून अधिक लोक मोफत रेशन कार्डचा लाभ घेत आहेत. पण ही सुविधा घेण्यास पात्र नसलेले करोडो लोक देशात आहेत. असं असतानाही ते वर्षानुवर्षे मोफत रेशन सुविधेचा लाभ घेत आहेत. अलीकडेच सरकारनं 10 लाख अपात्र शिधापत्रिकाधारकांची ओळख पटवली आहे. ज्यांना यापुढे गहू, हरभरा आणि तांदूळ मोफत मिळणार आहे.

अपात्र शिधापत्रिकाधारकांची यादी शिधावाटप विक्रेत्यांना पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रेशन विक्रेते नावे चिन्हांकित करतील आणि अशा कार्डधारकांचा अहवाल जिल्हा मुख्यालयाला पाठवतील. त्यानंतर त्यांची कार्डे रद्द केली जातील. जे लोक मोफत रेशन मिळण्यास पात्र आहेत त्यांनाच रेशन मिळेल.

Free Flour Mill yojana maharashtra 2022
बातमी शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचा

Scroll to Top